मास्तरांना चरणस्पर्श नमस्कार!

दैनंदिनी: ५ सप्टें. २००९

पुन्हा असाच उनाड दिवस!

शेअर्स असलेल्या दोन कंपन्या आणि एका बॅकेचा एन्युअल रेपोर्ट मिळाले... बघुनच कोपर्‍यात ठेऊन दिले... असंही त्यातलं आपल्याला काय ** कळणार आहे? लाखाचे बारा हजार होतात हे ऐकलं होतं.. आता प्रत्यक्ष बघतोय!

शिक्षक दिनाच्या - निमित्ताने - शाळा, कॉलेजच्या काहीं आठवणी झाल्या.

हायस्कुलमध्ये - असताना मी ही एकदा ईतिहासाचा शिक्षक झालो होतो... तेंव्हा आधीच्या शिक्षकाच्या तासाला मुलांनी घातलेला गोंधळ पाहुन मी हातात छडी घेऊन गेलो होतो... उगाचच धाक धाकवण्यासाठी. माझा तास मात्र व्यवस्थित झाला... त्यानंतर कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा तास घेतला होता.. आमच्या लेक्चररनी डिक्लेअर केलेल्या चाप्टर वर... मस्त झाला होता.... कारण मी जे सांगत होतो ते सर्वांसाठीच नविन होतं.. त्यामुळे समजले किंवा नाही चा प्रश्नच येत नव्हता. हां, मी आधीच आमच्या लेक्चररकडुन त्या चाप्टरच्या नोटस् घेतल्या होत्या. त्यामुळे फक्त [कदाचित] मलाच माहित होतं की मी बरोबर तेच सांगतोय.

मात्र आज ते शिक्षक, ते कॉलेज यांच्यात फारच अंतर पडले आहे. मला मान्य आहे की यासाठी मीच जबाबदार आहे. कदाचित मला - आजही शिक्षक - विद्यार्थ्याचं ते नातं - अंतराने का होईना, जपता आलं असतं! विसरलेल्या त्या मास्तरांना, सरांना, लेक्चररांना आज आठवणीने - चरणस्पर्श नमस्कार!


.... असो.. हे असंच चालायचं.. रात्री ९ वा. एच. बी. ओ. वर एंजेलिना चा "वाटेंड" बघायचा आहे. ;-)
शुभ रात्री!