बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

कामाच्या बैलाला... हो s s s s!

"वर्कोहोलिक" - एखाद्याचे कामाबद्दल असलेले डिवोशन दाखवण्यासाठी / बर्‍याचदा अभिमानाने वापरली जाणारी टर्म! मात्र या सगळ्या प्रकारात फॅमिली आणि सोशल लाईफचे बारा वाजतात हे पण समजुन घ्यायला पाहिजे ना? किमान माझ्या पाहण्यात असलेले काही लोक अगदी अभिमानाने सांगतात की मी/ मला दररोज १२-१४ तास काम करतो/ करावे लागते. आता तुम्ही जर काम एन्जॉय करत असाल तर ठीक आहे. म्हणजे काही वेळा अगदी मनाविरुध्द - उशिरा थांबुन - विकेन्डसला येऊन काम करण्यात कसला आलाय एन्जॉय? पण काय करणार... घरी बसुन पगार कोण देणार... कांचन परवा म्हटल्या की घरी बसुन - भत्ता मिळतो - पगार नाही... अगदी खरंय...!यु.एस. / यु.के. मध्ये विकेन्डला किंवा एक्स्ट्रा अवर्स मध्ये काम करणं फारच कमी आहे. यु.के. मध्ये तर मी हे स्वतः पहिलंय... त्यांची पर्सनल लाईफ - प्रोफेशनल लाईफच्या फार आधी येते. मात्र आपल्याकडे हे अगदीच उलटं आहे. आम्ही शक्यतो बॉसला " नाही जमणार " किंवा " नाही !"म्हणु शकत नाही!

थोडक्यात सांगायचे तर - मी आजकाल रोजच "वैतागवाडी" ला जातो.. पासच काढलाय म्हणा हवं तर! परवाच्या आजारपणानंतर जो कामाला जुंपलोय - त्यात उसंत नाहीच. परवा, अगदी ठरवुनही - पंकजचे - फोटोग्राफर्स पुणे - दृष्टीकोन -पहायला जाता आले नाही. ब्लॉग वर वेळ काढुन लिहायचं म्हटलं तरी झालं नाही.... अगदी अपर्णा यांनी तर - लिहायची आठवणही करुन दिली, म्हणुनच ही "क्विक पोस्ट". १ डिसे. पर्यंत असाच बिझी-बी रहावं लागणार आहे... त्या नंतर जरा वेळ मिळेल! तोपर्यंट ट्विटर वर भेटत राहु!

8 टिपणी/ टिपण्या:

कांचन कराई म्हणाले...

नवीन पोस्टला आणखी दोन दिवस उशीर झाला असता, तर मी सुद्धा विचारणार होते. घरी बसुन - भत्ता मिळतो - पगार नाही... असं मला वाटतं सिद्धार्थ म्हणाला होता. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. "वर्कोहोलिक बाब्बा!" असं जेव्हा कौतुकाने लोक म्हणतात तेव्हा आपलं मन आतून काय म्हणत असतं हे त्यांना कळत नाही. खरं सांगू का, आवडीचं कामसुद्धा कधी कधी कंटाळा आणू शकतं, तर न आवडणारं काम रोज करताना वैताग येणं साहजिक आहे. म्हणून तर बॉस लोक सांगतात ना, "तुमचं काम एन्जॉय करा." यु.एस. आणि आपला देश यातील खाजगी आयुष्याची तुलना करायची तर ती सार्वजनिक सुट्ट्यांपासून करावी लागेल. तिकडे सप्ताहांताला धरून सुट्या ठरवलेल्या आहेत. जेणेकरून सुटीचा आनंद उपभोगताना कामाची किरकिर डोक्यात नको. आपल्याकडे तसं नाही. एखाद्‍ दुसरी क्विक पोस्ट टाकत रहा मात्र!

सागर बोरकर म्हणाले...

भुंगाराव बर्‍याच दिवसानंतर आपली पोस्ट वाचून मजा आली. तरी वेळात वेळ काढून आपले पोस्ट खाते चालू ठेवावे व आम्हा पामरांना उपकृत करावे.

Mahendra म्हणाले...

काय दिपक
अहो अमिताभ बच्चन पण वेळ काढतो हो ब्लॉग वर लिहायला. थोडा काढत जा ना वेळ , काहितरी लिहायला? बरेच दिवसांच्यानंतर पोस्ट पाहिली तुमची बरं वाटलं..

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

दिवाळीनंतर खरच खूप कमी मोकळा वेळ मिळत आहे

Vikas Shukla म्हणाले...

लई दिसांनी लिखाण केलेत. वाचून बरे वाटले. आत्ताच एका विद्यार्थ्याला 'ब्लॉग कसा असतो' ते दाखवण्यासाठी तुमचा ब्लॉग दाखवला.

भानस म्हणाले...

दिपक,
मन:पूर्वक अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!
अतिशय आनंद झाला.:)
खरेच की आजकाल जरा कमीच लिहीतो आहेस.:(
अनेक शुभेच्छा!
भाग्यश्री

कांचन कराई म्हणाले...

काय भुंगोबा, शेवटी गाजवलंत! मनापासून अभिनंदन.

भुंगा म्हणाले...

@ महेंद्रजी,
खरंच हो, ऑफिसच्या कामाचाच एवढा वैताग येतो ना.. मग नविन लिहायलाही नाही सुचत. पण काही दिवसांनी पुन्हा थोडा वेळ मिळेल. मग मात्र रेग्युलर लिहिण्याचा प्रयत्न करेन.

@ सागर,
हो, आज काल आमची गाडी जरा सुपरफास्ट झालीय, उद्याच्या १ डिसें. ला महत्त्वाचे रीलिज आहे!

@ कांचन,
अगदी मनातलं बोललात! पण काय करणार - जगण्यासाठी [?] काम तर करावंच लागणार!

@ विक्रम,
दिवाळीत घेतलेल्या सुट्टीचा बदला घेताहेत की काय?

@ विकासजी,
हो.. जरा वेळच लागला... पुढच्या महिन्यापासुन जास्त लिहिन म्हणतो :)

@ कांचन - @ भाग्यश्री,
अहो आपणा सर्वांच्या शुभेच्छा होत्याच की... मग कसा नाही जिंकणार!