मैत्रिच्या दिवसाच्या शुभेच्छा !!
मित्रांनो ... मैत्रिच्या दिवसाच्या शुभेच्छा !!
सर्वांचे मित्र आणि त्यांची मैत्री सुख-दुःखात कायम राहो हीच प्रार्थना ..!
काही वेळप्रसंगी बनलेली.. बनवलेली मित्र .. "जिवा-भावाचा" .. "खरा" ... "सखा" .. "जिवाला जीव देणारा " ...... एक असा शब्द ज्याचा अर्थ किंवा ज्याची व्याख्या करणे खरच अवघड आहे .. मात्र मैत्री ... एक असे नाते आहे जे आपण स्वतः बनवतो आणि जपतो .. ईतरही अनेक नाती असतात.. म्हणजे ...रक्ताची नाती ... ही अतुट असतात.. मात्र त्यावर आपले नियंत्रण नसते ... काही परंपरागत चालत आलेली.. जसे शेजारी .. नवीन सहकारी ..जशी मानेलेली नाती - भाऊ , बहीण ... तर काही जन्मापासुन तयार झालेली नाती ... जशी आई, वडील, भाऊ, बहीन, काका, काकी वगैरे...
मात्र ... मित्र आणि मैत्रीचे नाते हे स्वतः बनवलेले असते...सम आचार-विचार, आवडी-निवडी, सुख-दुःख यांनी बनलेले हे नाते ..!
आता, मित्र कोण असावा यावर मात्र काही बंधन नाही.. आपला सहकारी आपला चांगला मित्र असु शकतो .. मोठा-छोटा भाऊ हा सखा असु शकतो ... अर्थातच आई-वडील .. बहीण हेसुद्धा चांगले मित्र असु शकतात ... शिवाय सुख-दुःखात साथ देणारी पत्नी - अर्धांगिनी हीसुद्धा आपली चांगली मैत्रीण असु शकते .. नाही का?
मैत्री मध्ये अटी असु नयेत ... मग त्या कोणत्याही असु देत.. वय.. जात - धर्म, लिंग, नाते, परिस्थिती वा व्यवसाय यांना मैत्रिमध्ये अजिबात थारा असु नये.. मैत्री ही निखळ असावी.. कोणत्याही फ़ळाची किंवा अटीची अपेक्षा नसणारी ...!
मैत्री मध्ये असावा तो विश्वास.. सत्यता.. सचोटी ...! त्यावरच मैत्री कायम असते ..प्रसंगी माफ करण्याची व चुक-भुल कबुल करण्याची तयारी ... मनाचा मोठेपणा व एकमेकांवरचाविश्वास हेच अमर मैत्रीचे तत्व असावे. कुठेतरी वाचनात आलेल्या ह्या ओळी:
लहाणपणापासुन आत्तापर्यत अनेक मित्र-मैत्रिणी बनल्या .. पण कीती आपल्या आठवणीत आहेत..? कीती मित्र-मैत्रीणींच्या संपर्कात आपण आहोत .. बदलेला वेळ..बदललेला समाज आणि बदललेल्या जबाबदा-या यातुन आपण आपल्या मित्रांसाठीतर बदललो नाहीत ना याची जाणीव ठेवणे महत्वाचे...!
या जाणीवेची आठवण म्हणुन का होईना पण या दिवशी आपापल्या मित्र - मैत्रिणींना भेटुन .. शक्य नसल्यास फ़ोन किंवा ई-मेल करुन आपल्या मैत्रीला कायम करुया ..!!
सर्व मित्र आणि त्यांच्या मैत्रीला .. त्यांनी दिलेल्या आजपर्यंतच्या सोबतीला ...
मैत्रीच्या या नात्याला जिवंत ठेवल्या बद्दल व जोपासल्याबद्दल शुभेच्छा व अभिनंदन !
आपली मैत्री अशीच सदा बहरत राहो हीच प्रार्थना ..!
...भुंगा!

" रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात ...॥"
लहाणपणापासुन आत्तापर्यत अनेक मित्र-मैत्रिणी बनल्या .. पण कीती आपल्या आठवणीत आहेत..? कीती मित्र-मैत्रीणींच्या संपर्कात आपण आहोत .. बदलेला वेळ..बदललेला समाज आणि बदललेल्या जबाबदा-या यातुन आपण आपल्या मित्रांसाठीतर बदललो नाहीत ना याची जाणीव ठेवणे महत्वाचे...!
या जाणीवेची आठवण म्हणुन का होईना पण या दिवशी आपापल्या मित्र - मैत्रिणींना भेटुन .. शक्य नसल्यास फ़ोन किंवा ई-मेल करुन आपल्या मैत्रीला कायम करुया ..!!
सर्व मित्र आणि त्यांच्या मैत्रीला .. त्यांनी दिलेल्या आजपर्यंतच्या सोबतीला ...
मैत्रीच्या या नात्याला जिवंत ठेवल्या बद्दल व जोपासल्याबद्दल शुभेच्छा व अभिनंदन !
आपली मैत्री अशीच सदा बहरत राहो हीच प्रार्थना ..!
...भुंगा!
1 टिप्पणी
Lahan pana pasun aikat hoto ki Frendhship day ha Western Culture cha ek bhag ahey. Bhartat maitri sajra karnya sathi kuthla wegla san nahavta.
West madhe alaywar kalte.. ki west madhe ha san koni visesh sajara karat nahi. Nakalat ha divas nighun jato ani koni konala chukun wish suddha karat nahi.
Bhartatli gost thodi niralich ahey.
Bahutek ha western influence nasawa, bahutek ha Indian influence on west asawa! Kay mahanta? :)