ब्लॉगर - लेखाच्या पाऊलखुणा दाखवा!

काही ब्लॉगवर आपण पाहिलं असेल की एखादी पोस्ट दाखवताना त्या पोस्टच्या वरती ती कोणत्या कॅटेगरीत आहे ती त्या लेखाच्या आधी लिंक करुन दाखवलेली असते. इंग्रजीत - टेक्निकली या प्रकाराला "ब्रेडक्रंब्स ट्रेल" असं म्हणतात. मला काय म्हणायचय हे समजायला थोडं कठीण आहे आणि मलाही ते सांगायला. पण खाली दिलेला स्क्रीनशॉट पाहुन आपल्याला कळेल, मला काय म्हणाचय ते.आता हे कशासाठी करायचं? तर - एक तर तुमच्या विजिटर्सना सोपं नेविगेशन व्हावं आणि समजावं की ही पोस्ट - लेख कोणत्या प्रकारातला आहे. शिवाय सर्च इंजिनमध्येही आणखी एकदा त्या वर्गाची आणि शब्दाची गणती होते... आणि ती पोस्ट - लेख जरा वरती लिस्ट व्हायला मदत होते.

तर, ब्लॉगर वर एखादी पोस्ट लिहिल्यानंतर ती पोस्ट ज्या वर्गात मोडते ती दाखवण्यासाठी खाली दिलेली साधी ट्रिक वापरता येईल.

१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेऑऊट" आणि नंतर "Edit HTML" टॅबवर क्लिक करा.
२. नेहमीप्रमाणेच आपल्या टेंप्लेटची बॅकअप घ्या!
३. नंतर "Expand Widget Templates" पुढे क्लिक करुन कोड एक्सपान्ड करा.
४. आता, ही खाली दिलेली लाईन शोधा.
<b:includable id='post' var='post'>
याच्या खाली, ही खाली दिलेली लाईन शोधा

<div class="post hentry uncustomized-post-template">
किंवा
<div class="post hentry">
५. आता, त्या लाईनच्या लागलीच खाली, हा कोड पेस्ट करा.
<!-- Start breadcrumb trail-->
<b:if cond='data:blog.homepageUrl == data:blog.url'>
<b:else/>
<b:if cond='data:blog.pageType == &quot;item&quot;'>
<div class='breadcrumbsTrail'>
<a expr:href='data:blog.homepageUrl'><data:blog.title/></a> &#187;
<b:if cond='data:post.labels'><b:loop values='data:post.labels' var='label'>
<a expr:href='data:label.url' rel='tag'><data:label.name/></a>
<b:if cond='data:label.isLast != &quot;true&quot;'> &#187; </b:if>
</b:loop>
</b:if> &#187; <data:post.title/>
</div>
</b:if>
</b:if>
<!-- End breadcrumb trail-->

६. आता, "]]>" शोधा आणि त्याच्या लागलीच वरती, हा कोड पेस्ट करा.
.breadcrumbsTrail{
padding:5px 5px 5px 10px;
margin:0;font-size:95%;
line-height:1.4em;
}
७. टेंप्लेट सेव करा आणि एखाद्या पोस्ट वर क्लिक करुन पहा.
८. ती लाईन अशी दिसेल!

ब्लॉगचे नाव » वर्गाचे नाव » पोस्ट/ लेखाचे नाव

तुमच्या कमेंट्स?

टिप्पण्या

Mahendra Kulkarni म्हणाले…
हे वर्डप्रेस ला नाही... :(
Deepak म्हणाले…
@महेंद्रजी,
हां, पुन्हा वर्डप्रेसचा प्रोब्लेम. पण फक्त वर्ड्प्रेस होस्टेड ब्लॉगसाठीच. बाकी - सेल्फहोस्टेडसाठी ब्रेडक्रंबची मोठी लिस्ट आहे!
Deepak म्हणाले…
@कांचन,
असंच - आपल्य विजिटर्सना जरा सोपं नेविगेशन द्यावं म्हणुन - हा प्रयत्न!
Ajay Sonawane म्हणाले…
छान माहिती, मी प्रयत्न करीन माझ्या ब्लॉग वर,

धन्यवाद भुंगा !

-अजय
अपर्णा म्हणाले…
i didnot find this in my code..

...class="post hentry uncustomized-post-template">
किंवा
.... class="post hentry">
Deepak म्हणाले…
@अजय,
हां, बघ जमतल्यास कळव. तसं पहायला गेलं तर - विजिटर्सना जरा जास्त पोस्ट किंवा लेख उपलब्ध करुन देण्यासारखं आहे हे!
Deepak म्हणाले…
@अपर्णा,
तुमच्या ब्लॉग मध्ये हा कोड असा आहे :

<div class='post uncustomized-post-template'>

तो शोधुन पहा आणि प्रयत्न करा.
अनामित म्हणाले…
महेंद्र्जीना अनुमोदन. काहीतरी वर्ड प्रेस साठी पण लिहा. हे म्हणजे वेस्टर्न व सेन्ट्रल सारखे झाले. पण माहिती गरजेची सांगितलीत.
Deepak म्हणाले…
@अनुक्षरे/ महेंद्रजी,
वर्डप्रेस बद्दल लिहिण्यासाठी खुप काही आहे. मात्र अडचण फ्री आणि सेल्फ होस्टेड ब्लॉगची आहे. ब्लॉगरच्या "सोअर्स कोड" / विजेटमध्ये आपल्याला बदल करता येतो पण फ्री वर्डप्रेस तसा पर्याय देत नाही. फारच लिमिटेड पर्याय आहेत. हां, आता कुणी स्वत:चं होस्टींग घेतलं असेल तर मला आवडेल मदत करायला! :)
Mahendra Kulkarni म्हणाले…
मी टॅगलंय.. आजचं पोस्ट पहा.. टॅग..
भानस म्हणाले…
टॆगलेय रे तुला....पाहशील??
Deepak म्हणाले…
@महेंद्रजी, भाग्यश्री,
हो पाहिलं मी तुमच्या पोस्टवर! जरा कंटाळलोय.. रात्री किंवा उद्या लिहितो... :)
अपर्णा म्हणाले…
धन्यवाद दिपक...मी केलेत ते चेंजेस फ़क्त मला ते मी कुठलीही पोस्ट पहिल्यांदी पब्लिश करते तेव्हाच दिसतं..माहित नाही इतरांना कसं दिसतं...पुन्हा काहीतरी घोटाळा केला वाटतं...तसही कोड चेंजेस म्हटलं की सॉलिड कंटाळा येतो...सुरुवातीला काही दोन वर्ष केलं आणि इथे फ़ंक्शनल काम अस्तं...(म्हणजे असायचं...) असो...कंटाळा आला नसेल तर बघं..नाहीतर राहुदे...
आणि हो तुझी टॅगमधलं २६ नोव्हें. एकदम काळजाला भिडलं...
Deepak म्हणाले…
@अपर्णा,
मी पाहिलं तुझ्या ब्लॉगवर. कोडिंग जमलय! या लिंक्स - पाऊलखुणा, सिंगल लेख वाचतानाच दिसतात, म्हणजे पहिल्या पानावर नाही दिसत. कोणत्याही एका पोस्टवर क्लिक करुन पहा, लिंक्स दिसतील.
टॅगा-टॅगी मधे - २६ नोव्हें. ला लंडनला होतो... सर्वांसमोर रडता नाही आलं म्हणुन स्वतःच्या खोलीत जाऊन रडलो. कुणीतरी अगदी जवळचं - हिरावुन घेतलं गेलं होतं :(
अपर्णा म्हणाले…
punha check kelyabaddal aabhari...kai kai kaamala lawto amhi...:)
26th Nov la mi bhartat hote ani 29th la punha US la yayala nighanr hoto...Vimantalawar itka wichitra watat hota na palun chalalyasarkha...kharay kadhich wisaru shakanar nahi....
Manali Satam म्हणाले…
खूप खूप धन्यवाद या जरा टेक्निकल वर्गासाठी...!!! नवीन असल्याने याचा खूप फायदा होतो....
Ayshwarya Revadkar म्हणाले…
dis sounds so good so i tried on my blog... 5th step keli..pan ]]> he sapadale nahi so krata aale nahi..
Deepak म्हणाले…
@ ऐश्वर्या,
]]> ऐवजी --></style> हे आहे बघा तुमच्या ब्लॉग मध्ये!
त्याच्या लगेच वरती खालील कोड पेस्ट करा.

.breadcrumbsTrail{
padding:5px 5px 5px 10px;
margin:0;font-size:95%;
line-height:1.4em;
}

सेव करा. पहा बदल दिसतोय का?