आमची काही कर्तव्ये..!

आजकाल सर्वचजण आपले हक्क आणि कर्तव्ये यावर बोलतात.. चांगले आहे, पण मुळात कीती लोक "स्वतःला" ग्राह्य धरुन बोलतात? पुण्याच्या वाहतुकीविषयी जो तो बोलतो.. अहो, पण आपण स्वतः वाहतुक नियम किती पाळतो? सिग्नला सर्वात पुढे थांबण्यासाठी आपण किती कसरत करतो? झेब्रा क्रौसिंग किंवा पांढ-या रेषेआधी किती लोक उभारताना दिसतात? सिग्नलचा दिवा हिरवा होईपर्यंत आपणास धीर असतो का? १०-१५ सेकंद बाकी असतानाच आपल्यामधील कीती बहाद्दर आपली अक्कल दाखवत निघुन जातात! आपण कीती वेळा चुकिच्या बाजुने ओव्हरटेक करता..? दुस-या वाहनाला पुढे जाण्यासाठी आपण रस्ता देतो का? उजवीकडे / डावीकडे वळताना आपण योग्य ईशारे करतो का..? इंडीकेटर्स लावतो का? असे एक ना दोन... कीती तरी प्रश्न..!

ब-याच वेळा मित्र-मैत्रीणी रस्त्यावर समांतर गाड्या चालवतात.. अहो.. गप्पाच मारायच्या आहेत तर थोडे थांबा... एखादे ठीकाण निवडा.. निवांत बसा.... गप्पा मारा... आणि मग पुढचा प्रवास करा...!

मंडळी, खरंच, विचार करा... एकटा मी हे सर्व बदलू नाही शकत, मात्र आपण सर्व मिळुन हे परीस्थिती बदलु शकतो..!

सांगायचा मुददा हाच की, पुण्याची वाहतुक व्यवस्था बदलण्यासाठी कुणी महापुरुष येणार नाही... काही जादु होणार नाही... अहो, आपणच हे बदलु शकतो ... सुरुवात तर करुया..!!

** मी हे बोलतोय, कारण मी स्वतः वाहतुकीचे नियम पाळतो आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे.