ब्लॉग एडिक्ट?

दैनंदिनी - १ सप्टें. २००९

बर्‍यापैकी दिवस होता.. आज काल कामातुन मिळालेला थोडासा वेळही ब्लॉगिंग करण्यात किंवा वाचण्यात जातोय.. मला माहितय, मी नेट एडिक्ट आहे... काय फरक पडतो - ब्लॉग एडिक्ट झालं तर?
काही वेळ घालवुन काही ब्लॉग वेजिटस् तयार केली.... काही महेंद्रजींच्या ब्लॉगसाठी तर काही माझ्या ब्लॉगवर चिकटवायला... ! तुम्ही जर एक्टीव ब्लॉगर असाल तर मला लिन्क पाठवा, मी तुमच्या ब्लॉगसाठी विजेट बनवायचा प्रयत्न [*] करेन!

* अटी लागू: मला वेळ मिळणं... तुम्ही एक्टीव ब्लॉगर असणं आणि मला बॅक लिंक देणं आवश्यक!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Yes, I am interested can you please suggest/write widgets for me ?
विनायक रानडे म्हणाले…
नमस्कार!
तुमचा ब्लॉग फार आवडला, मांडणी छान आकर्षक आहे. माझ्या ब्लॉग संबंधित तुमचे प्रामाणिक मत जाणून घ्यायचे आहे. तसेच ब्लॉग हीट वाढण्याचे काय प्रकार आहेत? शक्य आहे का?
Deepak म्हणाले…
@सोमेश [मी],
तुमच्यासाठी मी १२५px चं "बॅनर विजेट" बॅकलिंकसाठी - बनवलं आहे. बाकी आपण वर्डप्रेस - होस्टेड सर्वर वरती वापरत असल्याने - तुम्हाला - वर्डप्रेसवरतीच चिक्कार विजेटस् मिळतील. एखादं पर्टीक्युलर - स्पेसिफिक - कारणासाठी - हवं असेल तर तसं वर्डप्रेसवरती शोधुनही सापडेल.


@ श्री. विनायक रानडे,
ब्लॉगिगच्या दुनियेत आपले स्वागत. आपला ब्लॉग पाहिला. चांगली टेक्निकल माहिती आहे. एकंदरीत आपण एखादी तंत्रज्ञान संस्था चालवत आहात, असं दिसतंय. असो.
१. आपण ब्लॉगचे टेम्प्लेट बदलावं असं, माझं - प्रामाणिक - मत आहे. इलेक्ट्रॉनिकचे काही डिझाइन्स पहा आणि ते टेम्प्लेट इंस्टॉल करा.
२. ब्लॉग हिट वाढवण्याच्या बाबतीत मी सविस्तर लवकरच लिहिने - तेंव्हा पुन्हा भेटुच.

प्रतिक्रियेबद्दल आभार!
अनामित म्हणाले…
या पोस्टवर कमेंट टाकायला जरा उशीरच झालाय....आत्ताच महेंद्रजींच्या ब्लॉगवर ’सहजच’ चे विजेट पाहिले....त्याचा कोड मला पाठवू शकाल का?
मीच काढलेल्या त्या कोंबड्याचे चित्र ह्या रूपात खूप आवडले मला...आभार
तन्वी
Deepak म्हणाले…
@तन्वी,
विजेट कोड जरुर पाठविन :-) अहो, तुमच्याच ब्लॉगसाठी - तुमचाच कोंबडा चोरुन [!] बनवलयं ते!! त्यासाठी मला आपला ई-मेल लागेल. तो इथं देण्यापेक्षा मी आपल्या आपल्या ब्लॉगर - "अबाउट पेजवर" माझ्या ई-मेल सहित कमेंट लिहिली आहे, आपण त्या ई-मेल वर रीप्लाय टाका.. मी आपणास कोड पाठवुन देईन.

आभार.
अपर्णा म्हणाले…
आपला ब्लॉग छानच आहे...आधी प्रतिक्रिया देणं कदाचित झालं नसेल पण ही ऑफ़र जरा जास्त अपिलिंग वाटली म्हणून जास्त उशीर करत नाही. माझ्या ब्लॉगसाठी जर काही करु शकलात तर प्लीज प्लीज.....बघा ना...अगदी आरामात कधी तुमच्या सवडीने ......
Deepak म्हणाले…
@अपर्णा,
आपला ब्लॉग पाहिला.. छान लिखान आहे. मी आपणासाठी बॅनर विजेट बनवतोय. तो पर्यंत तुम्ही तुमचे ब्लॉग टेम्प्लेट बदलुन बघा. अधिक माहिती मी या पोस्ट मध्ये लिहिली आहे.
अपर्णा म्हणाले…
एकदम सही आहे....हा एकदम कलाकार भुंगा आहे बरं....खूप खूप धन्यवाद....टेम्प्लेटपण बदलेन..तशी कलाकारी माझ्यात अंशतः कमीच आहे पण प्रयत्न करते....