स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]

तसा प्लान पु. ल. देशपांडे गार्डन [याकोहामा] पाहण्याचा होता.... मात्र गेटवर पोहोचल्या नंतर समजलं की बागेची टायमिंग आहेत- सकाळी ८-११ आणि ४-६ असं काही [नक्की आठवत नाहीत]..... मग वळालो - पेशवे पार्क कडे, तर तिथंही टाइम - १-२ बंद..... आता एकच पर्याय होता - स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]... आणि हा उघडा असतो याची मला पुर्ण खात्री होती!


.... छोकरीला बरोबर घेऊन हा पार्क पहिल्यांदाच बघितला... तसे बॅचलर असताना त्याच्या समोरच्याच सोसायटीत रहायचो.. त्यामुळे बर्‍याचदा तिकडेच पडिक असायचो आम्हीं. झाली या गोष्टीला आता जवळ - जवळ ६-७ वर्षे! असो.. साप बघितले - पुन्हा एकदा... पण कमी वाटले.. सुसर, मगर, कासव.. असेच काही....! आता पार्क बराच मोठा आणि मस्त बनवलाय... पांढरा वाघ, हत्ती, कोल्हा, लांडगा, अस्वल, निलगाय, हरिण, सांबर..... आणि बरेचसे प्राणी आहेत! यांची इंग्रजी नावं तिला सांगता सांगता मी माझे इंग्रजीचे दिवे पाजळत होतो!

चालतच सगळा पार्क फिरलो... जाताना छोकरी मस्त धावत पळत होती.. परतीला मात्र तिला उचलुन घ्यावं लागलं... बायको म्हणते - "तुझा अजुन एक ट्रेक झाला असं समज ;) " .... तसं आतमध्ये असलेल्या गाडीनेही - तिकिट काढुन - फिरता येतं!

बॅचलर असताना बर्‍याचदा आम्ही पाच-सहा मुलं या पार्क मध्ये उनाडक्या करायचो... म्हणजे कोपरे गाठुन बसलेल्या आणि चाळे करणार्‍या लव्ह - बर्डस् ना डिस्टर्ब करणे हाच हेतु असायचा. त्यापाठीमागे आमच्या प्रत्येकांची वेगवेगळी कारणं असायची.. काहींना वाटायचे .. साला आपल्याला जोपर्यंत गर्ल - फ्रेंड मिळत नाही... तो पर्यंत आपण अशांना डिवचायचे ... काहींजण उगाच मज्जा म्हणुन ... मी ही त्यांच्यातलाच एक.. पण मला वाटायचं [वाटतं] की हा पार्क [वा कुठलाही] चाळे करण्यासाठी असु नये.... येथे लहान - थोर - वयस्क लोकं येतात.. कीमान त्यांची तरी इज्जत राखा.... लहान मुलांच्या समोरच 'गुटर - गुं' चालायचं...! तेंव्हा स्कार्फ घालुन मुली स्वतःला सेफ करायच्या... तेच आजही आहे! पण बरंच कमी झालेलं दिसलं!


अधुन - मधुन पावसाच्या सरी येतच होत्या.. मात्र आम्ही ऐंजाय केला... ! सिंहगड रोडवरची पु. ल. देशपांडे गार्डन मस्त आहे असं ऐकलंय... बघु.. नेक्स्ट विकेंड!