किल्ले पुरंदरः

आधीचा ट्रेक करुन जवळ-जवळ एक वर्ष होत आले. लंडनहुन येऊन एक महिना होत आला आणि मला माझ्या राहिलेल्या कामगि-यांचे [किल्ले-गड भेटीचे] भान होऊ लागले ...माझे मन इतिहासाच्या मागे धाऊ लागले. बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा तो आनंद मला मिळणार होता... छ. संभाजी राजांचे पुस्तक वाचता वाचता मनात आले, सकाळी पुरंदरला जायचे.... रात्रीच मित्राला फोन केला... दुसरा मावळा तयार..! सकाळी ६ ला घरुन निघालो.. बापदेव घाट.. सासवड... आणि किल्ले पुरंदर..!

सासवडच्या - पुरंदरेंच्या वाड्याला ओजरती भेट देऊन पुढ्चा प्रवास करण्याचे ठरले. तसा हा वाडा सध्या पडक्या अवस्थेत आहे. मात्र कुलुप लवले असल्याने आतुन पाहणे राहुन गेले. हा वाडा शुटिंग वगैरेसाठी भाड्याने मिळत असल्याचे एका मावशींनी सांगितले. असो.. शेजारीच श्री. गणेशाचे मंदिर आहे. पुरंदरच्या भेटीची कल्पना देण्यासाठी व दर्शनासाठी गणोबाचे आभार मारुन गाडीला किक् मारली.

अरे हो... या ठिकाणी अजुन एक संगमेश्वराचे मंदिर आहे... परतीच्या मार्गावर या ठीकाणी दर्शन घेतले.


पुरंदरच्या आर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी जाते. पायथा ते मध्य हा रस्ता थोडा कच्चा आहे. चार चाकी असेल तर जपुन चालवावी. गाडी सावलीत लाऊन मस्त चहा पोहे खाल्ले... आणि चढाईला सुरुवात झाली... मार्गात देवीचे आणि हनुमंताचे दर्शन घेउन गडावर पोहोचलो. गडावर छ. संभाजी राजांचे जन्मस्थान व महादेवाचे मंदिर हीच ठिकाणे आहेत. जन्मठिकाणाची फक्त जागाच राहिली आहे, त्यावर संदर्भित फलक लावला आहे. महादेवाचे मंदिर हा गडावरची सर्वात उंच जागा.. व्यवस्थित पाय-या असल्याने चढण सोपी आहे.




महादेवाच्या चरणी डोके ठेउन दर्शन घेतले.. छ. शिवाजी व संभाजी राजांना.. त्यांच्या मावळ्याना मनोमन नमस्कार केला... !!!

गडावरुन दिसणारे सभोवतालचे द्रुश्य अतिशय सुंदर होते... "लंडन आय" वरुन दिसणा-या लंडन पेक्षा हजार पट सुंदर...!!


कैमे-या मध्ये या आठवणी साठवुन आम्ही परतीचा मार्ग पकडला.. तो दिवस खास होता... !!

फोटो: माझ्या मित्राने हे फोटो त्याच्या भटकंती या संकेतस्थळावर टाकले आहेत...

...भुंगा!