"बिइंग सोशल" किंवा "बिइंग ह्युमन" म्हणुन..?

"बिइंग सोशल" किंवा "बिइंग ह्युमन" म्हणुन, मला वाटतं, प्रत्येकानं काही ना काही डोनेट करावं... आता यांत काही कंपलशन नाही... काहींना नसेल असं वाटत!

YANGON, MYANMAR - APRIL 24:   A mother holds h...Image by Getty Images via Daylife

सध्यातरी मी कोणत्याही मोठ्या संस्थेला डोनेशन देण्याच्या मुडमध्ये नाही. कारण - मला वाटतं आपण दिलेल्या डोनेशनच्या पैशाचा योग्य उपयोग - सदुपयोग - होतोय यबद्दल मी [एकटाच?] बराच साशंक असतो. त्यामुळे गेल्या वर्षी गावच्या शाळेत ४०० वह्या वडिलांमार्फत दिल्या. यावर्षी चं डोनेशनचं पैसे [रु.५०००] जुन्या एका मित्राच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी दिले. आता तुम्ही म्हणाल - या स्लोडाऊन - रिसेशन मध्ये जिथं आमचंच कसंतरी भागतंय तिथं डोनशनचा प्रश्न येतोच कुठे... असो! पण माझ्यासाठे पैसे साठवण्याचा एक [नवा!] पर्याय यावर्षी खुला झालाय. तो म्हणजे - स्मोकिंक सोडलंय!! म्हणजे आता किमान दर दिवशी मी अंदाजे रु. २० तरी वाचवु शकतो. [ ४ गोल्ड फ्लॅक * ५ = २० * ३० [दिवस] * १२ [महिने] = रु. ४८०० दर वर्षी ] . शिवाय मी वाढदिवस अगदिच ओवाळणी करुन करतो, म्हणजे अंदाजे रु. ५०० तरी शिल्लक पडलेच ना! झालं ना - एका वर्षाचं डोनेशन!

आता प्रत्येकाचं डोनेशन करण्यची पध्दत वेगळी असु शकते. माझे काही मित्र श्रमदान करतात.. काही अंध मुलांच्या शाळेत जाऊन अन्न दान करतात... काही रक्तदान करतात तर काही माझ्यासारखं किंवा माझ्याच डोनेशन मध्ये शेअर करतात....असंच आणखीन काही..! तुम्हीही कोणत्या न् कोणत्या पध्दतीने डोनेशन करतच असाल ना?

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

Mahendra म्हणाले…
चांगली कल्पना आहे. मी पण स्मोकर होतो. आता दोन वर्षापासुन अजिबात स्मोकिंग करित नाही.तेंव्हा हा विचार करायला हरकत नाही. रक्तदान तर नेहेमीच करतो.
रोहिणी म्हणाले…
Nice thought.... आम्ही राहतो तिथे जवळच एक संस्था आहे. ते लोकं गरजु वयस्कर लोकांना सकाळचं ताजं आणि सकस जेवण रोज मोफत पुरवतात. साधारण दिडशे आजीआजोबा तिथे रोज जेवुन तृप्त होतात. एका इवेंट च्या निमित्ताने तिथे जायचा योग आला आणि तेव्हापासुन आम्ही घरातील कुणाचा वाढदिवस असला किंवा कुणाचा स्मरणदिन असला आणि शिवाय अधुन मधुन कधी वाटलं तर तिथे जातो आणि त्या दिवशी जमलं तर जेवण, कधी गोड असं काहिबाही स्पॉन्सर करतो. तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही देउ शकता. त्यात दिडशे लोकांसाठी काय मेनु ठरवता येइल हे तिथले स्वयंसेवक बघतात आणि तुम्हाला सांगतात. मग ठरल्या दिवशी तुम्ही तिथे जायचं पैसे द्यायचे रितसर पावती घ्यायची आणि डोळ्यांसमोर अनेक आजीआजोबांना पोटभर जेवुन तृप्त होताना बघायचं आणि नंतर त्यांचे कापरे हात जेव्हा डोक्यावरुन फिरतात तेव्हा त्यांचं समाधान आपल्याच डोळ्यांतुन वाहायला लागतं. असं म्हणतात की केलेल्या दानाचा कधी उल्लेख करु नये ती आत्मप्रौढी ठरु शकते पण मला इथे उल्लेख करावासा वाटला कारण पुढे मागे कोणि हे वाचुन असा काही उपक्रम भारतात सुरु केला तर तेवढीच माझ्याकडुन फुल ना फुलाची पाकळी. ( भारतात असा उपक्रम नक्किच सुरु असेलही. पण मला माहिती नाही. कुणाला माहिती असल्यास जरुर कळवा. धन्यवाद. )
Satish Gawde म्हणाले…
अगदी साध्या साध्या गोष्टींमधून पैसा वाचवून तो डोनेशन साठी वापरता येऊ शकतो हा विचारच नविन आहे... धन्यवाद...
Deepak म्हणाले…
@महेंद्रजी, रोहिणी आणि सतिश,
सार्‍यांनाच "बाबा / प्रकाश आमटे / मदर टेसेसा " नाही बनता येत, पण असं काही करता नक्कीच येईल. मला वाटतं की समाज सेवेची/ संस्कृतीची जाणीव होणं हे त्याची पहिली पायरी समजावी आणि हळु-हळु का होईना पण सतत वरची पायरी गाठण्याचा प्रयत्न व्हावा.
प्रतिक्रियेबद्दल अभार.