पुणे - वाढते ट्राफिक - प्रदुषण आणि नॅनोचे आगमन!

नॅनो येतेय - येतेय म्हणता आलीच की हो! मात्र वाहनांनी अन वाहन चालकांनी पुण्याची काय वाट लावलीय ते आपल्यासमोरच आहे... आणि त्यात नॅनो ची भर! मला फक्त नॅनोच टार्गेट करायची नाही .. तर सांगायचे आहे की.. आमचे रस्ते आणि स्वतः आम्हीही उद्याच्या वाढत्या वाहतुकीच्या अन् प्रदुषणाच्या समस्येसाठी तयार आहोत का?

हुम्म! 
आता करायचे तरी काय?
आलीया भोगासी, असावे सादर |
भार देवा [टाटा?] वरी ठेवुनिया ||


का... खालील मुद्दे लक्षात घेऊन आम्ही काही संकल्प करु?

१. गाडीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीच करा.
... म्हणजे - कीमान अंतर १५-२०  की.मी. - एक मार्गे - असेल तर स्वतःचे वहानाने जा.

२. शक्यतो 'लिप्ट द्या - घ्या' - मात्र स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन!
... हो, म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीचे कौतुक सांगण्यासाठी कुणी तरी सापडेलच ना :)

३. खासगी वाहनांपेक्षा, बस किंवा शेअर्ड वेइकल चा वापर करा.
... आता हे म्हणजे - शाळा - औफिस - सिनेमा - फिरायला जाताना शक्यतो एकाच गाडीतुन जा.. कसं?

४. पुण्यातील आणि त्या अनुषंगाने - जागतिक प्रदुषण कमी करण्यासाठी मदत करा.
... आपल्या गाडीची वेळेवर सर्विसिंग वगैरे करुन.. शांत हौर्न बसवुन - गरज असेल तरच वाजवुन - गाडीतील डेकचा आवाज स्वतःला ऐकु येइल एवढाच ठेवा.. हा.. आम्हाला माहिती आहे, तुमच्या गाडीतला डेक लय झॅक वाजतो.. पण आमच्याकडेही आहे, हे लक्षात घ्या!

५. वाहतुकिचे नियम पाळा आणि दुस-यालाही - प्रसंगी - ते पाळण्यास भाग पाडा.
...सिग्नल तोडणे... नो-पार्किंग - वन-वे मध्ये घुसने... बस्स करा ना...  कुठे आपल्या आकलीचे तारे तोडता...?

६. मुलांना शक्यतो शाळेच्या बसनेच जाऊ द्या !
... हो.. समजले - तुम्हाला आपल्या मुलाच्या - मुलीच्या सुरक्षिततेबद्दल जरा जास्तच काळजी वाटते - म्हणुन तुम्ही स्वतः त्याला/ तिला सोडायला आणि आणायला जाता.. हो न्? पण तुम्ही सावधपणे चालवत असाल हो.. पण समोरच्याचं काय? तेंव्हा.. सबुरीनं आणि धिरानं घ्या!

कठीण प्रश्न आहेत?.. तुम्हाला वाटत असेल ना..

मला काय त्याचे.. ?
.... मग कुणाला? सध्याची परीस्थिती अशी आहे.. विचार करा - पुढच्या पिढीसाठी आपण हेच ठेवणार आहोत का?

रस्तेच ठीक नाहीत...!
.... म्हणुन काय तुम्ही गाडी चालवणं सोडलं नाही... ;)

सगळेच नियम तोडतात मग मीच नियम पाळायचा काय ठेका घेतलाय का?
... हां तर ठेका घ्या ना.. म्हणजे नियम पाळा... समोरच्याने नियम मोडला की राग येतोच ना..! किंवा एखाद्याची औनेस्टी बघुन 'मनातल्या मनात' तरी थँक्स म्हणावे वाटतं ना? तुम्ही ही तो "समोरचा औनेस्ट" बना ना!

आम्ही तु कोण रे आम्हांला सांगणारा?
... मी? तुमच्यातलाच एक... नियम पाळणारा ... पुण्याबद्द्ल.... अन् तुमच्याबद्दलही -  तळमळ वाटणारा ... माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी काय केलं - करु शकतोअसं विचारणारा ... कदाचित वरती म्हटल्या सारखा - समोरचा औनेस्ट [?]

आठवतयं?
कोईभी देश परफेक्ट नहीं होता... उसे परफेक्ट बनाना पडता है!


अजुन काय राहिलं का? ..मग सांगा ना!....
याच विषयांवर अजुन एक पोस्ट सापडली.. तिही वाचा!