+ -

    पोटोबा - मराठी पाककृतींचं ई-बुक!

    |
    नमस्कार!
    मायाजालावर असणार्‍या अनेक सुविधांपैकी एक म्हणजे "खादाडी"! हो, बर्‍याचदा तुम्ही आम्ही या मायाजालावरती पटापट बनवता येणार्‍या किंवा घरच्याघरी बनवता येणार्‍या काही पाकक्रिया शोधत असतो. बायकोसाठी काहीतरी नविन मेनु शोधणं माझ्या इतर कामांपैकी एक. आता मायाजालावर या सगळ्या पाकक्रिया शोधणे आणि त्या एकत्र करणं तसं अवघड नसलं तरी कंटाळवाणं नक्कीच वाटतं. शोध-शोध शोधायचं आणि नेमकं हवं त्यावेळी ते सापडत नाही, मग मनाचा आणि खाण्याचा मेनुच बदलतो! तेंव्हा म्हटलं - मायाजालावर आपल्या पाकक्रिया लिहिणार्‍या "खवैय्यांच्या" परवानगीने आपण एक छोटसं "ई-बुक" तयार करावं आणि त्याच संकल्पनेचं हे एक रुप!


    पोटोबा - १: चाळीस पाककृतीं साधं - सोपं पुस्तक!
    डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा!
    "पोटोबा"चं पहिलं "ई-बुक" भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते.
    चला तर मग - खादाडी सुरु करुया!

    डाऊनलोड्स:
    नमस्कार!
    आपणांस लिखाण आवडले किंवा नाही हे जरुर कळवा. त्यासाठी आपल्या कमेंटस - सुचना स्वागतार्थ आहेत!

    नविन लिखाण आपण आपल्या इ-मेलवर सुध्दा मागवू शकता. त्यासाठी उजव्या बाजला दिलेल्या रकान्यात आपला इ-मेल नोंदवा. हे लिखाण ट्विटरला किंवा मित्राला मेल वर पाठवा!
    इ-मेल ची पडताळणी आवश्यक!

    तुमचा ई-मेलः

    फिडबर्नरची सुविधा


    34 टिपणी/ टिपण्या

    Anand: म्हणाले...
    दि. ४ जानेवारी २०१० १०-२९ pm

    लगीन होईपर्यंत खुप कामाला येणार आहे, (नंतर सुद्धा येवु शकतो :)
    भुंगा, भाग्यश्री धन्यवाद!

    विनायक: म्हणाले...
    दि. ४ जानेवारी २०१० १०-३७ pm

    uttam ki rao
    hovun javu de
    mi aatach misal khalli aahe
    aani lagech hi post
    jai maharashtra ,jai khadadi!!!

    भुंगा: म्हणाले...
    दि. ४ जानेवारी २०१० ११-१२ pm

    @आनंद,
    हो, मलाही आधी मिळालं असतं तर... ;)
    काही हरकत नाही... सध्याही उपयोगी येऊ शकते!

    @विनायक,
    अरे वा.. मिसळ - कोल्हापुरी का?
    या पी.डी.एफ. मध्येही असेच काही चमचमीत पाककृती आहेत!

    अपर्णा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १२-३६ am

    एकदम जबरी झालंय....

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १२-४२ am

    @अपर्णा,
    जबरी ना..! चला तुम्हा सर्वांना आवडलंय तर, उगाचच काम वाया नाही गेलं!

    अनिकेत: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ९-१९ am

    वा छानच उपक्रम. मराठीमधुन आहे म्हणुन जास्त आवडला. इंग्रजी मध्ये उगाचचं हे म्हणजे मराठीमध्ये काय? असं होतं
    धन्यवाद आणि अभिनंदन

    सिद्धार्थ: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ९-२४ am

    वा भूंगा क्या बात है!!! आइडियाची कल्पना लय भारी. मानव जातीच्या कल्याणाचे कार्य आपल्या हातून घडतं आहे. ह्यातल्या काही पाककृती नक्की करून पाहेन. आमच्या पोटोबाच्या वतीने तुमचे व भाग्यश्रीचे आभार मानतो..

    canvas: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १०-०९ am

    नमस्कार दिपकदादा,

    ई-बुक उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

    आत्ताच मी yuvadunia ब्लागवर "सुनो 'दिल से'" पोस्ट वाचली.
    अस काही online internet radio station आपण मराठी साठी करु शकतो का. सध्यातरी मला याबाबतीत काहिच माहित नाहि.पण याबद्दल आपण काहि करु शकतो का?

    तुम्ही जर ब्लागर मीट ला जाणार असाल तर तिथे पण याविषयी चचा॑ कराल का?

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १०-११ am

    @अनिकेत,
    अगदी बरोबर.. इंग्रजीत ह्याच पाककृती वाचताना 'बेसन पीठ', 'ह. / तु. / म. डाळ' आणि मसाल्यांची नावं यांची सांगड घालता - घालता चायनिज मेनु बनतो!

    @सिद्धार्थ,
    मंडळ आभारी आहे!

    tanvi: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १०-२२ am

    मस्तच झालयं रे...सही
    तुम्हा दोघांचे आभार......

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १०-२७ am

    @कॅनवास,
    हां मी ब्लॉग मीट ला गेलो तर हा विषय काढतो. पण काही वेबसाईट्सवर चांगली मराठी गाणी ऐकता येतात. जसं - मराठी स्मॅश हिट्स किंवा मराठी एफ्.एम.

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १०-२९ am

    @ तन्वी,
    धन्यवाद तन्वी.
    तुम्हां सर्वांना हे पुस्तक आवडल्याचे पाहुन आनंद होतोय :)

    कांचन कराई: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ११-३२ am

    अरे, मस्तच! भाग्यश्री आणि भुंगोबा, दोघांचंही अभिनंदन!! सकाळी सकाळी खाऊचं पुस्तक पहायला मिळालं. पुस्तक आवडलं. त्यात दिलेले पदार्थ नेहमीच्या करण्यातले आहेत त्यामुळे एकदम हॅन्डी इन्फो मिळाला. छान! अनुक्रमणिकेमध्ये त्या पदार्थाच्या नावावर क्लिक केलं की त्या विशिष्ट पानावर जाता येतं हे जास्त आवडलं. आणि भाग १... म्हणजे अजून पुढचे भागही येतायंत तर....! पुढच्या सर्व भागांसाठी शुभेच्छा!

    विक्रम एक शांत वादळ: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ११-५७ am

    आयला लय भारी

    लगेच डाऊनलोड करून ठेवले आता मला आणि नंतर बायकोला उपयोगी पडेल ;)

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १२-२० pm

    @कांचन कराई,
    धन्यवाद! हो - ते अणुक्रमणिका मुद्दामच तशी बनवली. उगाचच पान् न पान शोधायला नको.
    हा पहिला भाग आहे. तेंव्हा दुसरा भाग निश्चितच येणार!

    @विक्रम,
    हो, चांगली आयडिया आहे.. :)

    Rohit: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० १२-५२ pm

    मस्तच आहे आभारी आहे, दुसरया भागाची वाट पाहत आहे
    रोहित

    madhuri: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ३-५७ pm

    मस्त पुस्तक तयार झाले आहे. धन्यवाद! मी आताच हे इ-बुक माझ्या भावाला पाठवले. त्याला अजिबात स्वयंपाक येत नाही. सध्या परदेशात असल्यामुळे त्यालाच स्वयंपाक करावा लागतो. त्याला याचा निश्चितच फायदा होईल. पुन्हा आभार!

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ४-०८ pm

    @रोहित,
    धन्यवाद! दुसरा भाग लवकरच येईल!

    @माधुरी,
    आपल्याला/ भावाला हे पुस्त उपयोगी आले यातच भाग्यश्री [पाककृतींची लेखिका] व आमचा आनंद आहे!
    आपल्याला नविन वर्षाच्या शुभेच्छा!

    Manjiri: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ५-५३ pm

    स्तुत्य उपक्रम! अन्नकृतीकर्ता सुखी भाव!

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ६-३१ pm

    @मंजिरी,
    आपले आभार माझ्यापर्यंत पोहोचले - ते भाग्यश्रीपर्यंत पोहोचवितो :)

    D D: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ७-०७ pm

    धन्यवाद! आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुमच्या दोघांचेही अभिनंदन!

    भुंगा: म्हणाले...
    दि. ५ जानेवारी २०१० ११-३२ pm

    @डी.डी.
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    sachin: म्हणाले...
    दि. ६ जानेवारी २०१० ५-१३ pm

    भाग्यश्री आणि भुंगा दोघांचेही अभिनंदन ,
    खूपश्या पाककृती सोप्या आहेत . करून पाहायला हव्या ....

    भुंगा: म्हणाले...
    दि. ६ जानेवारी २०१० ५-२२ pm

    @सचिन,
    धन्यवाद :) नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    रोहन चौधरी ...: म्हणाले...
    दि. ६ जानेवारी २०१० ६-०० pm

    आयला ... सहीच ... भानस ताई पूस्तक छापून कुठे गायब झाल्या आहेत ते माहीत आहे का ??? तुझे अभिनंदन रे ... इ-बुक आले तुझे ... माझ्या इ-बुक चा मुहूर्त लागत नाही आहे अजून ... :D

    भुंगा: म्हणाले...
    दि. ६ जानेवारी २०१० ६-०९ pm

    @रोहन,
    हा दोस्त.. भाग्यश्री गायबच आहे... ई-मेल रिप्लाय ही नाही.. ब्लॉगवर कमेंटही नाही!
    असो.. आम्ही तुझ्या ई-बुकची वाट पहातोय!

    shinu: म्हणाले...
    दि. ६ जानेवारी २०१० ८-०१ pm

    abbbbbbb....:p pot bharala:)

    भुंगा: म्हणाले...
    दि. ६ जानेवारी २०१० ९-४९ pm

    @शिनु,
    अ s s s s s s ब्ब! इथंपर्यंत ऐकु आलं :)

    भानस: म्हणाले...
    दि. ७ जानेवारी २०१० ८-२० am

    सर्वप्रथम दिपक तुझे अनेक आभार.गेले बारा-तेरा दिवस चाकावर होते.:) आज आलेय घरी परत. " पोटोबा " मस्तच झालेय. वरच्या प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटले. नवीन वर्षाची सुरवात छान झाली. पुन्हा एकदा तुझे व सगळ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार व सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

    भुंगा: म्हणाले...
    दि. ७ जानेवारी २०१० १०-५० am

    @ भाग्यश्री,
    नवीन वर्षाच्या 'पोटभर' शुभेच्छा!
    "पोटोबा" तुझ्या भन्नाट पाककृतींशिवाय शक्यच नव्हतं! वाचकांचा उत्साहही भरभरुन मिळाला.
    सर्वांचे जाहिर आभार!

    Suru: म्हणाले...
    दि. ७ जानेवारी २०१० ११-५० am

    भुंगा भाग्यश्री ....
    Good, पुस्तक छान जुळून आलय. मराठीतही अशीच Ebooks या पुढेही यावीत,
    फक्त एक सुचवावस वाटतं कि प्रत्येक पानावर अनुक्रमानिकेसाठी थेठ लिंक द्यावी जेणेकरून सारखे पहिल्या पानावर जावं लागणार नाही...
    दोघांचे हार्दिक अभिनंदन व पुढील भागांसाठी भरपूर शुभेच्छा !!!!

    सुरेखा....

    अमोल केळकर: म्हणाले...
    दि. ७ जानेवारी २०१० ११-५० am

    नमस्कार,

    खुप छान पुस्तक . डाऊनलोड केले आहे

    धन्यवाद

    अमोल केळकर

    भुंगा: म्हणाले...
    दि. ७ जानेवारी २०१० १२-४१ pm

    @सुरु,
    हो, अशीच मराठी पी.डी.एफ. पुस्तकं देण्याचा प्रयत्न पुढेही राहिल.
    या पुस्तकात काही त्रुटी राहुन गेल्यात.. आपल्या सुचना पुढच्या पुस्तकात नक्की पाळू :)

    @अमोल,
    धन्यवाद. असेच भेटत राहु

    .... आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    iravati, अरुंधती: म्हणाले...
    दि. २६ फेब्रुवारी २०१० १२-४९ pm

    अतिशय स्तुत्य उपक्रम! मला स्वत:ला ह्या 'पोटोबा'तील पाक कृती तर आवडल्याच...शिवाय माझ्या काही बहिणी, मैत्रिणी ना मी हे ई-पुस्तक ईमेल केल्यावर त्या हरखूनच गेल्या. परदेशात राहताना, देवनागरीत टाईप केलेले, मराठी स्वादिष्ट पाक कृतींचे, सचित्र पुस्तक... सोप्या व विविध रेसिपीज.... तिघींनी ह्यातील हिरव्या रश्शाची, केळीच्या हलव्याची (भरली केळी)व बृशेटाची कृती करून पाहिली.... झक्कास झाली व सर्वांना आवडली. अभिनंदन व शुभेच्छा! :-)

    अरुंधती
    --
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    टिप्पणी पोस्ट करा

    नमस्कार!
    माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या कमेंट्स ह्या पुर्व चाचणी करुन प्रकाशित केल्या जातील. आपल्या कमेंटस ह्या विषयाला धरुन तसेच प्रकाशित करण्या / सर्वांना समजण्या योग्य आणि आपलं मत ठामपणे मांडणार्‍या असाव्यात, ही अपेक्षा!

    आभार,
    ....भूंगा

    मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

    शब्दांचे ढग: यावरुन तुम्हाला आणखी बरेच लिखाण सापडेल!

    दैनंदिनी (27) भटकंती (22) किल्ले (15) टेक (14) पुणे (13) ब्लॉगर (12) माहिती (11) शुभेच्छा (10) ब्लॉगिंग (9) असंच (8) बाजार (6) ब्लॉग (6) छायाचित्रण (5) लंडन - केंब्रिजचे दिवस (5) आठवणी (4) एस.एम्.एस (4) डाऊनलोड (4) निसर्ग (4) पाऊस (4) राजकारण (4) वाहतुक (4) सामाजिक जबाबदारी (4) स्वाईन फ्ल्यु (4) आभार (3) केंब्रिज (3) चित्रकारिता (3) यु.के. (3) लंडन (3) विनोद (3) शिवाजी (3) श्रद्धांजली (3) आय. ई ६ (2) इंटरनेट बँकिंग (2) इतर ... (2) कविता (2) कार्टुन (2) गणपती (2) चावंड (2) ट्रेक (2) ट्रेकिंग (2) डोनेशन (2) दिवाळी (2) नवं वर्ष (2) फायरफौक्स (2) फोटो (2) बँक (2) बुलेट (2) ब्राउजर (2) भजन (2) मराठी सिनेमा (2) मैत्री (2) मोबाईल (2) लाईफ (2) वायरस (2) शहिद (2) शायरी (2) संक्रांत (2) सिनेमा (2) सौफ्टवेअर्स (2) अंबोळगड (1) अतुल कुलकर्णी (1) अनुभव (1) अपघात (1) अर्धनारीनटेश्वर मंदिर (1) आग्रा किल्ला (1) आजारपण (1) आतिषबाजी (1) आनंदा वॅली (1) इंदिरा गांधी (1) एड्स (1) कन्सर्न इंडिया फाऊंडेशन (1) कस्टमर सर्विस (1) कात्रज स्नेक पार्क (1) कादंबरी (1) कारगिल (1) कार्ड (1) केंजळगड (1) कोंकण (1) कोराईगड (1) कोरीगड (1) कौपी राईट (1) क्रेडिट कार्ड (1) खतरों के खिलाडी (1) गगनगड (1) गटारी अमावास्या (1) गड (1) गणेशोत्सव (1) गुगल (1) गुगल एनालॅटिक्स (1) गुडी पाडवा (1) ग्लोबल वार्मिंग (1) घनगड (1) चारमिनार (1) जंगल ट्रेक (1) जागतिक (1) ज्ञानेश्वर (1) ज्योतिर्लिंग (1) झाडे (1) टोपीगड (1) डी.एन.डी. (1) डोनेशन्स (1) ढाक बहिरी (1) तरकारली (1) ताजमहाल (1) तोरणा (1) तोरणा ते राजगड (1) दसरा (1) दादा कोंडके (1) नंदण निलकेणी (1) नळदुर्ग (1) नाना पाटेकर (1) निळु फुले (1) नॅनो (1) नैतिक जबाबदारी (1) नोकरी (1) पं. नेहरु (1) पंढरपुर (1) पवना धरण (1) पालखी (1) पिकनिक (1) पिकासा (1) पुरंदर (1) पेब (1) पोळा (1) प्रतापगड (1) प्रदुषण (1) फतेहपुर सिक्रि (1) फीडबर्नर (1) फॅमिली विकेंड (1) फोटो आल्बम (1) फ्लिकर (1) बंड (1) बिंदुसरोवर (1) ब्राऊजर (1) ब्लॅक डे (1) ब्लौगिंग (1) भगतसिंग (1) भिमाशंकर (1) भीमाशंकर (1) म. गांधी (1) मंदिरे (1) मतदान (1) मराठी - हिंदी (1) मराठी ब्लॉग्ज (1) मराठी हिंदी गाणी (1) माथेरान (1) मायक्रोसौफ्ट (1) मित्र (1) मी (1) मुंबई (1) मैत्रिचा दिवस (1) मोबाइल (1) मोहनगड (1) यशवंत गड (1) रतनगड (1) राजमाची (1) राजीव गांधी (1) रायरी (1) रायरेश्वर (1) रिलायन्स पावर (1) रिसेशन (1) लक्ष्मणराव देशपांडे (1) लाइटबॉक्स (1) लाल-किल्ला (1) लालबहादूर शास्त्री (1) लिखाण (1) लेख (1) लोणावळा (1) वटपौर्णिमा (1) वर्कोहोलिक (1) वळु (1) वांद्रे-वरळी सी लिंक (1) वाचन (1) वारकरी (1) वारी (1) विकटगड (1) विठ्ठल (1) वेब (1) वेळ घालवण्याचे उद्योग (1) वेळापुर (1) शिक्षकदिन (1) शेअर बाजार (1) शेअर मार्केट (1) श्रध्दांजली (1) सांगोला (1) सामान्य ज्ञान (1) सिंधुदुर्ग (1) सुचना (1) सुट्टी (1) सुधागड (1) सुरुवात (1) सोलापुर (1) स्टार माझा ब्लॉग माझा (1) स्व. राजीव गांधी पार्क (1) स्वातंत्र्यदिन (1) स्वामी नारायण मंदिर (1) हरिश्चंद्रगड (1) हुसेन सागर (1) हेल्मेट (1) हैदराबाद (1)