शनिवार, ५ मे, २००७

खरं आहे...!

अम्रुततुल्य चहाची तरतरी... करी मन उभारी..
तरीपन फुक्यांना सिगारेट्ची साथ लय प्यारी
खरं आहे... खाईन तर तुपाशी.. नाही तर उपाशी.. ||१||

वीतभर पोटात अन छटाकभर मेंदुत किती पैका अन कीती घोटाळे..
भ्रष्ट अधिकारी अन नेते हे सारं करतात तरी कसे..?
खरं आहे... जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे... ||२||

तारुण्याची हौस, पैशाचा पाऊस.. अन त्यात बेफाम गाडयांचा हैदोस...
बेलगाम वाहतुक ... अन प्रत्येकाला मरणाची घाई..
खरं आहे... जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ... ||३||

भुलवणा-या जाहिराती अन रटाळ मालिका...
सगळेच आभाशी असुनही त्यालाही भुलणा-या पोरी...जरा सांभाळुन.. नाही तर..
खरं आहे... पी हळद अन हो गोरी... ||४||

मराठी संस्कृती .. मराठी मन...
मात्र अधुनिकतेच्या नावाखाली सगळेच गहाण...
खरं आहे... गाढवाला गुळाची चव काय..? ||५||

...भुंगा!

0 टिपणी/ टिपण्या: