कसम हैदराबाद के चारमिनार की..!

सतिशच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने २५ नोव्हेंबरला, पुन्हा एकदा हैदराबादला जाण्याचा योग आला... आणि त्या अनुशंगाने "चारमिनार" आणि "हुसेन सागर" पाहण्याचा योग आला..!

चारमिनारच्या रस्त्यावर फिरत-फिरत थोडीशी खरेदी केली... हैदेराबादचे मोती प्रसिद्ध आहेतच... मात्र खात्रीचा दुकानदार असेल तर खरेदी करावी... असे मित्रांनी सांगितल्यामुळे तो पर्याय सोडुन मित्रांनी काही काचेच्या बांगड्या खरेदी केल्या... मोत्यासारख्या चम्-चम करण्या-या त्या बांगड्या आणि कानाचे झुबके मनाला भुरळ पाडणारे होते..... "फकीरचंद पर्लवाले... कालुराम ज्वेलर्स" अशी नावेही पाहण्यात आली...!!

चारमिनार त्या पौर्णिमेच्या रात्रीत फारच खुलुन दिसत होता... म्हणुनच कदाचित एका चित्रपटात शक्ती कपुरच्या तोंडी - कसम हैदराबाद के चारमिनारा की.. हा संवाद दिला असेल... सुरुवातीलाच लागणारी ती मंडपासारखी कमान - तिच्या शेजारचे ते झाड आणि त्या झाडापाठीमागे लपलेला तो पुर्ण चंद्र - एक आगळे-वेगळे सौंदर्य पहायला मिळाले...!

संध्याकाळी हुसेन-सागर / नेकलेस रोड आणि त्यातील तो पुर्णाकृती पुतळा पाहण्यासारखे आहे. पाठीमागच्या बाजुला होणारी आतिषबाजी त्या सौंदर्यात आणखी भर घालणारी....रात्रीचे जेवण - बावर्ची - या हैदेराबादी बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या हौटेलमध्ये... वा! काय बिर्याणी होती... तशी पुण्याची - ब्लु-नाईल किंवा दुर्गाची बिर्याणी सुध्दा कमी नाही.... पण त्या हैदराबादी बर्याणीची चव काही औरच आहे..!!
शिवाय... हैदराबादमध्ये बघण्यासाठी फार ठीकाणे आहेत, जशी - बिर्ला मंदिर ...गोलकोंडा [गोवळकोंडा ?] किल्ला... व इतर...

......पण सोलापुरपासुन ४५ की.मी. वर असणारा आणि हैदराबादला जाताना अगदी रस्त्यालगत असणारा नळदुर्ग लय आवडला...

थोडं थांबा... नळदुर्ग बद्दल लिहितोय - लिहिलय ... ;-)


चारमिनारचे - हुसेन सागरचे फोटो पहा..!!


...भुंगा!