केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी...


.... परवा नोव्हेंबरला केंब्रिजचे फायरवर्क - आतिषबाजी - पहायला गेलो होतो... वा! मस्त मजा आली.. मागच्या ट्रीपच्या वेळी [२००६] पण हा इव्हेंट मी पाहिला होता... फार मोठा कार्यक्रम होता राव तो... या वर्षी स्पौसररस मिळाल्यामुळे थोडासा फरक जाणवला.... काही का असेना.. या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
दरवर्षी ५ नोव्हे. ला केंब्रिज, यु.के. मध्ये आतिषबाजी केली जाते... अंदाजे १९५० च्या आसपास ही रीत सुरु झाली आणि पहिली ३० वर्षे काही लोकल फॅमिलिजनी मिळुन हा गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. नंतर १९८० मध्ये टोनी हौब्स यांनी हा पुर्ण कार्यक्रम आपल्या हाती घेतला... आज केंब्रिज फायरवर्क्स एक परिपुर्ण ट्रेडिंग कंपनी म्हणुन कार्यरत आहे ..!
... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..

...भुंगा!

टिप्पण्या