सोमवार, २ नोव्हेंबर, २००९

चार दिवस आजारपणाचे!

... दिवाळी मस्त खाण्यात आणि गावी नातेवाईक फिरण्यात घालवली... पुण्यात आलो आणि ३-४ दिवसांतच तापाने फणफणलो... गुरुवारी संध्याकाळ पर्यंत ऑफिसमध्ये अगदी दात कुड-कुडण्यासारखी थंडी वाजु लागली... घरी येऊन कसाबसा फ्रेश झालो.. बेडवर पडताच अगदी हुडहुडी भरली... रात्रीपर्यंत ताप महाराज अगदी १०४ ला पोहोचले! त्यात अंगदुखी... या कुशीवरुन - त्या कुशीवर बदलायचे म्हणजे मला एखादा ट्रेक परवडेल अशी अवस्था झाली..! खोकुन - खोकुन, फुफ्फुस तोंडातुन बाहेर पडतंय की काय असं वाटायला लागलं! नशीब फॅमिली डॉक्टर हजर होते... लागलीच सुत्र फिरवली गेली... हिस्टरी तपासली गेली आणि साखर-गोळ्यांचे -[ हो.पॅथी ] डोस सुरु झाले!! स्वाईन - फ्लुची काळजी म्हणुन मुलगी आणि बायको माहेरीच [ जवळच आहे - ;) ] ... तीन दिवस ..... अगदीच क्वारंटाईन जगलो! नशिब स्वाईन फ्लु नाही निघाला.. देवच पावला म्हणायचं!


माझ्या मुलीनं - वेदिका - माझ्यासाठी बनवलेलं हे कार्ड! लकी बाबा ना? ;)

आज, तीन दिवसांनी .... मस्त टापरुन जेवलो... थोडा टी.व्ही. बघितला... मेल चेक केल्या.. आणि आता हे 'क्विक - पोस्ट'....कसं मोकळं - मोकळं वाटतंय... !

लहाणपणी शाळेला दांडी मारण्यासाठी बर्‍याचदा खोटं - खोटं आजारी पडायचं नाटक करायचो... अगदी नविन नविन नोकरी करायला लागलो होतो तेंव्हाही अशाच दांड्या मारायचो...! आजकाल मात्र असं करता नाही येत.. जबाबदारी म्हणा किंवा पहिल्यासारखं सफाईदारपणे खोटं बोलता येतं नसावं ;)

पूण्यात वाढत्या थंडीमुळे, स्वाईन फ्लु बरोबर आता आम्हास डेंगु - हिवतापाचाही सामना करायला तयार राहायचंय. काळजी घ्या!

11 टिपणी/ टिपण्या:

कांचन कराई म्हणाले...

कार्ड गोड आहे. खरंच लकी बाबा आहात. काळजी घ्या!

Mahendra म्हणाले...

.बरं झालं स्वाइन फ्लु नाही निघाला ते.. सगळ्या तपासण्या करुन घेणे कधिही चांगलं. थोडा आराम करा आता कांही दिवस.. :)

सिद्धार्थ म्हणाले...

मुलीने बनवलेले ग्रीटिंग कार्ड पाहून उरलेला आजार पळून गेला असेल. खरं ना? बाकी अजुन जरा आराम करा. चांगले ठणठणीत होऊनच कामाला जा.

भानस म्हणाले...

अरे बापरे![:(]ह्म्म्म....चला आता बरं वाटतेयं ना.जेवलास आणि पोस्टही आली म्हणजे हुश्शारीत आलास तर... छान. १०४ म्हणजे जरा जास्तीच झाला ताप, भरीला खोकला. काळजी घ्या( आता ती कशी घ्यायची हे मात्र कोडेच आहे:D )लेकीचे कार्ड मस्त आहे.

sagar म्हणाले...

Ekhdya aajaparnachi Lakshat thevavi ashee uttam aathavan mhanje lekine dilele Card.....Chan aahe....an ho Punyat sadhya sath aali disatiy karan mi hi 3 divas same tumchyaarkhach aajari hoto.....btw nice post

Vikas Shukla म्हणाले...

आजारातून लवकर बरे झालात आणि पुन्हा कार्यरत झालात हे वाचून आनंद् झाला. तुमचा मेल सुद्धा मिळाला.
माझी मुलगी सुद्धा लहान असल्यापासून असेच उठता बसता कार्ड बनवायची. कोणत्याही प्रसंगासाठी! आता आर्किटेक्ट बनतेय. बाय् द वे, तुमची लेक किती वर्षाची आहे?

Rohini म्हणाले...

लेकीने बनवलेले कार्ड खरच एकदम मस्त आहे. काळजी घ्या आणि लवकर ठणठणीत बरे व्हा :).

sachin म्हणाले...

तू काय रे जंगलात ला माणुस..तुला काहीही होणार नाही.....

बाकि वेदिका चे कार्ड खुपच छान , हृदयस्पर्शी आहे .
वेदिका ला अनेक आशीर्वाद .

सचिन

भुंगा म्हणाले...

@कांचन, महेंद्रजी, सिध्दार्थ, भानस, सागर, विकासजी, रोहिनी आणि सचिन ...

मंडळी, आपणा सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल अनेक आभार.
आजारपणातुन जवळ - जवळ बरा झालोय, मात्र कामाच्या गराड्यात पुरता बुडलोय. त्यामुळे सर्वांना एकत्र उत्तर देतोय.. माफ करा.
१ डिसे. ची रिलिज आहे तेंव्हा तोपर्यत जरा धिरानंच घ्यावं लागेल... अधुन - मधुन लिखाण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करीन :)

आपल्या भेटी/ प्रतिक्रिया येत राहुदद्यात!

shinu म्हणाले...

वा ताप पळाला हे बरेच झाले. लक्शणं वाचल्यावर नाही म्हटलं तरी काळजीच वाटली. :)

अपर्णा म्हणाले...

आतापर्यंत खडखडीत झाला असशीलच....आता पोस्ट येऊदेत...आणि कार्ड खूप छान आहे..लकी बाबा....:)