ब्लॉगर: ब्लॉगपोस्ट शेअर करा - फटाफट!

तुमची ब्लॉगरवरची पोस्ट वाचकाला तिथुनच ई-मेल करता आली किंवा ट्विटर - फेसबुक - बझ्झ वर पाठवता आली तर तुम्हाला चांगलेच वाचक मिळु शकतात. हे करण्यासाठी मला बरीच खटाटोप करावी लागली होती. मात्र आता - ब्लॉगर सायबानंच ते अगदी सोपं करुन तुमच्यासाठी आणलंय.

ब्लॉगरला लॉगिन केल्यावर खाली दाखवल्यासारखा मेसेज दिसतो का पहा - नसेल दिसत तरीही हरकत नाही.

हे असं करा:
१. लॉगिन - डिझाइन मोडमध्ये जा.
२. ब्लॉगपोस्ट चे मुख्य विजेट आहे - त्याच्या Edit वर क्लिक करा.
३. एक नविन पॉप-विंडो उघडेल. त्यामध्ये अगदी शेवटी पहा - "ई-मेल - ब्लॉग - ट्विटर - फेसबुक - बझ्झ" असे छोटे - छोटे आयकन्स दिसतील.
४. त्याच्या समोरच्या बॉक्सवर चेक करा - मग सेव!

झालं... आता पहा तुमच्या पोस्टच्या शेवटी हे शेअरींगचे बटन्स आले का?

अद्यायावत:
आपण जर कस्टमाईज्ड टेंप्लेट वापरत असाल - ब्लॉगरच्या डिफॉल्ट टेंपलेट व्यतिरीक्त - तर आपणास खालील दोन पर्याय करावे लागतील.
१. ब्लॉगरला लॉगिन करुन "Edit HTML" वर क्लिक करुन त्यापुढे असणार्‍या "Expand Widget Templates" पुढे चेक करा म्हणजे कोड एक्सपांड होईल. त्या कोड मध्ये <div class='post-footer'>
हे शोधा.
२. आता ती ओळ सिलेक्ट करुन त्यावर खाली दिलेला कोड पेस्ट करा.
<p><div class='post-share-buttons'>
<b:include data='post' name='shareButtons'/>
</div></p>
<div class='post-footer'>
सेव करुन एखाद्या पोस्टवर जाऊन पहा. शेअरींगची बटणे यायला हवीत!

* माझ्या पोस्टखाली असणारे बटन्स वेगळे आहेत.

टिप्पण्या

Dipak Bhau 2 vela try kele pan sharing buttons kahi aale nahit blogvar :(
अनाकलनीय म्हणाले…
तुम्ही सांगतल्याप्रमाने सर्व करून सेव केले, तरी शेर चे बटन येत नाही. माझा blog HTML कोड ते स्वीकारत नाहीए. ते कसे आणावे. दुसरा पर्याय आहे का ?
Deepak म्हणाले…
@विक्रम, @अनाकलनीय,
पोस्टचा शेवटचा भाग पहा आणि त्याप्रमाणे बदल करा.
mynac म्हणाले…
मित्रा,फारच मस्त माहिती दिलीस.पण खरोखरच मनातल सांगू खर तर हि आवशक्यता तुमच्या सारख्या जेन्नुइन ब्लॉगर्स करिता आहे.आमच्या सारख्या,पावसाळ्यातल्या उगवणाऱ्या छत्र्या सारखे असणाऱ्यांसाठी नाही.काहीही असो पण माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
रोहन... म्हणाले…
मस्त रे... तसे ट्विटर जास्त वापरत नाही पण आपला बझ आहेच की... :) अपडेट करून घेतले... :)
अनाकलनीय म्हणाले…
जुळले.
आभारी आहे.
नितीन निमकर म्हणाले…
ha saheb mala tumcha blog khupach avadala ani maza pan garibacha ek blog ahe, just survat kela ahe, vel milala tar jarur visit dya ani kahi comment dya kiva kahi suchana kara mi vat baghatoy, tumcha blog kai chya kai sundar ahe rao, zakaaaaas
anantfandee.blogspot.com
Nitin म्हणाले…
हाइ, भुन्गाजी मला एक् प्रोब्लेम आहे,
हल्ली माझ्या ब्लोग मधे ,मराथी अक्शरे टायीप काहिच ऑप्श् न येत नहिय, काय करु ???
प्लिज माला मदत करा