गुरुवार, २६ मार्च, २००९

तुम्हाला आठवतंय?

कधी कधी मला माझ्या जुन्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात.. नाही म्हटलं तर थोडा का होईना - एक फ्रेश मुड.... तुम्हाला आठवतयं:

१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्याच स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल जे हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!
नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक मेजवाणी असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टॅपरप्रुफ बौटल टौप्स" चा आता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचे.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड !

तहाण लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बौटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचडले हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशीवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!

खाण्यात अगदी केक, ब्रेड, चौकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डौक्टर - डौक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....

परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...

..... काय दिवस होते ते...!

स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ... आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..

................
.........................
................................

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का? .. हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा.... काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल... नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की... :)

[मला आलेल्या एका इ-मेलवर आधारीत - ही माझी मराठीतील आवॄत्ती]

10 टिपणी/ टिपण्या:

शेखर जोशी म्हणाले...

छान, वाचून स्मरणरंजनात गुंग झालो
शेखर जोशी

अनामित म्हणाले...

रात्री सिनेमा सुरु होण्या पूर्वी संसद समाचार !

ajay म्हणाले...

dolyant aanle pani...........

bumblebee... म्हणाले...

मंडळी,
काही आठवणी विसरण्यासाठी नसतातच मुळी! बरं वाटलं, माझ्या बरोबर तुमच्या आठवणींही ताझ्या झाल्या.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार!

असंच भेटत राहु!
भंगा..!

Nikhil म्हणाले...

chhan. junya athvani parat aalya. malaa waatla ki he sagle faqt malaach aathavte. Pan tu pan aahe mitraa.

अनामित म्हणाले...

Sahi re!!!
Junya aathvani tajya zalya!
You rock dude!

Gele te divas...
Chincha, kairya zadala dagad marun padaycha.
Cycle war hero banvun phirnyacha..
Unit test, semester test, final test che..
Mitran sobat tasan-tas gappa marayche.
ani barach kahi...

Anand

भुंगा म्हणाले...

@निखिल आणि आनंद
थँक्स गाइज! कीप कमिंग!

चिअर्स!

अनामित म्हणाले...

khupach cha

HAREKRISHNAJI म्हणाले...

आयु्ष्य किती साधे सोपे सरळ होते

भुंगा म्हणाले...

@हरेकॄष्णाजी,
हो ना... ! बालपणीचा काळ सुखाचा.... !!