टेक्स्टमी: एसएमएस वरुन मोफत माहिती पाठवा

मोफत एसएमएस पाठवण्यासाठी बरीच संकेतस्थळे आहेत. आज माहिती देतोय ते अलिकडेच सुरु झालेल्या "टेक्स्टमी" या संकेतस्थळाबद्दल. एक-दोन क्लिक करुन तुम्ही एखादा फोटो, व्हिडिओ किंवा दुवा लागलीच एसएमएसवर पाठवु शकता! टेक्स्टमी ही सुविधा ब्राऊजर - फायरफॉक्स / गुगल क्रोम आणि ब्लॉग/ संकेतस्थळावरही कार्यान्वयित करता येते.


आतापर्यंत आपण फेसबुक/ ट्विटर/ लिंक्डईन वगैरेसाठीची शेअर बटन पाहिलीच असतील. त्यातच एक नवीन भर - "टेक्स्टमी" या शेअरींग सुविधेची!

टेक्स्टमी चा वापर माहिती प्रसार - फोटो, दुवे, व्हिडिओ इ. करण्यासाठी अपेक्षित आहे. त्यामुळे एसएमएस बॉक्समध्ये संबंधित पानाचे नाव व दुवा येतो. मात्र ११९ पर्यत अक्षर संख्या असणार्‍या एमएमएस मध्ये आपण आपला स्वतःचाच निरोपही लिहु शकता! अर्थात बहुतांशी आगंतुकांना "मोफत एसएमएस" हीच सुविधा आवडेल!

कसे कराल?
ब्राऊजरसाठी:
१. गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स वापरुन "टेक्स्टमी" या संकेतस्थळावर जा =
२. "गेट टेक्स्टमी, इट्स फ्री" या बटनावर क्लिक करा.
३. "टेक्स्टमी" चे एक्टेंशन इंस्टॉल करा ... आणि ब्राऊजर बंद करुन पुन्हा चालु करा.. झाले!
४. आता ब्राऊजर मध्ये एखादे संकेतस्थळ उघडा आणि कंप्युटच्या माऊसची उजवी कळ = राईट क्लिक - दाबा. टेक्स्टमी चा मेनु दिसेल - त्यातुन योग्य पर्याय निवडा.
५. आता उघडलेल्या फॉर्म मध्ये मोबाईल नंबर वर एसएमएस लिहा आणि द्या पाठवुन!

जर तुमचा ब्लॉग किंवा संकेतस्थळ असेल तरः
१. टेक्स्ट्मी च्या पब्लिशर या पानावर जा.
२. हवा तो बटनाचा आकार निवडुन त्याखाली दिलेला कोड कॉपी करा.
३. आपल्या ब्लॉगला/ वर्डप्रेस ला जाऊन टेक्स्ट/ एचटीएमएल विजेट मध्ये तो कोड पेस्ट करा.
४. आपल्या ब्लॉग/ संकेतस्थळावर "टेक्स्टमी" चे बटन दिसु लागेल.

तुमच्या संकेतस्थळाला भेट देणारे आगंतुक त्या बटनावर क्लिक करुन ते पान/ पोस्ट एसएमएस वर पाठवु शकतात.. अगदी मोफत.

वेबसाईटवरचा वापर पहायचा असेल तर - मराठीग्रिटींग्ज डॉट नेट वर उजव्या बाजुला असलेले " मोफत एसएमएस पाठवा!" पहा!

आणि हो, ही सोय फक्त भारतातील मोबाईलपुरतीच आहे - शिवाय डीएनडी रहित मोबाईल नंबर साठीच आहे.