भटकंती : तोरणा




खुशखबर ...!
समस्त मित्र मंडळी व कार्यालयीन मंडळींना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की - महिनाबाद प्रमाणे ठरल्यानुसार श्रावण सुरुवातीचा प्रस्तरारोहणाचा बेत ठरविण्यात आला आहे. त्यानुसार या शनिवारी दि. ४/०८/२००७ रोजी " किल्ले तोरणा " भेट निश्चित करण्यात आले आहे.
तरी मित्र मंडळी व कार्यालयीन मंडळी यांनी शुक्रवार पर्यंत आपली नाव नोंदनी करावी ...!!

-मेलच्या उत्तरादाखल सहा लोक तयार झाले .. कुणाल, चंद्रकांत, राहुल, वेलु, अभय आणि अनिता ... तोरण्याचा बेत पक्का झाला...
नेहमी प्रमाणे गाडीची ठरवा-ठरव झाली.. आणि "टव्हेरा" ऐवजी "ईनोव्हा" मिळाली... म्हणजे आम्ही टव्हेराच बुक केली होती.. पण कुठेतरी घोड्याने पेंड खाल्ली आणि ईनोव्हा मिळाली... तशी गाडी चांगली आहे.. पण पाच [च] लोकांसाठी... आम्ही मात्र सात ..त्यात गाडीचा चालक.. म्हणजे - खिचडी-भात !!!... [ ... स्वारी शक्तिमान .. अरे नाही .. अमीर खान ... तो ईनोव्हाची जाहिरात करतो ना..!] .... मागच्या सीट्वर दोनच्या जागी चार जण बसलो ... आणि गाडी तोरण्याच्या दिशेन निघाली....

अडचणीत बसलो असलो तरी गप्पा मारत - मारत वेळ लगेच निघुन गेला...प्रवासही तासा-दिड तासाचा आहे..बनेश्वरच्या डाव्या हाताला जाणारा रस्ता तोरणा आणि राजगडाकडे जातो.. रस्त्यात एका ठिकाणी थांबुन मस्त गरमा-गरम वडा पाव खाल्ला आणि काही सोबतही घेतले... ग़डावर खायला म्हणुन...!

गडाच्या पायथ्याशी वेल्हे गाव आहे ... पोलिस स्टेशनच्या समोर गाडी पार्क करुन आम्ही गडाची वाट धरली.. रस्त्यात एक-दोन गावक-यांना गडावर जाण्याचा रस्ता विचारुनआम्ही पुढे चालत राहिलो...

पहिला पठारी भाग चढुन वर आलो आणि धुक्यात लपलेल्या "प्रचंड" तोरण्याचे दर्शन झाले... चारी बाजुला हिरवागार परिसर... कोसळणारे धबधबे आणि पाऊस यामधे चुकलेल्या रस्त्याची जराही जाणीव झाली नाही... वाटले गडावर जाणारा रस्ता असाच जंगलातुन जात असावा..!

जंगलातुन .. चिखलातुन वाट काढत काढत आम्ही मुख्य वाटेला मिळालो...मात्र हा रस्ता मिळेपर्यंत आम्ही चालत असलेलाच रस्ता बरोबर असल्याची भावना होती. जंगलातुन पुढे-मागे चालण्यात मात्र कुणाल आणि अभय रस्ता चुकुन आम्ही चढत असलेल्या डोंगराच्या अगदी पायथ्याजवळ पोहोचले होते... त्यांच्या समोर कोसळणा-या धबधब्याचा आवाजासमोर आम्ही बेंबीच्या देठापासुन मारलेल्या हाकांचा निभाव लागला नाही... थोड्या वेळाने मात्र ही जोडी दिसली ... शिट्ट्या मारुन यांना वरती चढण्याचे ईशारे केले आणि नशीब.. त्यांना ते समजले आणि बहाद्दरांनी चढाई सुरु केली ...बहाद्दर यासाठी की ते ज्या रस्त्याने आले... कदाचितच कुणी ट्रेकर्स आले असतील ..!!

" चरैव ईति । चरैव ईति ॥
चालत रहा । चालत रहा॥ "

भटकंतीच्या पुस्तकात वाचलेल्या या ओळी मनात घोळत होत्या ...
सोपे वाटणारे हे दोन शब्द त्यावेळी उच्चारायलाही अवघड वाटायला लागले होते॥



एव्हाना आम्ही भल्या मोठ्या डोंगरासमोर आणि तशाच मोठ्या डोंगरावर पोहोचलो होतो. वाटले गडावर पोहोचलोच.. पण नाही ... समोरच्या भल्या मोठ्या थोरल्या डोंगरावर धुक्यामध्ये अंधुकसा तोरणा उभा दिसत होता ... जणु खुणावत होता... या बहाद्दरांनो...! डोंगरावरुन तोरण्याकडे जाणारी वाट फ़ारच अवघड वाटत होती... जोराचा वारा आणि पावसाचा मार ..
बा ~~~ पु ..!!
एकमेकांचे हात पकडुन आम्ही पुढे सरकत राहिलो.. जोरदार वा-याच्या एका झोताबरोबर वेलुची टोपी त्याला सोडुन उडुन गेली .. तिला पकडने.. किंवा तसा प्रयत्न करणेही असक्य होते .. बिच्चारा वेलू ..!

समोरच्या एका दगडवजा टेकडीवर एक ट्रेकर जोडपे भेटले... ... एवढ्या पावसात आणि तेही दोघेच ... मानले राव..! सकाळपासुन आम्हांला भेटणारे ते आणि त्यांना भेटणारे आम्ही ... पहिलेच..!! म्हणजे आज आमच्या शिवाय कुणीच ट्रेकला आले नव्हते...! सही ! त्या ट्रेकर जोडप्याला सोबत करत आम्ही पुढे चालु लागलो ..थोड्या वेळाने एका प्रचंड धबधब्याजवळ पोहोचलो.. मान उंच करुन त्याचे फोटो घेतले.. मात्र त्याच्यापायथ्यापासुन त्याच्या वरच्या टोकापर्यंतचा फोटो घेणे शक्य झाले नाही ... त्या धबधब्याखाली मस्त भिजुन घेतले आणि वेळ न घालवता पुढे वाट चालु लागलो...


निसरड्या रस्ता आणि पाय-या चढुन आम्ही पहिल्या दरवाजाजवळ आलो ... हा "बिनिदरवाजा" .. थोडे पुढे चालल्यानंतर येतो तो "कोठी दरवाजा" .. दोन्ही दरवाजे अजुनही आपल्या अस्तित्वाची जाणीव देत उभे आहेत. पटापट फोटो घेत आम्ही पुढे सरसावलो... पाण्याच्या एका टाक्यशेजारी छोटेसे एक मंदिर आहे .. कदचित हे "तोरणाईदेवी" चे असावे॥




थोडे वरच्या बाजुला चढुन गेले की एक प्रशस्त मंदिर आहे, "मेंगाई" देवीचे ... त्याच्या समोर एक छोटेसे .. पडझड झालेले .. बाहेरचा नंदी ते महादेवाचे मंदिर असल्याची साक्ष देत होता.. आतमध्ये एक गणेशाची मुर्तीही आहे ..
बाकी ईतरत्र काही अवशेष पडलेले आहेत .. देवदर्शन घेऊन आम्ही पोटातल्या कावळ्यांनाही नैवेद्य देण्याचा तयारीला लागलो.... सोबत आणलेले वडापाव.. काही बिस्कीटे आणि काही फ़ळे... मस्त ..! पोटाला आधार मिळाला होता.
पुन्हा थोडेसे फोटो काढुन आम्ही उतरण्याची तयारी सुरु केली... दुपारचे ३.३० झाले होते... सुमारे साडे चार तास आम्हाला फ़क्त चढाई करण्यास लागले होते..




चढाईच्या आठवणीनेच उतरण्याची धास्ती लगली होते.. पुन्हा एकदा देव दर्शन घेऊनआम्ही गड उतरायला सुरुवत केली... चढाईच्या वेळी रस्ता जरा ओळखीचा झाल्याने पटापटपाउले उचलत आम्ही चालु लागलो... ६.३० ला गाडीजवळ पोहोचलो. गरमा-गरम पोहे आणि चहा जणु आमचीच वाट पहात होते. मस्त दोन-दोन प्लेट पोहे खाऊन परतीचा प्रवास सुरु केला... यावेळी मात्र रेशमियाची गाणी वाजत होती.. जरा आवाज कमी करायलासांगुन मी संपुर्ण ट्रेक पुन्हा एकदा उजाळुन पाहिला. काहितरी राहिल्याची जाणीव झाली... ॥



"हो.. ब-याच गोष्टी पहायच्या राहुन गेल्या... बुधला माची, झुंजारमलमाची, कोंकण दरवाजा, विशाळाटोक, टकमक टोक, चित्ता दरवाजा.. आणि बरेच काही...काही हरकत नाही...
पुन्हा एकदा गड चढण्याची गुर्मी आहेच ना....!!""

काही आठवणी : विशेष म्हणता येतील अशा...
१.कुणाल - नेहमीच्या ट्रेक मधला हा महत्वाचा गडी... त्याचा नारा - "मुश्कील वक्त - कमांडो सक्त.." मनाला एक तरतरीची अनुभुती देत होता... रस्ता चुकुनही त्याची गड चढण्याची जिद्द खरोखरच नावाजण्याजोगी...शिवाय त्याचे शाब्दीक विनोदही थकव्याला दुर ठेवणारे!
"गुलाम" सिनेमातले ते गाणे.. "आती क्या खंडाला..." म्हणे हा "हाथी का अंडा ला..." असे म्हणायचा... हा हा हा.. सही ना॥?



२. अभय - नुकताच यु.के. वरुन आलेला हा तीन महिन्यानंतर स्वतःतील जिद्द , आणि शारिरीक क्षमता व त्यासाठीची त्याच्या मनाची तयारी यांची तयारी करीत होता. एखाद दुसरा ट्रेक केलेला.. पण असा...? .. नाही ..पहिल्यांदाच ... कुणाल बरोबर त्याला गड चढतानाअ, कुणालला समजुन घेण्याचा वेळमिळाला..... म्हणतो कसा... "अगर कुणाल कहे, की मेरा दिल केहता है की हम लोग सही रस्ते पर है, तो समज जाओ, तुम गलत रस्ते पर हो ॥!!"



३.वेलु - तसा हा शांतच राहणारा... म्हणजे त्याला एक कारण आहे.. त्याला अगदीच थोडे हिंदी समजते.. बोलायचे तर ईंग्रजीतुन... अहो पण असे आम्ही ईंग्रजीतुन त्याच्याशी किती आणि काय बोलणार.. गडाचा ईतिहास सांगायचा म्हटले तर बोंब... काही चुकीची माहिती तर देणार नाही ना याचे टेंशन...! बिचारा.. टोपी उडुन गेल्यामुळे थोडासा नाराज होता.. आणि थकल्यामुळे दोन दिवस सुट्टी घ्यायचा विचार करत होता!



४. राहुल - नेहमीच तक्रार करणारा हा किरकि-या आज मात्र फ़ारच फ़्रेश दिअत होता..घणगडच्या ट्रेकच्या वेळी याने सही टाईम-पास केला होता.. मात्र आज हा अगदी काहीही तक्रार न करता आमच्या बरोबर ट्रेक करत होता... त्या दिवशी "फ़्रेंडशिप डे" होता आणि याला पुण्यात पोहचुन तो साजरा करण्याचे खुळ लागले होते... याची वारंवार लागणारी भुक सोडली तर लांबच्या ट्रेकला सोबत न्यायलाही काही हरकत नाही॥ !



५. चंद्रकांत - हा छत्तीसगड बाजुचा.. मराठीही त्याच्याच शैलीत बोलणारा... त्याच्या हजार फोटोंची क्षमता असणा-या कैमे-यामध्ये यावेळी फ़क्त ५० - ६० फ़ोटो काढु शकल्यामुळे थोडासा "डाऊन" दिसत होता.. याचा आणि कुणालचा ट्रेकला जाण्याची खुमखुमी मात्र नावाजण्याजोगी आहे.. कधी ही बेत ठरवा.. जोडी तयार॥ !!




६. अनिताः सिंहगडानंतर पहिल्यांदाच ट्रेक करणारी ही मुलगी खरच धाडसाची... कोसळणा-या पावसांत तोरण्यासारख्या ट्रेकला जाण्याची तिची तयारी आणि उत्साह बघण्यासारखा होता.. तिने दाखवलेल्या विश्वासाला खरच मानले ॥!





.. आणि जर तुम्ही पावसाळ्यात तोरण्याचा बेत करणार असाल तरः
. शुभेच्छा..!
२. शुज चांगली ग्रीप असणारे वापरा..
. सोबत एक जोडी एक्स्ट्रा कपडे ठेवा.. भिजल्या नंतर कामी येतील.
४. छत्री किंवा टोपी - कैप घेऊ नका... काही उपयोग होणार नाही.
५. जैकेट किंवा रेनकोट असेल तर तो घट्ट बसणारा असावा म्हणजे वा-याचा जोर [जास्त]जाणवणार नाही ...
[ आणि उडुन जाण्याची शक्यता कमी राहिल .. हा हा ..! ]
६. महत्वाचे - जाताना सोबत नेलेल्या प्लैस्टीक आणि ईतर वस्तु स्वतः खाली घेऊन या..!
तोरण्याच्या माहितीसाठी बाजुचे चित्र पहा. फ़ोटो मोठा करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

अधिक फोटो इथे आहेत...!


...भुंगा!