सोमवार, ७ सप्टेंबर, २००९

खतरों के खिलाडी - भाग दोन

दैनंदिनी. ७ सप्टें. २००९.
चार दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस... ९४ ई-मेल.. बर्‍याच एफ्.वाय.आय. च्या... कामाच्या फारच कमी.. चहाच्या कपाबरोबर सगळ्या वाचल्या... आणि कामाच्या बाजुला करुन कामाला प्रायारीटीनुसार सुरुवात.

खतरों के खिलाडी - भाग दोन:
संध्याकाळी, खास "खतरों के खिलाडी - भाग दोन" बघण्यासाठी वेळ काढुन ठेवलेला... १४ पोरी.. माफ करा - बायका - सगळ्याच काही ओळखीच्या नाहीत मात्र काही चेहरे जाने पेहचाने -आणि त्यांचे पार्टनर [१२]... सुरुवात तर चांगली झालीय.. विषेशतः गांडुळांनी भरलेल्या भांड्यातुन गांडुळे तोंडाने काढुन दुसर्‍या बॉक्स मध्ये - पार्टनरच्या डोक्यावर टाकणे जरा किळसवाणेच होते... ही ही ही! पण मज्जा आली असेल.. मला तर आली - बघायला...!

.. कलर चॅनलवरती मध्येच अमिताभची नविन "बिग बॉसची" जाहिरात पाहिलीत का? अच्छा, मला वाटतं यावेळच्या बिग बॉसमध्ये हे लोक असतील:
अमिताभ बच्चन, रेखा, दारासिंग, धर्मेंद्र, हेमा मालिनी, डॅनी, सुरेश ओबेरॉय, रीमा लागु

... अजुन काही तुम्हाला आठवताहेत?
विषेशतः "रेखाला कणीक मळताना" आणि हेमाजींना "कपडे धुतानाची" टास्क दिल्यावर काय होईल .... अमिताभ आणि धरमजी "शोले" च्या आठवणी बद्द्ल बोलताना काय काय सांगतील...अमिताभ - रेखा चोरुन भेटायचा प्रयत्न करतील का... धरम - हेमा पुन्हा जुळतील का? दारासिंग कीती तुप खायचे हे सांगतील का? सुरेश ओबेरॉय जुन्या आठवणींत काय सांगतील? डॅनी शोलेतील गब्बर असता तर? हे पाहताना - ऐकताना मज्जा येईल, नाही? ... उगाच माझं आपलं इमॅजिनेशन!
... तर, खके-२ च्या आजच्या भागात- शोनाली - चंदन [?] ची जोडी बाद - घरी परत! उद्याचा खेळ - उद्या पाहुच! शुभ रात्री!

4 टिपणी/ टिपण्या:

Mahendra म्हणाले...

मला तर किळस वाटते या शो ची. :(

भुंगा म्हणाले...

@महेंद्रजी,
किळसवाणं तर आहेच, पण इतर रटाळ कार्यक्रम पाहण्यापेक्षा हे बरं!
- आभार

shinu म्हणाले...

काही स्टंटस मस्त असतात पण ते सापाबिपाचे शी: घाण वाटते बघताना
बाय दी वे अमिताभ बिग बॊसमध्ये घरात रहायला नाही. अर्शद वारसी आणि शिल्पा शेट्टी जे करायचे ते बच्चनकाका करणार आहेत.

रेखा बिखा असेल तर मजाच येईल. प्रियांका चोप्रा यावेळच्या शो मध्ये आहे म्हणे

मला याआधीचे दोन्ही बिगबॊस आवडले होते. मस्त टीपी होतो. शिवाय रोज बघायलाच पाहिजे असं नाही.

भुंगा म्हणाले...

@शिनु,
आम्ही शिल्पाचा "बिग बॉस" बघितला होता... आणि त्यावेळी आम्ही यु.के. मध्ये होतो... सारेजण रात्री एकत्र जमायचो हा शो बघायला...
दुसर्‍या दिवशी ऑफिसातही चर्चा व्हायची...मज्जा यायची वाद घालायला..!

.. मग आता तुमचा आवडता शो येतोय म्हटल्यावर जाम खुश का?

आभार