मोबाईल / ई-मेल ब्लॉगिंग!

समजा तुम्ही एखादा मस्त फोटो काढलाय किंवा एखादी सिच्युएशन दाखवणारा फोटो काढलाय आणि तुम्हाला तो इतरांना दाखवायचा आहे. साहजिकच तुम्ही मित्रांना तो एम्.एम्.एस. / एस.एम्.एस. कराल. मात्र तेच जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर टाकायचा असेल तर - साहजिकच तुम्ही तो ब्लु टुथ ने मशिनवर ट्रान्सफर कराल आणि मग ब्लॉग कराल. मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही [जी.पी.आर.एस - आवश्यक!] ब्लॉगिंग करु शकता हे आपणास माहित आहे का?

"ब्लॉगर मोबाईल" ही सुविधा पुरवते.

तर, मोबाईल ब्लॉगिंग कसे कराल?
१. ब्लॉगर ला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन "Email & Mobile" वर क्लिक करा.
३. त्या पेज वर "Mobile Devices" च्या समोर "Add mobile device' वर क्लिक करा आणि पॉप मध्ये आलेला कोड "go@blogger.com" वर मेल करा.

बाकीच्या पुढच्या स्टेप्स ब्लॉगर करेल. अधिक माहिती पहा!

जर तुमचा मोबाईल सोनी - एर्रिक्सनचा असेल तर, त्याच्या काही मॉडेल्स मध्ये ही सुविधा इन-बिल्ट आहे. फक्त तुम्हाला त्याचे सेटींग्ज करावे लागतात.

ई-मेल ब्लॉगिंग
मोबाईल पेक्षा ई-मेल ब्लॉगिंग सोपं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तो फोटो किंवा लिखान मेल करावं लागतं, बस्स एवढंच.
१. ब्लॉगर ला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन Email & Mobile" वर क्लिक करा.
३. "Email Posting Address" च्या समोरच्या बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल ब्लॉगिंगसाठीचा शब्द टाका. म्हणजे तो एक पुर्ण ई-मेल एड्रेस तयार होईल.
उदा. bloggerID.NEWWORD@blogger.com
४. त्याच्या खाली असणार्‍या रेडिओ बटन्स पैकी:
Publish emails immediately - लागलीच प्रकाशित करण्यासाठी
Save emails as draft posts - पुन्हा प्रकाशित करण्यासाठी
Disabled - सेवा बंद करण्यासाठी
- जे योग्य असेल त्यावर क्लिक करा
५. आता तुम्ही या ई-मेल वरती पाठवेलेला मेल हा तुमची नविन ब्लॉग पोस्ट असेल!

.... अधिक माहिती - ब्लॉगरवर आहेच!

वर्डप्रेस मधुन ई-मेल ब्लॉगिंग करण्यासाठी:
१. वर्डप्रेसला लॉगिन करा.
२. "Dashboard" वर क्लिक करुन "My Blogs" लिंक वर क्लिक करा.
३. तुमचे सारे रजिस्टर्ड ब्लॉग दिसतील. ज्याच्यासाठी ई-मेल ब्लॉगिंग सुरु करायचे आहे त्याच्यासमोर असणार्‍या "Post by Email" कॉलमधील "Enable" या बटनवर क्लिक करा.
४. तुमच्यासाठी एक खास - युनिक ई-मेल एड्रेस तयार होईल.
५. आता त्या ई-मेलवर पाठवलेले मेल्स - म्हणजे तुमची नविन पोस्ट

काही मुद्दे:
ब्लॉगर च्या मोबाईल - ईमेल ब्लॉगिंग मध्ये तुम्हाल लेबल किंवा कॅटेगरी लिहिने, पोस्ट डीले - स्केड्युल करणे अशा गोष्टी करता येत नाहीत. मात्र वर्डप्रेस मध्ये तशी सोय आहे. वर्डप्रेसच्या ई-मेल ब्लॉगिंग बाबत अधिक माहिती.

ब्लॉगिंगचा ई-मेल एड्रेस सिक्रेट ठेवा. तो कुणाला देऊ नका. नाही तर तुमच्या ब्लॉगवर कोणीही पोस्ट करु शकते!

चला तर... आता तुम्ही कधी ही ब्लॉगिंग करु शकता!

टिप्पण्या

शिनु म्हणाले…
अती उत्तम माहिती. धन्यवाद :)
मीनल म्हणाले…
बी टेंप्लेटची साईट खूपच छान होती.ठांकू..
मी पण ब्लॉगचं टेंप्लेट बदललं.पण माझा एकुलता एक फ़ॉलोअर डिलीट झाला. :( :(
तसच ’अबाउट मी ऑप्शन’ परत जोडता येईल का?
Deepak म्हणाले…
@ मीनल,
नविन टेंप्लेट छान आहे.
१. "अबाऊट मी" ऑप्शन पुन्हा टाकण्या साठी "Layout" टॅब वर क्लिक करुन "Page Elements" मध्ये जा.
२. जिथं आपणांस हे विजेट टाकायचं आहे त्या ठीकाणावरचं "Add a Gadget" क्लिक करा.
३. एक पॉप-अप विंडो ओपन होईल त्यातुन "Profile" च्या बॉक्सवर क्लिक करा. त्यात आपली माहिती भरा. हेच आपलं "अबाऊट मी"!

आता फॉलोअर साठी वरील प्रमाणे - पॉप-अप विंडो मधुन "Followers" चा बॉक्स क्लिक करा आणि काही माहिती विचारल्यास भरा. झालं! आपला जुना फॉलोअर सुध्दा दिसायला हवा!
मीनल म्हणाले…
हो.. दोन्ही ऑप्शन दिसू लागलेत. परत एकदा ठांकू..:):)