शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

कन्सर्न इंडिया फाऊंडेशन

दैनंदिनी: १२ सप्टें. २००९
सकाळी एस.बी.आय. च्या क्रेडिट कार्ड वाल्या बाईंच्या फोनने दिवसाची सुरुवात.... आता माझ्याकडे ऑलरेडी कार्डस् आहेत मात्र यात "काही खास आहे!" असं सांगुन पटवायचा प्रयत्न... हुम्म, कदाचित मी कार्ड घेइन!

बायकोचा वाढदिवस .. तिची गडबड.. संध्याकाळचं सेलिब्रेशन विथ - केक - आणि पिझ्झा, ठरलेलं!
संध्याकाळी दोन "इन्फि"वाले लोक - सोशलवर्क म्हणुन डोनेशनसाठी आले होते. ते दोघं एक सोशल टास्क म्हणुन - कन्सर्न इंडिया फाऊंडेशन - साठी विकेन्डला हे काम करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार - सध्या हे लोक चाइल्ड एब्युज - त्यात सापडलेल्या अल्पवयीन मुली यांच्या मेडिकल / टेस्ट साठी पैसे गोळा करत होते. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती!

बायकोच्या नावाने एक चेक दिला.. तेवढंच आमचीही मदत, फुल ना फुलाची पाकळी!

4 टिपणी/ टिपण्या:

मोगरा फुलला म्हणाले...

कन्सर्न इंडिया फाऊंडेशन चं नाव सांगत एक मुलगी गेल्या आठवड्यात माझ्याही घरी आली होती. नेहा नाव सांगितलं, आडनाव सांगायला तयार नाही. म्हणाली कन्सर्न इंडियाच्या ऑथरिटीज तिला चेहे-याने नाही, तर नावाने ओळखतात. ऑथरिटीजचा किंवा स्वत:चा मोबाईल नंबर द्यायला ती तयार नव्हती. आमच्या पारसी आडनावाचं महत्त्व लक्षात घेऊन पारसी लोक मदत करण्यात तत्पर असल्याचे दाखले दिले. वीस हजारच्या वरच्या डोनेशनचेच फॉर्म्स तिच्याकडे उपलब्ध होते. आम्ही तयार होतो या चांगल्या कामासाठी. पण कन्सर्न इंडिया फाऊंडेशनचा लॅंडलाईन नंबर तिच्याकडे उपलब्ध नव्हता. एल्फिन्स्टन रोडच्या ब्रॅन्चमधून आलेय असं म्हणाली पण तिने पत्ता काही सांगितला नाही. आय डी कार्ड बॅग मधे आहे असं म्हणाली पण दाखवलं नाही. ब्रोशर्स, पॅम्प्लेट्स जुनकट वाटत होते. तिच्यासोबत आलेल्या मुलीला ती तोंडावर मेंटली चॅलेंज्ड असं म्हणाली. मी आणि सासुबाई दोघीही अवाक्! तीच्याबरोबर आलेली मुलगीसुद्धा तिच्यावर रागावली. पुढे ही नेहा म्हणाली की चेक मी घेऊन जाईन पण काही चौकशी करायची असेल तर 1800 वाला टोल फ्री नंबर फिरवा. तिच्यावर विश्‍वास ठेवणं जड जात होतं म्हणून चेक नाही दिला. चेक कन्सर्नच्या नावाने दिला तरी त्यावर आपली सही असते ना! सासुबाईंनी कन्सर्न चा नंबर शोधून फोन केला. नेहा नावाची कुणीही मुलगी तिथे काम करत नाही असं कळलं.

भुंगा म्हणाले...

@मोगरा फुलला,
तुमचे म्हणने अगदी बरोबर आहे. अशाप्रकारे आलेल्या लोकांकडे प्राथमिक चौकशीमध्ये आइ.डी. कार्ड आणि त्या संस्थेबद्दल थोडी माहिती - ऑफिस वगैरे विचारुनच खात्री झाल्यावरच दान द्यावे.
शिवाय चेकच द्यावा - व त्या संस्थेच्या नावानेच चेक असावा. माझ्याबाबतीत मी हे आधी चौकशी करुनच चेक दिला.

Mahendra म्हणाले...

बायकोचा वाढदिवस १२ सप्टेंबर.. म्हणजे माझा वाढदिवस तुम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही... :)

भुंगा म्हणाले...

@महेंद्रजी,
हां अगदी खरं! आता मात्र आपला वाढदिवस विसरणे शक्य नाही.. !