कारणे द्या - क्रेडिट कार्ड रद्द केले!

ही एक शासनाची - राष्ट्रीय बँक. टेलिमार्केटींग वाल्यांच्या वारंवार येणार्‍या कॉल्सना मान देवुन कार्डसाठी हो म्हणालो. कडक वेरिफिकेशन होऊन कार्ड मंजुर झालं आणि कार्ड मिळायच्या आधी बीलही मिळाले. पण त्यातील काही गोष्टी खटकल्या... आणि सदर क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला.


कारणे:
१. जॉयनिंग फीस रु. ५०० आहे - हे कार्ड घेताना सांगितले नव्हते.
- सध्या तर कोणतीच बँक अशी फी लादत नाही!
२. जर वार्षिक रु. ५०,००० कार्डावर नाही खर्च केले तर वार्षिक फी भरावी लागेल.
- अहो, म्हणजे ५०० रु. वाचवण्यासाठी मी ५०,००० रु. खर्चु का? शिवाय ही फीसही इतर बॅका लावत नाहीत!
३. अ‍ॅक्सिडेंटल इंशोरंच्या नावाखाली दरमहा रु. ५० द्यावे लागतील! रद्द करता येईल - मात्र याबाबत बोलणे होण्याआधीच हा भाग बिलात जोडण्यात आला होता.
- त्यातही फक्त 'मेलात' वा 'कायमस्वरुपी अपंग' झाला तरच क्लेम करता येतो. क्लेम नाही केला तर पैसे बुडीत! त्यापेक्षा मी वेगळी मेडिकल/ इंशोरंस घेईन. क्लेम नाही केला तर कीमान पुढच्या वर्षीच्या इंशोरंसवर काही प्रमाणात सुट तरी मिळते!
४. सांगण्यात आलेले २-५% कॅशबॅक - सगळीकडेच चालत नाही - काही ठराविक दुकानातच चालतं!
- कॅशबॅक साठी निवडलेले शॉप्स/ ब्रँड्स आपल्याला परवडेबल नाहीतच. अहो - २०० रु. सुट मिळेल म्हणुन तुम्ही २-३ हजाराचा सुट असाच घ्याल का? मी तर नाही ब्वॉ!
५. फोन करुन वरील माहिती विचारल्यावर - जॉयनिंग फी मध्ये ५०% सुट देण्याचे अमिश दाखवले - म्हणजे चुक मान्य केल्यासारखंच ना ?
- फोन वरील संभाषणासाठी मराठी भाषा निवडण्याची सोय - मस्तच! मात्र जेंव्हा बोलण्यासाठी एखादा/ एखादी उत्तर देतो/ देते, तेंव्हा मात्र हिंदी किंवा इंग्रजीतुनच बोलणारा/री भेटतो/ते. विचारलं तर म्हणे - आमच्या कडे मराठी बोलणारं कुणी सध्या उपलब्ध नाही. अहो, मग भाषांची निवड करण्याची नाटकं कशाला करता?

हां, तर जॉयनिंग फी बद्दल मी सांगिललं की हे मला आधी सांगण्यात आलं नव्हतं - आणि मी ती फी देणार नाही. जमत नसेल तर कार्ड रद्द करा. तर म्हणे - आमच्या मॅनेजरने ५०% सुट दिलीय!
मी तिला अगदी हळुवार सांगिललं - मॅडम - तुम्हाला आणि तुमच्या मॅनेजरला "हॅपी दिवाळी!" सांगा. मला कोणतीही दिवाळी ५०% ऑफ ची ऑफर नकोय! वरील मुद्दे मान्य नसतील तर ताबडतोब कार्ड रद्द करा! धन्यवाद!

वरील प्रकारामुळे या बँकेच्या च्या क्रेडिट कार्ड शाखेवरील माझ्या विश्वासाला तडा गेला. एक प्रकारच्या फसवणुकीची जाणीव झाली आणि म्हणुन सदर कार्ड बंद करण्यास सांगितले. तुम्हीही अशा प्रकारची कार्ड घेताना - घेतल्यावर ते वापरण्याआधी - अ‍ॅक्टेवेट करण्याआधी - व्यवस्थित माहिती जाणुन घ्या!