मीच का?
- एका भिकार कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी वारंवार मेसेजेस येताहेत. मेसेज तोच... मात्र दर वेळी नविन नावानं...न थकता.... मला वाटतं हा उगाचच पैसे वाया घालवतोय.. त्या कंपनीचे शेअर्स कुणी घेत नाही आणि हा असे मेसेज वर पैसे उधळतोय... कंपनी गाशा गुंडाळणार दसतयं?
- "वर्क फ्रॉम होम" वाल्यांचे मेसेजेस - अहो इथं घरीच्यांसाठी वेळ नाही आणि त्यातही घरुन काम म्हणे! - अरे मेड्म... नही होना... बिल्कुल नही होना!
- आता.. "डु नॉट डिस्टर्ब" या सेवेला नंबर नोंदवुन जवळ - जवळ तीन वर्षं झालीत. पण आपल्याकडं ही सोय कुणी मनावर घेईल असं दिसत नाही. मोबाईल कंपनीला तक्रार करुनही काहीच फायदा नाही... तक्रार निवारणासाठी म्हणे ४० दिवस... काय करणार - कसं करणार तर म्हणे - पुन्हा एकदा "डु नॉट डिस्टर्ब" रजिस्टर करणार... आणि मेसेज पाठवणार्यावर तक्रार करणार - म्हणे ५०० रु. दंड होईल. मी म्हटलं ठिक आहे... मला पैसे कधी मिळणार - तर म्हणे - पैसे तुम्हाला नाही - आम्हाला मिळणार!! वा रे वा - डोकं दुखी निस्तरायची आम्ही - आणि तुम्ही मात्र डॉक्टर बनुन पैसे घ्यायचे.... झका..स!
- महान 'आय.सी.आय.सी.आय.' वाले पैसे "डेबिट" झाले की "क्रेडीटेड" म्हणुन एस.एम.एस. पाठवतात. फोन करुन विचारलं तर म्हणे - इग्नोर करा. अरे वा.. असं कसं इग्नोर करा. रात्री १ वा. मेसेज मिळतो - मी झोपेतुन उठुन वाचतो. सकाळी फोन करतो - आणि वरुन उत्तर काय.. तर मेसेज इग्नोर करा!
- "ए.बी.एन. एम्रो"- आता आर.बी.एस. - च्या लोकांनी घरच्या पत्त्यामध्ये घोडचुक करुन ठेवली.. Undri च्या जागी Undir असा पत्ता लिहुन त्यांची पत्रं पाठवताहेत. 'प्रोफेशन कुरीअर्सवाले' घर न शोधताच किंवा फोन न करताच "पार्टी शिफ्टेड" असं लिहुन कुरिअर परत पाठवताहेत. मग पुन्हा मुंबई ऑफिसातुन फोन करुन विचारतात - नवीन पत्ता काय?
- एक्सिस बँक वाल्यांनी -लकी क्लायंटचं गाजर दाखवुन क्रेडीट कार्डसाठी नाव नोंदवुन घेतलं... वेरीफिकेशनच्या वेळीच ऑफिस शिप्ट झालं आणि कार्ड नाकारण्यात आलं. त्या फोन करणार्या पोरीचं "टार्गेट" पुर्ण व्हावं म्हणुन मी कार्डाला हो म्हणालो...आता त्यांच्याच कार्डाला काय सोनं लागलं नव्हतं पण उगाच मनात राहुन गेलं की बँकेला आपण "खोटी माहिती दिली" असं वाटु नये - म्हणुन सविस्तर मेल लिहिला... तर म्हणे - ऑफिसच्या पत्रावर - सध्याचा पत्ता लिहुन पाठवा. पाठवला. आता म्हणे - ऑफिशियल इ-मेल वरुन मेल पाठवा.. तुमच्या **** ! एक तर तुम्हीच फोन करुन कार्ड घ्या - घ्या म्हणुन भिक मागता - काही कागदपत्रं लागणार नाही म्हणता आणि आता वरुन ही सोंगं काय?
बाय द वे - युनिनॉर चं कार्ड घ्यावं म्हणत... बघु माझा नंबर येतो का?... च्यायला.... वैतागलोय हो....फुकटची **** [झंजट!] नुसती!
६ टिप्पण्या
बाय द वे, पोरींचे फोन तुला येणे साहजिकच आहे. :-)
त्याआधी एक मला आयुर्वेदीक औषध विकू पहात होती. म्हणे दारूत टाकून प्यायलो तर hangover आणि दारुचे side effects होत नाही. मी म्हणालो तू ये, आपण दोघे मिळून पिऊ, मग मला नीट कळेल तुमचं product! बिच्चारी, घाबरुन फोन ठेवला!
पण आता हे लोक एका कंपनीचा नंबर घेऊन दुसर्यांना मेसेज पाठवर राहतात. मग तुम्ही काहीच करू शकत नाही.
त्याआधी एक मला आयुर्वेदीक औषध विकू पहात होती. म्हणे दारूत टाकून प्यायलो तर hangover आणि दारुचे side effects होत नाही. मी म्हणालो तू ये, आपण दोघे मिळून पिऊ, मग मला नीट कळेल तुमचं product! बिच्चारी, घाबरुन फोन ठेवला!
+१
भुंग्या दादा, लयच वैतागलेला दिसतोय... डू नॉट डिस्टर्ब वरची तुझी आधीची पोस्ट पण अशीच होती...! :P
"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" मधल्यासारखं काही करण्याचा विचार आहे की काय? ;)
prayatn karun paha.. thoda vel jaieel pan calls kat-kat nahi rahanar..
pan ho, aaj kal kahihi SMS khup yetat, ani tyat from number nasatoch, tyamule avoid kasa karayacha te kalat nahi..