वेळापुर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर ...
सोलापुर जिल्ह्यातील वेळापुर येथील हर्नेश्वर महादेव मंदिर हे अर्धनारीनटेश्वराचे हे जगातील एकमेव असे मंदिर आहे...हेमाडपंथी वास्तु-पध्दतीचे हे बांधकाम असुन यादव कालीन राजा रामचंद्र [१२७१ ते १३१०] यांच्या बद्दलचे शिलालेख यावर कोरलेले आहेत। मराठी आणि संस्कृत भाषेत असणा-या या शिलालेखात देवराव यांच्या नावाचा उल्लेख आहे. चैत्र - वैद्य १, मार्च - एप्रिलच्या दरम्यान या ठीकाणी नटेश्वराच्या नावाने यात्रा भरते.
जगातील एकमेव असे म्हणुन जरी या मंदिराचा उल्लेख करण्यात आला तरी मात्र आपल्या पुरातन खात्याकडुन अगदीच दुर्लक्षित म्हणावे या अवस्थेत हे मंदिर आहे. मंदिराबद्दल पुजारी सोडले तर कोणालाच माहिती नाही. मी काढलेल्या काही छायाचित्रांमध्ये एक छायाचित्र हे मंदिर भारतीय पुरातनखात्याच्या आधिन असल्याचा [अंदाजे औ.२००६ मधील छायाचित्र] एक बोर्ड दाखवते.. मात्र काही दिवसांपुर्वी मी पुन्हा भेट दिली [ अंदाजे सप्टें २००७] तेंव्हा हा बोर्डच गायब होता. मंदिराच्या पुजा-यांशी बोलणे झाले तेंव्हा समजले की त्यांनी हेमंदिर वाचवण्यासाठी कोर्टापर्यंत धाव घेतली आहे... मात्र पुरातन खात्याचा हे मंदिर वाचवण्यात अगर ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात "..आम्हाला काय त्याचे !!" असा ठेका आहे. मात्र आपल्या वेबसाईटवर या मंदिराचा उल्लेख जरुर केला आहे. [अ.नं. १०७]
मंदिरासमोरच , महादेवाच्या अस्थित्वाची ग्वाही देणारे पाण्याचे एक मोठाले कुंड आहे.. बाराही महिने यामध्ये पाणी असते. डाव्या बाजुला एक गो-मुख असुन पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे...यामध्येच, उजव्या बाजुला असणा-या पाच - सहा मंदिरामध्ये नागदेवता, श्री गणेश यांच्या मुर्त्या आहेत. तर डाव्याबाजुला एक छोटेसे मंदिर असुन त्यामध्ये एक पिंडी आहे. मंदिरातील बहुतांशी मुर्त्या जवळच - पुरातन खात्याने - बांधलेल्या संग्रहालयात आहेत। संग्रहालयातील काही मुर्त्यांवर हात फिरवला - अथवा - टिचकी मारल्यास सप्तसुर निघतात असे मंदिराचे पुजारी यांनी सांगितले... मला मात्र प्रत्यक्ष हे संग्रहालय बंद असल्याने पाहता आले नाही॥
मुख्य दरवजासमोरच एक नंदीची सरासरी आकारापेक्षा मोठीकच म्हणता येईल अशी मुर्ती आहे.... गाभा-यातील दरवाजावर "गजलक्ष्मी" कोरलेली आहे व हे सुद्धा आपल्यामध्ये एकमेव असा उल्लेख करण्यासारखे आहे... कारण शक्यतो मंदिराच्या - गाभा-याच्या दरावाज्यावर गणपती कोरलेला असतो. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजुला एक छोटेसे मंदिर भग्नावस्थेत अजुनही उभे आहे... आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मुर्ती अतिशय देखणी असुन त्या कालीन कलेचा एक अद्वीतिय नमुना म्हणावा अशीच आहे. पांढ-या शुभ्र अशा वस्त्रात असणारी ही मुर्ती, पुजारी काकांनी आमच्यासाठी पुर्णपणे वर्णन करुन सांगितली. मुर्तीच्या वरील भागात - गोलाकार - सप्तऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असुन मध्यभागी सिंह [ किंवा राक्षस] मुख आहे. देवी पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे तर पायाच्या बाजुला गणेश, एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
.... दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे, पुजारी सोडले तर हे मंदिर, मुर्ती व त्या मुर्तीचा इतिहास याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही...!! कदाचित पुन्हा एकदा भेट देऊन पुजा-यांकडुन ही माहीती रेकार्ड करावी म्हणतो, कारण दोन वेळा ऐकुनही मला ती शब्दन-शब्द स्मरत नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर लिहिणे जरा अवघडच आहे... नाही का?
फोटो येथे पहा..!
... भुंगा!
२ टिप्पण्या