सलाम...!

वाहतुकिचे नियम उलटे टांगुन मनमौजी गाड्या चालवणा-या त्या बहाद्दरांना सलाम...
कर्णकर्कश्श भोंगे वाजवणा-या त्या कर्णबधिरांना सलाम...
आणि हो, मरण्यासाठीही "पहिला मी" म्हणणा-या त्या वीर सारथ्यांना सलाम...
सलाम ..सलाम ... माझ्या शिकल्या-सवरलेल्या मित्रा तुलाही सलाम...!

सिग्नलला भिक मागणा-या भिका-यांना सलाम...
आणि त्यांना पाहुन गाडीची काच वर करणा-या त्या साहेबांनाही सलाम...
आणि हो, गाडीची सफाई करायला सांगुन एक रुपयाही न देता निघुन जाणा-या "त्या" मोठ्या भिका-यांना सलाम...
सलाम ..सलाम ... माझ्या घुम्या मित्रा तुलाही सलाम...!!

दोन चाकीवर चार जणांना वाहणा-या त्या बैलांना सलाम...
गाडी चालवताना यारी-दोस्ती निभावणा-या त्या जय-वीरुंना सलाम...
आणि हो, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी सर्कस करणा-या त्या विदुषकांना सलाम...
सलाम ... सलाम... माझ्या मुर्दाड मित्रा तुलाही सलाम....!!!

खड्ड्यातील रस्त्यांबद्दल मनपा ला सलाम....!
उन्हात उभा राहुन वाहतुक नियंत्रित करणा-या त्या स्वयंसेवकाला मानाचा सलाम...
आणि हो, त्यालाही झुगारुन पुढे जाणा-या त्या मेंढरांना सलाम...
सलाम ... सलाम... माझ्या पळपुटया मित्रा तुलाही सलाम....!!!

कोप-यावर उभे राहुन हा मा़कड-खेळ पाहणा-या त्या वर्दीला सलाम...
चलनाच्या नावाखाली पोट भरणा-या त्या उपाशी पोटाला सलाम...
आणि हो, चलनाऐवजी "चहा-पाणी" देणा-या- घेणा-या त्या भ्रष्ट मनांना सलाम...
सलाम ... सलाम... माझ्या मंडुक मित्रा तुलाही सलाम....!!!

क्रमशः ....

...भुंगा!

टिप्पण्या

संकल्प द्रविड म्हणाले…
छान पोस्ट! आपल्या रस्त्यांवरच्या मुर्दाड बेशिस्तीला कडक सलाम ठोकलात.