नविन बुलेट घेतल्यापासुन.....

व्यायामाच्या नावाने शिमगा करणारा मी,
पोटाच्या नगा-याची - डफली करण्यासाठी व्यायाम करु लागलोय...
सिगारेट सोडुन, काजु - बादाम खाऊ लागलोय...
नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय...

आगाळ-बगाळ अवतारात वावणारा मी,
आता 'टिप-टॉप' राहु लागलोय,
खुरट्या दाडीच्या जागी स्टायलिश 'फ्रेंच कट' करु लागलोय,
नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय...

सिग्नल तोडण्यात धन्यता माणनारा मी,
आता प्रामाणिकपणे सिग्नलला थांबु लागलोय...
वाहतुकीचे नियम जरा जास्तच पाळू लागलोय,
नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय...

वा-याशी स्पर्धा करणारा मी,
आता ४० चे बंधन पाळू लागलोय...
स्वतःबरोबर ईतरांचीही सुरक्षितता समजायला लागलोय,
नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय...

महिन्याला दोन-तीन हजाराचं पेट्रोल फुकणारा मी,
आता फक्त गरजेपुरतीच गाडी वापरु लगलोय...
इंधन वाचवण्याच्या त्या हाकेला 'ओ' देऊ लागलोय,
नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय...

ऑफिसला 'दांडी' मारण्यात तरबेज असणारा मी,
आता 'बुलेट' चालवण्यासाठी नियमित ऑफिसला जाऊ लागलोय....
प्रोजेक्टच्या 'डेड-लाईन' आधीच, काम पुर्ण करु लागलोय,
नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय...
खरंच... नविन बुलेट घेतल्यापासुन मी जरा बदलू लागलोय......!!

...भुंगा!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
wah wah, wah wah,
amhala pan jara tumcha bullet cha photo baghu dya!

Andy