चांगलं आहे पण ...

नुकत्याच झालेल्या १५ आँगस्टला शाळेत म्हणे चाँकलेटस मिळाली... चांगलं आहे पण ...
आमच्यावेळी मिळणा-या त्या पौष्टीक "सुकडी व खोब-याचे " काय?

आधुनिक जगात फोन आणि मोबाईल बरोबर ए-मेल पण आले, चांगलं आहे पण ...
लिखानात चेहरा दाखवाना-या त्या अंतर्देशीय पत्रांचे काय ?

पावसामुळे ओल धरलेल्या घराच्या भिंतिचे मी "वाटरप्रूफिंग" केले, चांगलं आहे पण ...
दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या त्या सिंहगडाच्या "कल्याण दरावाज्याच" काय?

पुण्यात नव-नविन कंपन्या आल्या/ येताहेत , पुण्याच कल्याण झालं, चांगलं आहे पण ...
हजारो कामगारांना बेकार करणा-या त्या "बजाजचं " काय?

मुलं बोलायला लागली, इंग्रजी शिकुन "मंम्मी-डैडी " म्हणु लागलीत, चांगलं आहे पण ...
मायबोलीमधली ती "आई-बाबा " ही हाक ऐंकण्यास आतुर असलेल्या त्या मनांचे काय?

मी लिहीले, तुम्ही वाचले, चांगलं आहे पण ...
फक्त वाचुन विसणारच असाल तर अशा वाचण्याचा फ़ायदा काय?

...भुंगा!