बुधवार, ४ मार्च, २००९

मी.. आणि माझं ब्लौगिंग ...

आजकाल नविन विषय मिळवण्यासाठी काही खास डोकं वापरावं लागत नाही. मराठीब्लौग्ज. नेट वर जायचं आणि मस्त वाचायचं.. कीतीतरी ब्लौग्ज .. कित्येक ब्लौगर्स.. कितीतरी पोस्ट्स् आणि कीतीतरी विचार ... गेल्या आठवड्यात महेंद्रच्या ब्लौगवर "अभिव्यक्ती" बद्दल वाचलं... एक कमेंटपण टाकली पण नंतर म्हटलं .. जरा विस्तारानं लिहावं.

हां... तर - अभिव्यक्ती स्वातंत्र्य: लोकशाहीचं एक प्रभावी शस्त्र. घटनेनं प्रत्येकाला दिलेलं स्वातंत्र्य! आपलं मत - विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकारही!
... मला वाटतं ह्याच अधिकार आणि स्वातंत्र्याच्या जोरावर काही पत्रकार आणि न्युज चॅनेलवाले वाट्टेल ते बोलत असतात... या स्वातंत्र्याचा फायदा की गैरफायदा किती आणि कसा घेतात ते कोणी ठरवायचं. परवाच न्युज वाचली की 'अजित डी' नावाच्या एका पो-याने - जो स्वतः कंम्प्युटर इंजि. आहे - शिवसेनेच्या नावाने बोंब मारायल और्कुटवर एक कम्युनिटी सुरु केली आणि आता पोलिसी तक्रारीनंतर सध्या त्याच्या वर न्यायालयिन खटला चालु आहे/ होईल. आता फक्त हेच एक उदाहरण नाही, सांगायला गेलो तर हेच बघा:

 • न्युज चॅनेलवर कुठल्या न्युज ब्रेकिंग न्जुजच्या नावाने दाखवल्या जातात - हे बघा उदाहरण
 • कीती सिरियल्स मध्ये विवाहपुर्व आणि विवाहबाह्य - एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि सासु - सुनेचे कुभांड दाखवले जातात
 • पेपरवाले - खप होण्यासाठी कुठल्या बातम्या ठळक माथळयाखाली दाखवतात - काही पेपर्सची औनलाइन एडिशन्स बघा, तुम्हाला अंदाज येइल, मी काय म्हणतोय ते.

आता मला सांगा, या स्वातंत्र्याच्या बरोबरीने स्वत:च्या काही जबाबदा-या आपसुकच येतात, जसे
 • आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असु नये
 • दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय आपल्या नावाने - प्रकाशित करु नये.
 • ब्लॉगवरुन - वेबसाइटवरुन - आपण कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावु नये.
 • ब्लॉगवरुन -वेब-साइटवरुन वरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करु नये.
 • आपल्या ब्लॉगमध्ये वेब-साइटमध्ये - कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे.
 • आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती आपण आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत करु नये.
 • राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण आपण आपल्या ब्लॉगमधून - वेब-साइटवरुन करु नये।[ संदर्भ - पुर्व परवानगीसहित :मराठी समुदाय - वामन परुळेकर ]
... आता प्रश्न - कंटेन्ट - कौपी - पेस्ट चा... मला वाटतं ह्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अहो, ब्लौग तर सोडा, पण ब-याच वेबसाईटसवरती पण तुम्हाला सेमच टेक्स्ट कंटेंट दिसतील, जशा काय या कंपन्या - सिस्टर कंसर्न आहेत. उदा:
 • "We've seen companies struggle with new web design technology, and web design companies that never delivered on their promises." हे वाक्य गुगलमध्ये सर्च केले तर ८३ लिंक्स सापडतील!!

तशा भरपुर वेबसाइटस सापडतील... पण मुद्दा कंटेन्टचा आहे ... तुम्हीच सांगा कुणाचे कंटेन्ट - खरे - ओरिजिनल आणि कुणी याबाबत केस-तपास करत बसावा?

थोडक्यात काय तर ह्या जबाबदा-या घ्या आणि त्या पाळण्याचा प्रयत्न करा!

2 टिपणी/ टिपण्या:

Ma म्हणाले...

वाह! खुपच सुंदर पोस्ट आहे. सगळे पॉईंट्स कव्हर केल्या गेले आहेत.
ती न्युज मी पण पाहिली. खरोखरंच खुपंच आवघड झालंय काही लिहिणं.. मी तर कोणाचंही नांव लिहायचं नाही असं ठरवलंय... पण काही पोस्ट नावाशिवाय पुर्णच होऊ शकत नाहीत.
कूणाचे कंटॆंट खरे स्वतःचे आहेत हे तर वाचल्याबरोबर ताबडतोब कळते.अर्थात काही लोकांना कठीण शब्द आणी खास अलंकारिक भाषा वापरल्याशिवाय लिहिल्याचं समाधान होत नाही, त्यामुळॆ अगदी स्वतःचे असले तरी ते छापिल पोस्ट वाटते वाचायला. मला थोडं पर्सनलाइझ्ड पोस्ट्स आवडतात. साध्या सोप्या भाषेतिल... :)

अनामित म्हणाले...

आपण फारच छान माहिती दिली आहे. या "कंटेंट" चोरीचा अनुभव मला स्वत:ला सुद्धा आलेला आहे.
(माझ्याच एका मित्रानं माझ्याच ब्लॉगवरच्या पोस्ट जशाच्या तशा "कॉपी-पेस्ट" करुन स्वतःच्या ब्लॉगवर टाकल्यात.)
खरंच, आपल्या ब्लॉगवरच्या पोस्टची जबाबदारी आपलीच असते. मी नुकतंच पेपर मध्ये वाचलेलं, एकानी कुठुनतरी राजकारणाशी संबंधीत टिका कॉपी केलेली आणि स्वतःच्या ब्लॉगवर टाकलेली. टिकेचे ’लक्ष्य’ झालेल्या गटाने मग मुळ सोर्स आणि ह्याचा ब्लॉग - दोघांवरही कोर्टात दावा ठोकलाय. कोर्टानं ब्लॉगर विरोधात निकाल दिलाय. त्या निकालातच कोर्टानं म्हटलंय की, "तुमच्या ब्लॉगवर सुद्धा ते लिखाण झळकल्यामुळे तुम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहात, आणि म्हणुन तुम्ही सुद्धा या शिक्षेसाठी पात्र ठरता."
त्यामुळं, ब्लॉग लिहीणाऱ्यांनी तर सावधगीरी बाळगलीच पाहिजे, पण त्याहुन जास्त खबरदारी बाळगली पाहिजे ते चोरणाऱ्यांनी!