रविवार, ६ मे, २०१२

सत्यमेव जयते

व्यावसायिक जगात परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखल्या जाणार्‍या आमीर खान ने अगदी ज्वलंत विषयालाच वाचा फोडणारा कार्यक्रम केलाय. दुरदर्शन ते स्टार उत्सव, स्टार प्रवाह, स्टार प्लस अशा वेगगेगळ्या वाहिण्यावर हा कार्यक्रम चालु आहे. आसपास घडणार्‍या ज्या गोष्टींवर आपण फक्त बोलतोच त्याच गोष्टींची - ज्वलंत प्रश्नांची अगदी मुद्देसुद माहिती देणारा हा कार्यक्रम तुम्हा-आम्हांला नक्कीच विचार करायला लावेल.


येणार्‍या भागांत असे अनेक विषय असतील... आजपासुन रविवारचा ११ ते १२.३० हा वेळ "सत्यमेव जयते" साठी राखीव असेल. या कार्यक्रमाचे भाग सत्यमेव जयते च्या संकेतस्थळावर आपल्या भाषेतही पाहता येतील.

अपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग! अशी एक पोस्ट या आधी लिहिली होती. आज आमीर खानच्या "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात हाच विषय अगदी मुद्देसुद मांडलेला पाहिला. मुलगाच पाहिजे हा हट्ट [नाही - विकृती] किती विकोपाला गेलाय याची ही पावतीच!आपल्याच आसपास घोंगावणार्‍या या वावटळात किती बालिकांचे बळी गेलेत - ३ करोड! कार्यक्रमात दाखवलेले वय ३५ पेक्षा अधिक असणारे पुरुष, लग्नासाठी विकत घेतल्या जाणार्‍या महिला.. सुशिक्षित घरांतील व्यक्ती... पैशासाठी गर्भपात करणारे डॉक्टर्स.. सारं कसं भयानक..!

3 टिपणी/ टिपण्या:

अपर्णा म्हणाले...

भुंगा हा कार्यक्रम कुठे अपलोड केला आहे का? कारण त्याची यु ट्युब लिंक अमेरीकेत ब्लॉक आहे....पाहायला नक्की आवडेल...

Dipak Shinde म्हणाले...

@अपर्णा,
सत्यमेव जयतेच्या संकेतस्थळावर हे सर्व भाग पाहता येतील = http://www.satyamevjayate.in/

Ninad Kulkarni म्हणाले...

शाहू फुल्यांच्या महाराष्ट्रात सुद्धा भ्रूणहत्याने बाळसे धरले आहे.
कायद्याला पायदळी तुडवणारे व डॉक्टर व त्याच्याकडे जाणारे पेशंट ह्यांना कायदा हातात घेऊन कडक शासन केले पाहिजे.