ब्लॉगर ची नवीन डिझाइन्स - टेम्प्लेटस्!

बर्‍याच ब्लॉगर्सना आपले डिफॉल्ट टेम्प्लेट बदलायचे असते. मात्र कसं बदलायचं, किंवा नविन चांगले टेम्प्लेटस् कुठं मिळेल याची माहिती हवी असते. असो! ब्लॉगर.कॉम च्या ब्लॉगर्स साठी खाली दिलेल्या काही लिंक्स आहेत. बरेच चांगले टेम्प्लेटस् आहेत. बघा एखादं आवडतयं का?
बीटेम्प्लेटस्
ब्लॉगर टेम्प्लेटस् फ्री
ब्लॉगर बस्टर
अच्छा... आवडलं एखादं.. डाऊनलोड - अनझिप - करा.
आता हे नविन टेम्प्लेट वापरणार कसं? त्यासाठी ही खाली दिलेली लिंक बघा.. अगदी स्टेप - बाय - स्टेप माहिती आहे : ब्लॉगर ट्रीक्स
माझ्या ब्लॉगला लिंक अशी द्या..! काही मदत हवी असल्यास कमेंट टाका!

टिप्पण्या

भानस म्हणाले…
अनेक धन्यवाद. बरीच दिसता आहेत.:)
Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले…
फार चांगली माहिती दिलीत. मीसुद्धा नुकतीच माझ्या पडसाद ह्या ब्लॉगची टेम्पलेट बदलली आहे पण अजून नवीन आणि आकर्षक टेम्पलेटचा शोध सुरू आहेच. आता तुम्ही दिलेल्या लिंक्सवर जाऊन पहाते. जर ब्लॉगर छान छान टेम्पलेट उपलब्ध करून देणार असेल, तर सोन्याहून पिवळं!
Yogesh म्हणाले…
धन्यवाद!!! मस्त आहेत टेंप्लेट!!!!
Deepak म्हणाले…
@भानस, पंकज, मोगरा फुलला, मनमौजी
मी अशाच काही सोप्या ब्लॉगर - ब्लॉगिंग टीप्स लिहाव्य म्हणतोय.. तेवढंच नॉलेज शेअरींग.

प्रतिक्रियेबद्दल आभार!
Rohini म्हणाले…
धन्यवाद... टेम्प्लेट्स खरचच छान आहेत... मला पण माझ्या ब्लॉग चा लूक बदलायचा आहे.बघु कधी मुहुर्त लागतो ते :-) .... keep sharing...
Deepak म्हणाले…
@रोहिनी,
आपला ब्लॉग पाहिला.. छान लिहिलय... हां, टेंप्लेट मात्र बदलायलाच हवं.. चांगल्या लेखनाला - चांगल्या डिझाइनचीही आवश्यकता आहेच ना!
शिनु म्हणाले…
मी बर्याच दिवसांपासून टेम्प्लेट बदलण्याचा प्रयत्न करत आहे मात्र मला अजिबातच जमत नाहीए. तुमच्या या पोस्टचा वापर करूनही जमत नाहीए. माझ्याकडे फ़ायरफ़ॊक्स आहे आणि ब्लॊगस्पॊटवर ब्लॊग आहे.प्लीज मला मदत करा.
Deepak म्हणाले…
@शिनु,
मला वाटतं आपण अजुनही ब्लॉगरचे "क्लासिक" टेंप्लेट वापरत आहात. म्हणजे आपण अजुन नविन ब्लॉगर - कस्टमाइज डिझाईन - सेट केललं दिसत नाही. असं असेल तर खाली दिलेल्या माहिती प्रमाणे करुन बघा:

महत्त्वाचे: खाली दिलेली माहिती ही - वरील मुद्द्याला धरुन आहे. कॄपया, आपण हे चेंजेस स्वतःच्या मर्जीने आणि जबाबदारीवरच करावेत.

१. ब्लॉगरला लॉगिन करा.
२. आपल्या ब्लॉगच्या "Template" टॅब वर क्लिक करुन त्या नंतर "Customize Design" वर क्लिक करा. आपणास अशाप्रकारे [<- यावर क्लिक करा!] दिसेल.
३. UPGRADE YOUR TEMPLATE या वर क्लिक करा आणि त्यानंतर दिसणार्‍या पेजवरील एखादे टेंप्लेट सिलेक्ट करा. कोणतेही घ्या, कारण नंतर तुम्ही ते बदलणारच आहात. आणि "SAVE TEMPLATE" वर क्लिक करा.
४. आता आपण टेंप्लेट अपग्रेड केले. नविन टेंप्लेट टॅब अशी दिसेल.[<- यावर क्लिक करा!]
५. यानंतर आपणास हवे असलेले टेंप्लेट वर - पोस्टमध्ये दिलेल्या वेबसाइटवरुन डाऊनलोड - अनझिप करा.
६. आता हे नविन टेंप्लेट इंस्टाल करण्याच्या माहितीसाठी ही वेबसाईट पहा.

..... झालं!
तुम्हांला जमलं की नाही ते कळवा!
शिनु म्हणाले…
धन्यवाद!!!!!!!!!!
:)
जमलं की मलापण

आता नवी अड्चण आली:(

या आवडलेल्या टेम्प्लेटमध्ये विजेट दोनच आहेत

जुनी गायब आहेत. ती सेव्ह केलेली आहेत. ती या नव्या पानावर आणता येतील का?
Deepak म्हणाले…
@शिनु,
नविने टेंप्लेटच्या "लेआउट" टॅबवर क्लिक करुन "पेज इलेमेंटस" वर जा. तिथे "एड अ गॅजेट" असेल. पॉपाअप मधुन जे पाहिजे ते गॅजेट टाकता येइल. जर जुन्या गॅजेटचा कोड असेल तर - पॉप अप विंडो मध्ये HTML गॅजेट सिलेक्ट करुन त्यात तो कोड पेस्ट करा!

आपल्या नविन टेंप्लेटचे डिझाईन चांगले आहे. जरा ब्लॉगचे डिस्क्रिप्शन कमी करा म्हणजे "सर्च" व्यवस्थित दिसेल.
शिनु म्हणाले…
जमलं, जमलं

बाकीचंही जमलं.


थान्कू थान्कू :)
D D म्हणाले…
तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये दिलेल्या लिंक्सवर मला अजून नवीन आणि वेगळ्या प्रकारची टेम्प्लेट्‌स पहायला मिळाली. मी त्या साईट्‌स बुकमार्क करून ठेवल्या आहेत. मला अजून एखादा नवीन ब्लॉग तयार करायचा असेल तर, किंवा माझ्या ब्लॉगचं टेम्प्लेट बदलावंसं वाटलं, तर मला या साईट्‌स फ़ार उपयुक्त ठरतील.
पण डिफ़ॉल्ट टेम्प्लेट बदलल्यानंतर नवीन टेम्प्लेटवर लिहिण्याचा माझा उत्साह वाढलाय, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतंय!
अपर्णा म्हणाले…
mala ek mahiti hawi aahe ti mhanje already majhya blog war followers mhanun aahet tyana navya template madhe kase add kartat?? karan ti widget copy karnyatype watat nahi....dhanywad

--aparna
Deepak म्हणाले…
@अपर्णा,
आपण नविन टेंप्लेट टाकले आहे का? कारण अजुनतरी, जुनंच टेंप्लेट दिसतयं.
असो, नविन टेंप्लेट टाकल्यानंतर, आपल्या जुन्या टेंप्लेटवरचे फॉलोअर्स नविन टेंप्लेटवरही यायला हवेत. नाही आले तर हे करा:

१. "फॉलोअर" ऑप्शन पुन्हा टाकण्या साठी "Layout" टॅब वर क्लिक करुन "Page Elements" मध्ये जा.
२. जिथं आपणांस हे विजेट टाकायचं आहे त्या ठीकाणावरचं "Add a Gadget" क्लिक करा.
३. एक पॉप-अप विंडो ओपन होईल त्यातुन "Followers" च्या बॉक्सवर क्लिक करा. त्यात आपली माहिती भरा.

झालं! आपले जुने फॉलोअर्स आता नविन टेंप्लेट वर सुध्दा दिसायला हवेत!
अपर्णा म्हणाले…
आता मोठा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा लागेल...हुर्रे....झालं एकदाचं अहो मला वाटलं की ते एकदा डिलीट झालेले followers पुन्हा येणार नाहीत म्हणून मी टेम्प्लेट बदलायच्या आधी तुम्हाला विचारलं. हे इतकं सोप्पं होतं हे मला माहित नव्हतं. पण आपली खूपच मदत झाली आणि त्याबद्दल खूप खूप आभार.....आता हे टेम्प्लेट कसं वाटतंय ते मला सांगा....
Deepak म्हणाले…
@अपर्णा,
नविन टेंप्लेट छान आहे!
माझी मदत आपल्या कामी आली, लिहणं साध्य झालं!
आपण लिहित रहा, आमच्यासारखे वाचणारे खुप आहेतच.

आभार / शुभेच्छा.