गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

कारणे द्या - क्रेडिट कार्ड रद्द केले!

ही एक शासनाची - राष्ट्रीय बँक. टेलिमार्केटींग वाल्यांच्या वारंवार येणार्‍या कॉल्सना मान देवुन कार्डसाठी हो म्हणालो. कडक वेरिफिकेशन होऊन कार्ड मंजुर झालं आणि कार्ड मिळायच्या आधी बीलही मिळाले. पण त्यातील काही गोष्टी खटकल्या... आणि सदर क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला.


कारणे:
१. जॉयनिंग फीस रु. ५०० आहे - हे कार्ड घेताना सांगितले नव्हते.
- सध्या तर कोणतीच बँक अशी फी लादत नाही!
२. जर वार्षिक रु. ५०,००० कार्डावर नाही खर्च केले तर वार्षिक फी भरावी लागेल.
- अहो, म्हणजे ५०० रु. वाचवण्यासाठी मी ५०,००० रु. खर्चु का? शिवाय ही फीसही इतर बॅका लावत नाहीत!
३. अ‍ॅक्सिडेंटल इंशोरंच्या नावाखाली दरमहा रु. ५० द्यावे लागतील! रद्द करता येईल - मात्र याबाबत बोलणे होण्याआधीच हा भाग बिलात जोडण्यात आला होता.
- त्यातही फक्त 'मेलात' वा 'कायमस्वरुपी अपंग' झाला तरच क्लेम करता येतो. क्लेम नाही केला तर पैसे बुडीत! त्यापेक्षा मी वेगळी मेडिकल/ इंशोरंस घेईन. क्लेम नाही केला तर कीमान पुढच्या वर्षीच्या इंशोरंसवर काही प्रमाणात सुट तरी मिळते!
४. सांगण्यात आलेले २-५% कॅशबॅक - सगळीकडेच चालत नाही - काही ठराविक दुकानातच चालतं!
- कॅशबॅक साठी निवडलेले शॉप्स/ ब्रँड्स आपल्याला परवडेबल नाहीतच. अहो - २०० रु. सुट मिळेल म्हणुन तुम्ही २-३ हजाराचा सुट असाच घ्याल का? मी तर नाही ब्वॉ!
५. फोन करुन वरील माहिती विचारल्यावर - जॉयनिंग फी मध्ये ५०% सुट देण्याचे अमिश दाखवले - म्हणजे चुक मान्य केल्यासारखंच ना ?
- फोन वरील संभाषणासाठी मराठी भाषा निवडण्याची सोय - मस्तच! मात्र जेंव्हा बोलण्यासाठी एखादा/ एखादी उत्तर देतो/ देते, तेंव्हा मात्र हिंदी किंवा इंग्रजीतुनच बोलणारा/री भेटतो/ते. विचारलं तर म्हणे - आमच्या कडे मराठी बोलणारं कुणी सध्या उपलब्ध नाही. अहो, मग भाषांची निवड करण्याची नाटकं कशाला करता?

हां, तर जॉयनिंग फी बद्दल मी सांगिललं की हे मला आधी सांगण्यात आलं नव्हतं - आणि मी ती फी देणार नाही. जमत नसेल तर कार्ड रद्द करा. तर म्हणे - आमच्या मॅनेजरने ५०% सुट दिलीय!
मी तिला अगदी हळुवार सांगिललं - मॅडम - तुम्हाला आणि तुमच्या मॅनेजरला "हॅपी दिवाळी!" सांगा. मला कोणतीही दिवाळी ५०% ऑफ ची ऑफर नकोय! वरील मुद्दे मान्य नसतील तर ताबडतोब कार्ड रद्द करा! धन्यवाद!

वरील प्रकारामुळे या बँकेच्या च्या क्रेडिट कार्ड शाखेवरील माझ्या विश्वासाला तडा गेला. एक प्रकारच्या फसवणुकीची जाणीव झाली आणि म्हणुन सदर कार्ड बंद करण्यास सांगितले. तुम्हीही अशा प्रकारची कार्ड घेताना - घेतल्यावर ते वापरण्याआधी - अ‍ॅक्टेवेट करण्याआधी - व्यवस्थित माहिती जाणुन घ्या!

6 टिपणी/ टिपण्या:

सिद्धार्थ म्हणाले...

राष्ट्रीय बँकेचा हाच अनुभव मला देखील आला. जॉयनिंग फी नाही लागली पण कार्ड न वापरता देखील अ‍ॅक्सिडेंटल इंशोरंच्या नावाखाली दरमहा रु. ५० आपोआप मागे लागले. ४ महिने झाले कार्ड बिलकुल वापरलं नाही पण चे २०० रु आणि ते न भराल्याची लेट-फी मागे लागली. कार्ड रद्द केलं पण अजुन ही काही मेसेज येतं रहातात. एक मित्र म्हणाला की उद्या जर कुठल्या बँकेकडे तू गृह कर्ज घ्यायला गेलास तर ह्या गोष्टीचा इश्यू केला जाऊ शकतो. बघू...

Vikrant Deshmukh... म्हणाले...

ही क्रेडीट कार्डवाली मंडळी असेच गोड बोलून आणि नको तितके मागे लागून कार्ड गळ्यात मारतात. तुझ्यासारखे जागृत ग्राहक अपवादानेच असतील.. बाकी लोक फुकट यांची भरती करत राहत असणार !!!
लाईफस्टाईलने फायद्याबरोबर अडचणीही आणल्या हो !!

भुंगा म्हणाले...

@सिद्धार्थ,
असं कार्ड कॅसल करण्याने "क्रेडीट हिस्टरी" खराब होऊ शकते. पण वेळेत बंद केल्याने किमान डिफॉल्टर तर नाही बनत ना! गरजेतील कर्जाच्या वेळी व्यवथित हा मुद्दा मांडला तर कर्ज मिळण्यास काही अडचण नाही येणार!

@विक्रांत,
हो रे.. क्रेडीड कार्ड जर जाणीवपुर्वक नाही वापरले तर फार अवघड परीस्थिती निर्माण होऊ शकते. मी तर काहींना अगदी पर्सनल लोन घेऊन कार्ड चे पेमेंट करताना पाहिलय! जागरुकता ही हवीच!

साधक म्हणाले...

अहो हे क्रेडिट कार्ड वाले आपल्याला गृहित धरतात. तुम्ही जे केलें ते अगदी योग्य.. सर्वांनी हाच मार्ग अवलंबिला तर सुतासारखे सरळ होतील ते.

ArSh म्हणाले...

श्री. भुंगा,

तुमचा हा अनुभव एका बॅंकेचा असेल, परंतु मला २ तरी खासगी बॅंकांकडून असाच अनुभव येता येता वाचला. एकदा माझे बचत खाते असलेल्या बॅंकेने परस्पर credit card पाठवून दिले. एकदा मी काम करत असलेल्या कचेरीतील सर्वन्ना credit card पाठवून दिले. सुदैवाने नवर्‍याने सांगितले अजिबात वापरू नकोस. पहिले पत्र आले त्यात ह्या एवढ्या अटी अ नियम. सुदैवाने पहिल्या वापरापर्यंत card activate होत नाही. मग cancel केले. पण उगाच नको असताना बॅंकांनी अगोचरपणा करायचा आणि आपले काम वाढवायचे हे काही बरोबर नाही

Ashish Sawant म्हणाले...

भून्गेश,
जरा तुला खरच क्रेडीट कार्ड ची गरज असेल तर त्या बँकेच्या वेबसाईट वर जायचे आणि तेथून कार्ड अप्लाय करायचे. तेथे ज्या अटी आणि नियम दिलेले असतात. त्या RBI कडे जमा केलेल्या असतात. त्यामुळे त्या मध्ये त्यांना फसवता येत नाही. जेव्हा वेबसाईट वरून कार्ड अप्प्लाय कराल तेव्हा प्रत्येक स्क्रीन चा फोटो (प्रिंट स्क्रीन) घेऊन ठेवायचा. मार्केटिंग वाले आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीही सांगू शकतात. त्यामुळे बँकेच्या वेबसाईट वर जाऊन करणे अति उत्तम.
दुसरे महत्वाचे क्रेडीट कार्ड, लोन वगैरे घ्यायच्या आधी दहा वेळा विचार करावा. एक घेऊन रद्द केले मग दुसरे घेतले व काही दिवसांनी ते रद्द करून तिसरे घेतले कि तुमची क्रेडीट हिस्ट्री खराब होते. ती सरकारच्या एका महत्वाच्या खात्यात जमा होत असते.त्यामुळे जेव्हा खरच तुम्हाला गृह कर्ज किवा खाजगी कर्ज पाहिजे असते त्यावेळा बॅंका ते तुम्हाला नाकारू शकतात आणि तुम्ही त्याबद्दल तक्रार हि करू शकत नाही.
p.s. - मी सध्या कोटक बँकेचे क्रेडीट कार्ड वापरत आहे आणि दोन वर्षे तर मला अजून काही तक्रार नाही आहे. मी ते बँकेच्या वेबसाईट वर जाऊन घेतले होते.