मोबाईलदुखी

Several mobile phonesImage via Wikipedia
..... मी म्हणतो - मोबाईलवर फोन करुन कुणी सोम्या-गोम्या आहे का विचारण्यापेक्षा - हा नंबर सोम्याराव किंवा गोम्यासाहेबांचा आहे काय? असे सभ्यपणे विचारायला - त्या फोन करणा-यांचा बा ची बाभळ बुडते काय ? ...... फोनवर असे विचारतात जसे माझ्या मोबाईलवर फोन करुन माझ्यावर उपकार करताहेत .. सुक्काळीचे ..!

ब-याचदा तर - हॅलो म्हणताच - म्हणे सोम्याला फोन द्या.... गोम्याला बोलवा .... आरं , म्या काय तुमच्या आबासाहेबांचा नोकर हाय काय? म्या म्हणतो - फोन करायच्या आधी नंबर तपासुन बघावा .... मोबाईलचा अन् डोळ्याचा सुध्दा ... नाही का? ..... फुकाटची मोबाईलदुखी ....!!

...भुंगा!

Zemanta Pixie

टिप्पण्या