भटकंती : राजमाची



भटकंती : राजमाची
१४ जुलै २००७

राजमाची चा बेत रद्द होता - होता पक्का झाला... ई-मेलची देवाण-घेवाण आणि रविवारचा दिवस पक्का झाला... १० लोकांचा ग्रुप बनता बनता ५ लोकांचा झाला..इंटरनेटवरुन जरा माहिती काढली... म्हणजे जाण्याचा रस्ता .. वेळ .. सोबत न्यायच्या वस्तु आणि बाळगायची सावधगिरी.. वगैरे - वगैरे..!

सकाळी ७वा. औफ़िसच्या खाली भेटायचे ठरले ... सगळे वेळेवर पोहोचले - मी सोडुन..[ काय करणार..? नेहमी प्रयत्न करतो हो.. वेळेत.. थोडे आधिच पोहोचण्याचा... बघु एक दिवस नक्की जमेल.. असो! ] तर.. मी, चंद्रकांत, कुणाल, दिव्या आणि वेलु [वेलुमुरुगन सिथैयन ----- ...... अवघड आहे ना.... वेलु ठिक आहे..!] .. चलो.. राजमाची..!

९.३० ला लोणावळ्यात पोहोचलो.. विशाल वाट पहातच उभा होता... नाष्ट्याचा बेत ठरला.. आणि ..वडा-पाव.. चहा .. मिसळ .. वा! .. मस्त ताव मारत पुढचा प्लान तयार ..जंगलामध्ये जिथं पर्यंत गाडी जाते, तिथं पर्यंत जायचे आणि मग पायी... गाडीने जायचा बेत असेल तर जीपच हवी.. तसा रस्ता कारच्या लायकीचा नाही... नसेल तर लोकलजिंदाबाद..! जीप ब-यापैकी जंगलात जाते...

१०.३० ला जीप एका ठिकाणी पार्क करुन आमची पायपीट सुरु झाली.... पहिला धबधबा दिसताच चंदु आणि विशाल नी मस्त आंघोळ केली. म्हणजे मस्त भिजुन घेतले..धबधब्याच्या पायथ्याशी जाऊन मी मस्त फ़ोटोग्राफ़ी केली... तसा प्रत्येक ट्रेक किंवा सहलीत फ़ोटोग्राफ़रचा रोल हा माझाच असतो ... हिरव्यागारवातवरणात अगदि सही मज्जा आली... कोसळणारे धबधबे .. हिरवे डोंगर.. सही..!

चालत चालत एकदाचा राजमाचीचा किल्ला दिसला... तसे या ठिकाणी आमने-सामने दोनकिल्ले आहेत.. एक मनरंजन आणि दुसरा श्रीवर्धन ..आम्ही श्रीवर्धनला जायचे ठरवले.. माझ्या किल्ल्यांच्या भटकंतीमध्ये आणखी एका गडाची भर ..! गप्पा मारत मारत .. सावधानता बाळगत आणि पावसात भिजत-भिजत आम्ही गडावर पोहोचलो .. गडावर तशी ईतर मंडळीही होतीच पण कमी .. एक ग्रुप रात्रीचा मुक्काम करुन गेला होता.. तशी गडावर राहण्याची चांगली सोय आहे .. तीन खोल्याचा आसराप्रशस्त आहे .. मात्र रात्री थांबलेल्या लोकांनी साफ़ - सफ़ाई चांगली न केल्याने कचरा आणि वास हे त्यांच्या राहणी मानाची थोडक्यात कहाणी सांगुन गेले.

गडावर फ़डफ़डणारा भगवा वा-यामुळे खांबाभोवती गुंडाळला गेला होता... विशालने आपले कर्त्यव्य समजुन, खांबावर चढुन तो व्यवस्थित केला ... नव्या जोमाने तो पुन्हा फ़डकु लागला..!
थोडावेळ आराम करुन आम्ही फ़ोटो घेतले ... गडावर पोहोचलेलं एक टोळकं - माणुस आणि माकड यांच्यातील जुन्या नात्याचे पुरावे देत होते. मोबाईल गाणी लावुन साले नाचत होते.. एक - दोन पोरीही होत्या, सोबतीला... मला एक गोष्ट समजत नाही .. गडावर लोक असे नाच करण्यासाठी येतात का..? जर या गोष्टींची एवढीच आवड असेल तर त्यासाठी तशा जागाही भरपुर आहेत ना... जा करा धांगडधिंगा ..! @#$@#@#$% !!!
हम्म.. जाऊ द्या ..!

गडाचा एक बुरुज अजुनही चांगल्या स्थितीत आहे ... तिथे जाताना मात्र काळजी घेणेगरजेचे आहे .. निसरडी वाट आणि गवत यामुळे अपघाताची शक्यता ..! या माची वरुन दिसणारा समोरचा धबधबा अगदी सही..! शिवाय सभोवतालची हिरवेगार डोंगर ..भाताची शेते . अस्पष्ट दिसणारी घरे .. सगळे काही निसर्गरम्य ..!

आम्ही गडाची मस्त भटकंती करुन परतीच्या मार्गावर आलो... रस्त्यामध्ये १-२ ठिकाणी पाण्याचे मोठे झरे [वाहते पाणी ] आहेत .. डुंबायला अगदी परफ़ेक्ट..! गाडीत बसण्याआधी मस्तपैकी पाण्यात बसुन घेतले.. अरे हो..! या ठिकाणी चहा सुद्धा मिळतो..! सही ना?

पाठीमागे वळुन श्रीवर्धनला पुन्हा एकदा नजरेत भरुन आम्ही गाडीत बसलो आणि गाडी पुण्याच्या दिशेने ... चलो पुणे..!
थकल्यामुळे सगळे शांत बसले होते .. गाडीत लावलेली मिलिंद ईंगळे ची "गारवा" ची गाणी मनाला तरतरीत करत होती... आणि माझे मन ... पुढच्या ट्रेकची तयारी ..!

अधिक फोटो इथे आहेत...!


...भुंगा!