तुमचा ब्लॉग आणि ब्लॉग हिटस् ..!

परवाच्या एका पोस्ट वरती श्री. रानडे यांनी ब्लॉग हिटस् कशा वाढवता येतील? असं विचारलं होतं. लागलीच उत्तर देता येणं शक्य नव्ह्त, म्हटलं सविस्तर लिहाव. कदाचित इतरांनाही उपयोगी पडेल. तर, ब्लॉग हिटस् वाढवण्यासाठी काही काही टेक्निकल गोष्टीही लागतात, जसं सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन वगैरे वगैरे. पण त्या आधी आपण काही इतर नॉन-टेक्निकल म्हणता येतील अशा गोष्टी पाहु.

१.तुमच्या ब्लॉगचे कंटेंटस् - ओरिजिन्यालिटी: हे सर्वात महत्त्वाचे. तुम्ही काय लिहिता, कसं लिहिता यावर तुमच्या ब्लॉगवर लोक येत असतात. ओरिजनल कंटेट्स असणार्‍या ब्लॉगवरच लोक वाचनं पसंद करतात. म्हणजे तुम्ही जर इतर साइट्स / ब्लॉग्ज वरुन कॉपी करुन पोस्ट करत असाल तर, लोकांना त्यात नविन काही वाटेल किंवा आवडेल असं सांगता येणार नाही. शिवाय ते ब्लॉगिंगच्या एथिक्स मध्ये बसत नाही, असंच मी म्हणेन. जर कंटेट्स इतर साइटवरुन घेतले असतील तर ते लिंक करा. मुळ लेखकाचा आदर करा! आता ओरिजनल कंटेंट्स लिहिण्यासाठी थोडं डोकं चालवावं लागतं हे ही खरंच! पण स्वतः लिहिलेले - मनमोकळे पणानं लिहिलेले पोस्ट्स वाचकांना नेहमीच भुरळ घालतात हेच खरं. उदा. दयायचं म्हटलं तर महेंद्र कुललर्णीं किंवा अनिकेत चा ब्लॉग वाचा. भन्नाट आणि बिंधास्त लिहितात हे. आणि म्हणुनच त्यांचे हिटस ५०००० पेक्षा अधिक आहेत. शिवाय खुद्द वर्डप्रेसच्या हॉट ब्लॉग लिस्ट मध्ये त्यांचे ब्लॉग आहेत!

२.कमेंटस् - प्रतिक्रिया: तुम्ही जर एखादी पोस्ट / ब्लॉग वाचलात तर आपलं - प्रामाणिक - मत जरूर नोंदवा. पटलं - नाही पटलं हे लिहा. त्यामुळे लिहिणार्‍यास चालना आणि लोकांपर्यंत आपले म्हणने पटल्याचा आनंद होतो. पुढील लिखानास उत्तेजनाही मिळते. आता त्यात तुमचा फायदा असा की, तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया - कमेंट ही त्या ब्लॉगवर येणार्‍या - कमेंट करणार्‍या दुसर्‍या वाचकाच्या नजरेस पडते. स्वतः कमेंट लिहिण्याआधी बरेच लोक, इतरांनी काय मतं मांडली आहेत हे वाचतात. त्यामुळे तो/ ती तुमच्या ब्लॉगवर येण्याची शक्यता असतेच. आहे ना फायदा!
आता ब्लॉगर म्हणुन येणार्‍या प्रतिक्रिया/ कमेंटस यांना उत्तर देण्याची जबाबदारीही तुमची आहेच. तेंव्हा, कुणी प्रतिकिया दिली तर त्याला उत्तर जरुर द्या! त्यामुळे ब्लॉगर आणि वाचक यांच्यामध्ये एक फ्रेंडली नातंही होऊन जातं आणि एक सोशल नेटवर्क तयार होऊन तुम्हाला "माऊथ पब्लिसिटी" चा ही फायदा होतो.

३.बॅक लिंक्सः आवडलेल्या ब्लॉगला जरुर फॉलो करा. परस्पर सहमतीने एक-मेकांच्या ब्लोगवरती लिंक एक्सचेंज करा. म्हणजे तुमच्या आवडत्या ब्लॉगची लिंग तुम्ही तुमच्या ब्लॉगवर द्या आणि बदल्यात तुमच्या ब्लॉगची लिंक त्या ब्लॉगवर टाकण्यास विनंती करा.

४.पोस्टचे नाव - टॅग्ज - लेबल्सः पोस्टचे नाव हे "कॅची" असावं म्हणजे क्युरॅसिटीनेही लोक तुमच्या ब्लॉगवर येतील. मात्र पोस्ट - लेख - नावाला धरुनच असावी. नाही तर पोस्टचे नाव "पुण्यात उडत्या तबकड्या" असं द्यायचं आणि लेख "स्वाईन फ्ल्यु" वर लिहायचा, असं करु नका. कदाचित सुरुवातीला काही लोक येतीलही, मात्र नंतर त्यांचा पोपट झाल्याचं पाहुन फिरकणारही नाहीत! तसेच पोस्टच्या खाली लेबल्स, टॅग्ज जरुर लिहा. त्यामुळे तुमचा ब्लॉग कॅटेगरायझ व्हायला मदत होते. शिवाय सर्च इंजिनमध्येही फायदेशीर ठरते!

५.सोशल नेटवर्किंग साइटस - फोरम्स - ट्विटर: जर तुम्ही ऑर्कुट/ फेसबुक वर असाल तर मित्रांना नविन पोस्टचे स्क्रॅप टाका.. मात्र त्यांचे पुर्ण पेज अशा स्क्रॅपनी भरुन नका टाकु. एखाद्या फोरम - किंवा डिस्कशन साइटवर रजिस्टर्ड असाल तर प्रोफाइल मध्ये आपल्या ब्लॉगचा उल्लेख करा.
ट्विटर ला रजिस्टर करा आणि आपले नेटवर्क - फॉलोअर्स - वाढवा - मायक्रोब्लॉगिंगचा हा प्लॅटफॉर्म तुमच्या ब्लॉगची पब्लिसिटी चांगलीच करु शकतो.

६.जाहिराती: जाहिरातींनी भरलेल्या ब्लॉगवर मी शक्यतो जात नाही. तिथं वाचण्यपेक्षा त्या जाहिरातीच त्रासदायक ठरतात. हां, तुम्ही गुगल एडसेन्स किंवा तत्सम जाहिराती वापरत असाल तर हरकत नाही. मात्र त्यांनी तुमचा ब्लॉग भरुन टाकु नका! जाहिराती - ब्लोगच्या डिझाइन प्रमाणे व्यवस्थित टाकलेल्या असाव्यात. पॉप अप वापरुच नका. अशा साइटस/ ब्लॉग्ज फार इरिटेट करतात. बरेच लोक पुन्हा अशा साइटवर येण्यास तयार नसतात.

७.ग्राफिक्स - फोटोज: फक्त टेक्स्ट असणारे पोस्ट वाचणे कंटाळवाणे असते. त्यामुळे तुमच्या पोस्ट मध्ये ग्राफिक्स - इमेजेस असणं महत्त्वाचं. आता फोटो किंवा ग्राफिक्स मिळवण्यासाठी ते कोणत्याही वेबसाइटवरुन घेणे योग्य नाही. घेतलेच तर - ग्राफिक्स *** या साइटवरुन घेतले असं नमुद करा. त्यामुळे तुमची बाभ़ळ बुडणार नाहे [गावची म्हण - नुकसान होणार नाही!] मात्र तुमचा प्रामाणिकपणा नक्कीच दिसुन येईल. शिवाय झिमँटा सारखी सुविधा आहेच या साठी!

८.ब्लॉग मीटर - एनालिटिक्स: तुमच्या ब्लॉगवर येणार्‍या विजिटर्सना ओळखा. म्हणजे ते कुठुन आले.... कसे - काय सर्च करुन आले? कोणत्या ब्लॉगवरुन आले? हे माहित करण्यासाठी गुगलचे एनालॅटिक्स ही सुविधा किंवा स्टॅट काऊंटर वापरा. यामुळे तुम्हाला तुमच्या विजिटर्सबद्द्ल बरीच माहिती मिळते. शिवाय गुगल वेबमास्टर टुल्स ही सुविधाही खास त्यासाठीच आहे. त्यावरही तुम्हाला बरीच माहिती मिळु शकते.

९.वाचकांचे म्हणने: वाचक काय वाचण्यात इंटरेस्टेड आहेत हे आपण लिहिलेल्या वेगवेगळ्या पोस्ट मधुन आपल्याला समजेलच. त्यामुळे मुद्द्याचं आणि गरज असेल तेवढंच लिहा. हजार ओळींची पोस्ट कंटाळवाणी ठरु शकते. त्यापेक्षा थोडक्यात लिहिलेली पोस्ट कधीही वाचणीय असते!

१०.रेग्युलर लिखाण: रेग्युलर लिखान तुमच्या ब्लॉगला जिवंत ठेवतं. रोजच लिहायला पाहिजे असं नाही.. किंवा रोजच फालतु - काहीही लिहुन फायदा होईल असं नाही. दोन दिवसांतुन एखादी पोस्ट - मात्र वाचण्यालायक लिहिली तर तुम्हाला चांगला वाचक वर्ग मिळु शकतो.

११. ई-मेल सिग्नेचर: तुम्ही जेंव्हाही एखादी मेल लिहिता, त्यामध्ये तुमच्या सिग्नेचर नंतर तुमच्या ब्लॉगची लिंक टाकल्यासही तुमच्या ब्लॉगची पब्लिसिटी होण्यास मदत होते. उदा. जीमेल - याहु - रेडिफ वगैरे. हो, मात्र ऑफिसच्या मेल मध्ये तसं करु नका म्हणजे झालं.

१२: ब्लॉग रीडर्स साईटः मराठीब्लॉग्ज.नेट, ब्लॉगअड्डा.कॉम, ब्लॉगवाणी.कॉम, ब्लॉगकॅटलॉग.कॉम, स्टंबलअपॉन्.कॉम या सारख्या साईटस् वरती आपला ब्लॉग जोडा. त्यासाठी त्यांचे विजेटही मिळतात. ते तुमच्या ब्लॉगवर टाका. या साइट ब्लॉगच्या डिरेक्टरीज किंवा एकत्रिकरण करतात. शिवाय सर्च इंजिनमध्ये त्यांचं रॅकिंग चांगलं असल्याने या साइट्स वरुनही तुम्हाला भरपुर हिट्स मिळु शकतात. उदा. माझ्या ब्लॉगवर सर्वात जास्त हिट्स"मराठीब्लॉग्ज. नेट" वरुन येतात.

१३. ब्लॉग डिझाइन: तुमच्या ब्लॉगचे डिझाइन हे थोडसं वेगळं असावं. कॉमन डिझाइन्स मनात भरत नाहीत त्यामुळे वाचक किंवा विजिटर लवकरच बोअर होतो. या बद्द्लची एक पोस्ट [ब्लॉगचे डिझाइन] मी आधी लिहिलिय ती वाचा.

आता सर्च इंजिन बद्द्लः
१.खाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगर / वर्डप्रेसच्या कोडमध्ये टाका.
तुमचा ब्लॉग जर फ्री वर्डप्रेस वर असेल तर हा कोड टाकता येणार नाही. मात्र तुमचे स्वत:चे होस्टींग घेऊन केलं असेल तर मात्र नक्कीच करता येइल!
... अपडेटः
ह्या दोन ओळी तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या कोड मध्ये टाकायच्या आहेत.
१. ब्लॉगरला लॉगिन करा.
२. लेआऊट टॅब वर क्लिक करा.
३. "Edit HTML" टॅबवर क्लिक करा.
<title>data:blog.pageTitle/></title>

दिसेल, त्याच्या लागलीच खाली ह्या दोन ओळी पेस्ट करा.
<meta name="Keywords" content="keywordOne, SecondKeyword, 3rdKeyword, add your won keywords here!"/>

<meta name="Description" content="This is my website. Add your own description here!"/>

४. कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन टेक्स्ट बदला.
५. सेव बटन क्लिक करा.... झालं

ह्या कोड मुळे सर्च इंजिन मध्ये दिसणारी तुमची लिंक त्या की-वर्ड साठी कॅटेगरायज होईल आणि लिंकच्या खाली दिसणारी ओळ ही तुमचे डिस्क्रीप्शन असेल.

२.तुमचा ब्लॉग गुगल, याहु, एम्.एस.एन/बिंग या सर्च इंजिनना सबमिट करा!

हुम्म.. झालं! काही वर्षांपुर्वी मी हेच काम प्रोफेशन चा भाग म्हणुन करत होतो.... सध्या नाही! त्यामुळे कदाचित अजुनही काही मुद्दे असतील!!