मंगळवार, १६ मार्च, २०१०

माणसांतले मैत्र वाढवा - सुरुवात आजच...गुढीपाडवा !

आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !


साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !

6 टिपणी/ टिपण्या:

रोहन चौधरी ... म्हणाले...

चला धरु रिंगण... गुढी उभी उंचावुन ... हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !

मनमौजी म्हणाले...

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! नववर्ष आपणास सुख समृद्धीचे जावो!!!

हेरंब म्हणाले...

नूतन वर्षाभिनंदन !! हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

sachin म्हणाले...

जगताना गाठीला आलेले कडू अनुभव लिंबाच्या पानासारखे स्वीकारत
भलेपणाचा गोडवा ओठांवर ठेवावा, असा पाडवा समजूतदार असावा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो

आनंद पत्रे म्हणाले...

हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

अपर्णा म्हणाले...

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....