इंटरनेट बँकिंग करणा-यांनो - सावधान !

"आपले बँक अकाउंट चालु ठेवण्यासाठी आपली माहिती अपडेट करा" अशा आशयाचा हा इ-मेल मला आज आला... प्रथमदर्शनी बँकेचाच वाटणारा हा इ-मेल नकली असुन त्याद्वारे खातेदाराची माहिती इंटरनेटवरुन मिळवली जाते...! एकदा का तुम्ही माहिती देणारा तो फार्म/ अर्ज भरला... मग काय... तुमचे खाते आणि फुकट खाणारा कुणी दुसरा ..! एक-दोन आठवड्यांपुर्वी मी एका न्युज चॅनेलवर दिल्लीत या संदर्भात घडलेला किस्सा पाहिला होता... आणि आज अनुभवास आला सुद्धा ..!


अशा प्रकारच्या इ-मेल जरा काळजीपुर्वकच हाताळा ... म्हणजे,
१. हा इ-मेल खरोखरच आपल्या बँकेने पाठविला असल्याची फोन करुन खात्री करा ... मात्र माझ्या माहितीनुसार कोणतीही बँक अशा प्रकारचा माहिती अपडेट करण्याबाबतचा मेल पाठवत नाही..
२. अशा प्रकाराची आपल्या बँकेला ताबडतोब माहिती द्या..
३. ब्राउजर म्हणुन शक्यतो "फायरफौक्स" वापरा ... माझ्या बाबतीत "ही वेबसाईट नकली असल्याची" नोटिस याच ब्राउजरने दाखवली ..!
४. शक्य असल्यास आपल्या संबधातील सर्वांना या बाबत जाग्रत करा.


औनलाईन बँकिंग हे आपल्याच फायद्याचे असल्याने त्याचा वापर करताना जागरुकता ही हवीच, नाही का?

...भुंगा!

टिप्पण्या

परिचित... म्हणाले…
खरच रे भुंगा,
आज कालच्या जगात फटा फट मनी बनवण्यासाठी माणूस काय काय करील माहित नाही. त्याचाच परिणाम हे मेल्स. साले कुठून कुठून अश्या आयडिया आणतात काय माहित..असो.
भुंगा...आपण फार डिटेल अशी माहिती दिलीत त्या बद्दल फार फार आभार. माझ्या मित्रांना पण सांगेन मी हे सगळ, त्यांना नक्कीच कामात पडेल.