बुधवार, ३१ मार्च, २०१०

सारेच म्हणतात 'चेपेन - चेपेन'....

च्यायला [...शिवी असो वा नसो!].... वैताग आलाय नुसता.... नाही तर काय? किती दिवस झाले, एखादी पोस्ट लिहिन म्हणतोय.. पण कामाच्या *** घो! हो.. तुम्ही म्हणाल आता पोस्ट लिहायला तसा किती वेळ लागतो.. खरंय हो.. पण 'कंटाळा' नावाचाही एक प्रकार असतो... सगळ्यांकडेच.. कमी - जास्त प्रमाणात!

हां.. तर काय म्हणत होतो... ते - चेपेन - चेपेन.... आता हेच बघा ना:
काल त्या महान आय.सी.आय.सी.आय. बँकेने ई.सी.एस. न क्लिअर झाल्याने २७६ रु. [२५० + टॅक्स]चा चुना लावला. पण २५० रु. दंड जरा[?] जास्तच नाही का होत... आम्ही काय मुद्दामुन असं करतो काय?. तिकडे एच.डी.एफ.सी. ने ही १००रु. जास्त लावुन ई.एम्.आय. घेतला. लाईट-बिल चे "ऑटो - पे" मधेच उद्भवलं आणि होम-लोनच्या ई.सी.एस.ला काही रुपये कमी पडले. कदाचित वरती जेवढा दंड भरावा लागला ना.. तेवढेच असतील. च्यायला... चेपा - चेपा!

मार्च एंड आहे... जरां बँकानीही समजुन घ्यायला पाहिजे नां... पण असं कसं... बँक काय आमच्या 'बा'ची नाही... झालं... दंड भरला... शिवाय आता 'क्रेडीट हिस्टरी'वर ही ठपका लावला असेल या महान लोकांनी! चेपा - चेपा!

आणि आज सकाळी.. सोलापुर रोडवरुन एक महाशय - आपल्या टुकार [हो.. टुकारच.. नाहीतर काय एच.डी. म्हणु?] बाईकवर बायको आणि पुढं पोरगा बसवुन मस्त - सायकल ट्रॅक वरुन निघाले. पुढच्या चौकात मी डाव्या बाजुला - इंडिकेटर लावुन - वळत होतो - तर हे साहेब सरळ जाण्यासाठी अगदी समोर च आले. मीच थांबलो.. म्हटलं उगाच चिरडायला नको... तर हे अतिशहाणे - माझ्याकडेच अगदी खुन्नस खाऊन बघु लागले... बापरे... मी तर जाम घाबरलो... याचे डोळे फुटले - बिटले तर!! एक तर काडी पैलवान.. च्यायला एक ठोसा दिला तर होत्याचा नव्हता व्हायचा.. मागे बायको असली की अशांना जरा जास्तच जोर येतो... त्यात 'वहिणीसाहेब' तर दुर गेल्यावरही मोठे डोळे करुन अगदी 'प्रेमाणे' पहात होत्या... जणु म्हणतच होत्या - चेपा - चेपा!

अहो, महाराणी सायबा, जरा आपल्या सायबांनाच सांगा - "कारभारी दमानं..." एक तर बिगर हेल्मेट... त्यात सायकल ट्रॅक वरुन.. आणि त्यातल्या त्यात - डावीकडे वळणार्‍या वाहणांना न पाहता जणु सारे - सरळच निघालेत या तोर्‍यात निघालेत! मी आपला उगाचच स्वतःला समजावत होतो - "मामु... शांत! अंदर के शैतान को मत जगाव.. शांत बुलेटधारी... शांत...!"

हे एकच नाही... असे बरेच किस्से रोजच पाहतो... काही वेळा तर अगदी पॅरलल गाडी चालवत जाणारे यार - दोस्तही दिसतात. असे हे लोक... पण एक आहे... असे लोक त्यांच्या मित्रांमध्ये आवडते असतात... मलाही आवडतात... काही दिवसांनी ते इतरांचेही आवडते होतात.... आणि मग शेवटी 'देवाचेही आवडते' होतात.... आमच्यासारखे फक्त नाममात्र - कारणमात्र होतात!

स्वाहा!

15 टिपणी/ टिपण्या:

sachin म्हणाले...

जय हो .. च्यायला आपण मारे २१व्या शतकाच्या भाषा करतो पण तो फक्त "एक नंबरच राहणार". जो पर्यंत बेसिक गोष्टी लोकांच्या रक्तात भिनत नाहीत तो पर्यंत कितीहि विकास झाला तरी त्याचा काहीही उपयोग नाही .
आणि हे स्वयमशासन आहे . पोलीच्या/शासनाच्या भीतीने कोणीही कायदा पाळेल.परंतु पोलीस नसताना स्वतः तसे नियम पाळणे हे महत्वाचे आहे.

सिद्धार्थ म्हणाले...

अश्या लोकांनी आमावास्येला बाइक बरोबर स्व:तच्या गळ्यात देखील लिंबू मिरची बांधावी. न जाणो शैतानाची नजर लागायची.

भुंगा म्हणाले...

@सचिन,
हो रे.. साला.. अशा लोकांना एकदा तरी ठोकायलाच पाहिजे... रक्तात नाही भिनले तरी डोक्यात नक्कीच घुसेल!

@सिद्धार्थ,
नजर लागायचीच राव..!

मनमौजी म्हणाले...

सोलापूर रोडवर हे नमुने रोजच असतात. . . चोर तर चोर वर शिरजोर अशी स्थिती आहे!!!

आनंद पत्रे म्हणाले...

रोड त्यांच्या बा ने बांधला असेल, त्यांचा अधिकारच आहे, आपण फक्त टॅक्स भरायचा...

भुंगा म्हणाले...

@मनमौजी,
हो, हडपसर - सोलापूर रोड.. तो सायकल मार्ग काय किंवा बी.आर.टी. चा मार्ग काय...हे नमुने सगळीकडेच घुसताहेत!

@आनंद,
तेच्या बा'चा बी घो!
काही म्हणा... असा एखादा तरी आपल्या हातुन "देवाला आवडणार"!

विशाल तेलंग्रे म्हणाले...

लय दिवसांनी एकदम झकाऽऽस पोस्ट लिव्हलिय भाऊ.. असे करंटे लोकं तर आमच्या औरंगाबादेत मेंढरांसारखे इकडे तिकडे टवाळक्या करत असतात. अन त्यात आपले पोलिस लोकं, त्यायला सोडून दुचाकीस्वारांनाच (बुलेटधारी???) धरतात!!!! ;)

तुझी स्थिती तर आता संदीप खरेच्या नविन गाण्यासारखीच झालेली दिसतेय: "साहेब म्हणतो चेपेन चेपेन, पोलिस म्हणतो चेपेन चेपेन, सारचे म्हणतात चेपेन चेपेन...!"

असो, ग्रेट लिव्हलंय.. आमच्या ब्लॉगवर तर दुष्काळच पडलाय पोस्टायचा..! काय करणार, उन्हाळा एवढा तपतोय ना...! ;)

- विशल्या!

हेरंब म्हणाले...

>>"शांत बुलेटधारी... शांत...!"
हा हा हा.

एवढी चीडचीड आणि एवढ्या संयत शब्दात छान व्यक्त झालीये..

भुंगा म्हणाले...

@विशाल,
अरे त्या संदीपच्या गाण्यावरुनच तसं लिव्हलंय! सगळीकडेच एकंदरीत अशी परिस्थिती आहे!

@हेरंब,
अरे फार वैताग येतो.. पण उगाच रक्त आठवण्यात काय अर्थ आहे.. अशा वीरांना जन्माची अद्दल घडेल असं काहीतरी करायला पाहिजे.. नाहीतर वरती म्हटल्यासारखं, एक दिवस आपण कोणासाठी तरी 'कारण' होणार - असंच म्हणावं, नाही का?

भानस म्हणाले...

'वहिणीसाहेब' तर दुर गेल्यावरही मोठे डोळे करुन अगदी 'प्रेमाणे' पहात होत्या... जणु म्हणतच होत्या - चेपा - चेपा!...... हा हा..... खरे आहे. रोड सेन्स झिरो.... कुठूनही गल्लीतून मेनरोडला जॉईन व्हायचे तेही भन्नाट स्पिडमध्ये आणि मग कोणी यांच्यामुळे तडफडले आणि काही बोलले किंवा आपटले की हेच अस्तन्या वर करणार..... जीव तर कोंबडीएवढा पण फडफड किती..... मस्त चिडचिडला आहेस अगदी... :)

nivedita म्हणाले...

छान लिहिले आहे . अशा लोकांना पोलीस लोक पकडत का नाहीत ?
मुद्दाम कानाडोळा का केला जातो हा एक गहन प्रश्न आहे ...
बरोबर न ?

भुंगा म्हणाले...

@श्री,
मी तर अशा लोकांच्या पाठीमागे बसणार्‍यांनाही दोषी मानतो. त्यांनी आधीच आपल्या 'ड्रायव्हर' ला वाहतुक नियम पाळण्याबाबत सांगावं.. नंतर आम्ही जबाबदार नाही ब्वॉ!

@निवेदिता,
पोलिस पकडतात.. 'चलान' कापुन - व्हा पुढे.. एवढंच.... ! अशांसाठी 'ठोकणे' हाच मार्ग!

Hapi म्हणाले...

hello... hapi blogging... have a nice day! just visiting here....

Maithili म्हणाले...

Bharrriii..... :)

sahajach म्हणाले...

जामच सही लिहीलयेस....

वहिणीसाहेब, प्रेमाणे सहीच!!! शांत बुलेटधारी :)

शेवट तर भन्नाट असे लोक ’देवाचेही आवडते’ होतात आम्ही निमित्तमात्र....मस्तच पोस्ट रे!!!