टॅगा-टॅगी

हां, तर टॅगा-टॅगी त माझ्या नंबर लागला तर - महेंद्रजी, भाग्यश्री आणि पंकज यांच्या टॅगच्या उत्तरादाखल ही पोस्ट!

1.Where is your cell phone?
हॉलमधल्या लाकडी शोकेसवर - तिथेच नेटवर्क येतं - वॉट एन आयडिया सरजी!

2.Your hair?
थोडेच राहिले म्हणा... त्यात बर्‍याचदा झिरो कट असतो!

3.Your mother?
संस्कार - बायकोला आणि पोरीला अहो-जावो करायला शिकव... अरे-तुरे काय करतात तुला?

4.Your father?
बिंधास - स्टील मिलिटरी रुल्स!

5.Your favorite food?
अंडी आणि चिकन - अगदी रोज खाऊ शकतो!

6.Your dream last night?
हुम्म... आतापर्यंत एकही स्वप्न सकाळपर्यंत लक्षात रहात नाही... पण स्वप्नं पडतात मात्र!

7.Your favorite drink?
लस्सी किंवा मिल्क शेक.

8.Your dream/goal?
आई - बाबांना विमान प्रवास करवायचाय!


9.What room are you in?
मधल्या खोलीत.. कंम्प्युटर रूम म्हणा हवं तर!

10.Your hobby?
ट्रेकिंग - फोटोगिरी, डिझाईन, ब्लॉगिंग....!

11.Your fear?
गुडघ्याच्या दुखण्यामुळं ट्रेकिंग - भटकंती बंद तर नाही ना करावी लागणार?

12.Where do you want to be in 6 years?
स्वत:च्या शेती फार्मात!

13.Where were you last night?
घरीच! सावंतवाडीच्या प्रवासानंतर मस्त झोप घेतली!

14.Something that you aren’t diplomatic?
मैत्री आणि मित्र!

15.Muffins?
सध्या तरी फार आवडतात असं म्हणता नाही येणार!

16.Wish list item?
चार चाकी घ्यावी म्हणतोय.. बुलेटवर तिघांनी जरा अवघडल्यासारखं होतं... !

17.Where did you grow up?
सांगोला - सोलापुर जिल्हा!

18.Last thing you did?
सावंतवाडीवरुन गुडघ्याला - नॅचरोपथी - लेप देवुन आलोय.

19.What are you wearing?
टी-शर्ट आणि ट्रॅक पँट..

20.Your TV?
ओनिडा - लग्नात मिळालेला! ब्रँड विचारताय का आवडते कार्यक्रम [सोनीवरचा सी.आय.डी., सी.एन्,बी.सी - आवाज, डिस्कवरी] ?

21.Your pets?
कोणी नाही!

22.Friends
खुप आहेत आणि कॉलेजमधली मैत्री अजुनही टिकुन आहे!

23.Your life?
नथिंग स्केड्युलड...

24.Your mood?
ठिक आहे. आत्ताच ते कडु औषध घेतलंय!

25.Missing someone?
हां.. कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है!

26.Vehicle?
रॉयल इन्फिल्ड ५-एस!

27.Something you’re not wearing?
हातातलं घड्याळ!

28.Your favorite store?
विंडो शॉपिंग आणि टाईमपाससाठी कोणतंही...!

29.Your favorite color?
काळा आणि त्याचे अनेक शेड्स!

30.When was the last time you laughed?
काल रात्री - सावंतवाडीवरुन छोकरीसाठी 'लाकडी मगर' आणली. तिच्याबरोबर खेळत मस्त हसवा-हसवी झाली!

31.Last time you cried?
२६ नोव्हेंबर २००८

32.Your best friend?
हा डब्बा - कंम्प्युटर!

33.One place that you go to over and over?
स्वयंपाकखोली... चटरपटर खाणं आणि बायकोनं बनवलेली आणि लपवुन ठेवलेली चॉकलेट्स शोधुन खाणं हा माझा आणि छोकरीचा आवडता उद्योग!

34.One person who emails me regularly?
बरेच आहेत... बर्याचदा फॉरवर्डेड ईमेल्स येतात, त्यामुळे नेमका एक सांगता येणार नाही!

35.Favorite place to eat?
मोजक्याच - पुण्यात = विमाननगरला - आंध्रा बिर्याणी, सातारा रोडवर सिटी प्राईडसमोरचं शिवनेरी, स.पेठेतलं दुर्गा, गोपी, कोथरुडचं तिरंगा, निसर्ग... त्यापैकी काही!

हा... तर संपल एकदाचं...
आता मी टॅगणार - अर्थातच बरेच लोक आहेत... या घडीला आठवलेले - महेंद्रजी, पंकज,रोहन चौधरी, भाग्यश्री, तन्वी, विशाल [दादा!], मंदार जोशी, विनायकराव, हरेकृष्णाजी, अजय, विक्रम, अनुक्षरे, सोनल, कांचन, सोनल, प्रभास गुप्ते....

टिप्पण्या

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले…
मजा आली, एकमेकांबद्दल वाचताना... अशीच अधून मधून काही तरी नवीन टूम निघावी. आणि आपली मराठी ब्लॉगर मीट व्हावी अशी फार इच्छा आहे. घ्यावा का आपण पुढाकार?
Deepak म्हणाले…
@पंकज,
हां, आयडिया रास्त आहे! मराठी ब्लॉगर्सची एखादी मीट व्हायला पाहिजे..! मेला - मेली सुरु करुन पाहुयात? पोल - मतदानही घेता येईल!
Ajay Sonawane म्हणाले…
छान, टॅगींग तु सुद्धा केलंस तर, बाकी खाण्याच्या बाबतीत आपली ठिकाण मिळतीजुळती आहेत बरं का, शिवनेरी मध्ये मी मटण थाळी अगदी चापुन खातो बरं का.

-अजय
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले…
मी पोल टाकतो. तू पण टाक. म्हणजे नंतर प्रतिसाद पाहून मेलामेला करु.
veerendra म्हणाले…
va mastach ahe post.. meeting baddal maze hi mat positive ahe !! jarur bhetayla awdel ..
भानस म्हणाले…
मस्त. का रे दोनतीनदा लिहिलेस गुड्घ्याबद्दल.... :(
पंकजशी सहमत.. माझी पण फार फार इच्छा आहे आपण सगळ्यांनी भेटावे.जमवले पाहीजे. खूप मजा येईल.
Deepak म्हणाले…
@अजय,
पोस्ट लिहिताना पट्कन ज्यांची नावं आठवली त्या सर्वांना टॅगलं!
हो, खाण्याच्या बाबतीत आपली मतं नक्कीच जुळताहेत :)

@पंकज,
हो, मी ही पोल टाकतो.. बघुयात काय प्रतिसाद मिळतोय.

@विरेंद्र,
हां, बघुयात - सर्वांना एकत्र पहायला, भेटायला नक्कीच आवडेल!

@भाग्यश्री,
सध्या गुडघेदुखीने त्रस्त आहे. परवा - सावंतवाडीला जाऊन नॅचरोपथीची ट्रीटमेंट घेऊन आलोय. भटकंतीला अडथळा येऊ नये हीच प्रार्थना!
मराठी ब्लॉगर्स मीट बद्दल पंकज ने पोल ठेवलय... सर्वांच्या मताने निर्णय घेऊ!
Mahendra म्हणाले…
फार विचार करुन लिहिलंय, कुठेच पकडल्या गेला नाहित.. :) असो.. गुडघ्याची काळजी घ्या..
विशाल तेलंग्रे म्हणाले…
थांकू थांकू मला टॅगल्याबद्दल... भरपूर सिक्रेट्स कळाले तुझे... मी पण तुला टॅगलंय...!!!
Deepak म्हणाले…
@महेंद्रजी,
नाही हो.. अगदी मनात आलं तसं लिहिलंय :) - हां - हातचा राखुन म्हणा हवं तर!

@विशाल - दादा!
हुम्म.. वाचलं तुझं - टॅगा - टॅगी... मस्त आहे!
अनामित म्हणाले…
मस्त रे......लाकडी मगर आम्हाला पण हवी.....
माझ्या लेकीची सावंतवाडीहून आणलेली खेळणी मी पण तिच्यायेव्हढ्याच उत्साहाने खेळते....असो गुडघ्याची काळजी घे!!!!
आणि हो ब्लॉगर्स मीट करणार असाल तर जुनमधे करा रे म्हणजे आम्हाला पण येता येइल......
Deepak म्हणाले…
@सहजच,
हां... एक एक्स्ट्रा मगर तयार आहे!..
हो गुडघ्याचंच टेंशन आहे. :(
ब्लॉगर्सच्या मीट बद्दल सध्या पोलिंग सुरु आहे.. बघुयात कसा रिस्पाँस मिळतोय.
Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले…
भुंगोबा, गुडघ्याचं दुखणं गंभीर दिसतंय. काळजी घ्या. अक्रोड खाल्ल्याने गुडघ्यातील सांध्यात कमी झालेल्या तेलाची (वंगणाची) झीज भरून निघते असं म्हणतात. सावंतवाडीला लाकडी खेळणी छान मिळतात. माझ्या आईने सावंतवाडीवरून लाकडी फळं मागवली होती, ती कित्येक वर्ष आमच्या घरातल्या शोकेसमधे होती. एकदम खरीखुरी वाटायची. मला टॅगल्याबद्दल धन्यवाद! मला पोल दिसत नाही :-(
Deepak म्हणाले…
@कांचन,
हो, गुडघ्याची काळजी घ्यावीच लागेल.... आक्रोडबद्दल बायकोचेही तेच म्हणने आहे.. खायला पाहिजेत!
सावंतवाडीला जास्त वेळ मिळाला नाही.. मात्र लाकडी खेळणी एकापेक्षा एक सुंदर होती.
पोल- आपण अजुनही आय.ई. वापरताहात वाटतं..:) फायरफॉक्समध्ये पहा - दिसेल.. शिवाय मी चेक करतोच. तोपर्यंत आपण पंकजच्या ब्लॉगवरही मत टाकु शकता.
मराठी ब्लॉगर्सची एखादी मीट व्हायला पाहिजे..!
अनुमोदन बर का या गोष्टीला .

बाकी टॅगा - टॅगी... मस्त आहे!
Deepak म्हणाले…
@विक्रम,
हां, ब्लॉगर्स मीट बद्दल सद्ध्या मतदान चालु आहे.. बघुयात कसं जमवुन आणता येईल ते!
अपर्णा म्हणाले…
महेन्द्रकाकांना अनुमोदन...आणि आत्तापास्नं गुडघेदुखी म्हणजे सांभाळून मुख्य म्हणजे ट्रेकिंगच्या वेळी....
आणि हो तुझा ब्लॉगर्समीट साठीचा पोल कुठे पटकन दिसलं नाही म्हणून इथेच मस्त कल्पना आहे. एकदा रोहन (आपला लदाखवाला) बरोबर असंच बोलणं झालं होतं नाहीतर ऑनलाइन मीटतरी करता येईल (सगळे जण वेगवेगळ्या देशात आहे हे लक्षात घेतलं तर)

पण खरं खरं भेटायचं तर मे मध्ये काही केलं तर नक्की प्रयत्न करेन...तेव्हा टेंटेटिव्ह ट्रिप आहे...आणि आम का मौसम सगळीजण खादाडीवाले...जुळवा काहीतरी.....
Deepak म्हणाले…
@अपर्णा,
गुडघ्याचं दुखणं - कदाचित अनुवांशिक असावं = सांधेदुखी! तरीही, नॅचरोपथी ट्रीटमेंटने फरक पडतोय असं जाणवतय :) हो.. काळजी तर घेतोयच.
ब्लॉगर्स मीट पोल.. वरती उजव्या बाजुला आहे - कदाचित गुगलचा कोड आय.ई. मध्ये दिसत नसावा. फायरफॉक्स मध्ये पहा.
पोलवरुन - [पंकज] आणि इतर मंडळींच्या हजर राहण्यावरुन एखादा दिवस ठरवुयात.. ज्यावेळी बर्‍यापैकी लोक हजर राहु शकतील.
अनामित म्हणाले…
आम्ही जून मध्ये येतो तेंव्हा भेट ठरवा. मी पुण्यात महिनाभर असते.नवीन वर्षाच्या शुभेश्च्या!! tag मस्त लिहिलाय.
Deepak म्हणाले…
@अनुक्षरे,
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हो, ब्लॉगर्स मीट चा प्लान सर्वांच्या मताने करु!