व्हॅलेन्टाईन्स डे - गिफ्ट आयडीयाज...

या व्हॅलेन्टाईन्स डे ला एकमेकांना काय भेट द्यावं - हा दरवर्षीचा महाप्रश्न! सगळ्यांसमोरचा म्हणत नाही - पण "व्हॅलेन्टाईन" ना नक्कीच पडत असावा. साध्या सोप्या प्रकारात म्हटलं तर - एखादं ग्रिटींग + गुलाबाचं फुल = व्हॅलेन्टाईन्स भेट! नेहमीच्या भेट-प्रकारात अंदाजे खालील गोष्टी असतात:

  • तिच्यासाठी फुलांचा गुच्छ + चॉकलेट्स + टेडी बेअर + की-चेन वगैरे
  • सोबत सिनेमाला जाणे...
  • त्याच्यासाठी वॉलेट किंवा परफ्युम...
  • तिच्यासाठी पर्स किंवा परफ्युम...
  • संध्याकाळी एखाद्या हॉटेलात जेवण!

मात्र यावर्षी जरासं वेगळं भेट दिलं तर? मी काही जादुचा मंत्र किंवा अफलातुन "आयडियाची कल्पना" देत नाहीये - मात्र जरासं नाविन्य सुचवतोय, एवढंच.

  • टी-शर्टः जरासं वेगळंपण असणारे टी-शर्ट "ओकाका" या संकेतस्थळावर पाहिले. मराठीपण मिरवण्याचा हा वेगळा प्रकार खरंच आवडला. यामध्ये आपण त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी असं दोघांसाठीही टी-शर्ट मागवु शकता.
  • पुस्तकः हो, एखादं प्रेमकथा असणार पुस्तक [ उदा. तिच्यासाठी - बकुळा- आणि त्याच्यासाठी - दुनियादारी- ] आपण त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी नक्कीच मागवु शकता. यासाठी फ्लिपकार्ट किंवा रेडिफ या संकेतस्थळावरुन आपणांस "विनामुल्य घरपोच" पुस्तकं मागवता येतील. मराठीतील पुस्तकं रसिक साहित्य किंवा सह्याद्री बुक डेपो वरुनही मागवता येतील.
  • गेम्सः गेमाड्या व्हॅलेन्टाईन्स साठी काही परवडणार्‍या गेम्सही आपण फ्लिपकार्ट वरुन मागवु शकता.
  • रोमँटीक गाण्याचा सेटः संपुर्ण रोमॅंटीक गाण्यांचा सी.डी. सेटही एक भेट रोमॅंटीक ठरेल. यामध्ये पंचमदा पासुन सध्याच्या गाण्यापर्यंत आपणांस निवड करता येईल.
  • नियतकालिक [मॅगझिन] ची वर्गणी: त्याच्या किंवा तिच्या आवडीनुसार वर्षभरासाठी तुम्ही एखादं नियतकालिक [मॅगझिन] मागवु शकता. यामध्ये इतर नियतकालिकेही असतील - अगदी 'माझी सहेली' ते 'गृहशोभिका'. काही वाचनीय नियतकालिके तुमच्या पेपरवाल्याकडेही मिळतील. त्यातल एखादं बायकोसाठीही मागवता येईल.
  • यावर्षी व्हॅलेन्टाईन्स डे - पुढच्या सोमवारी येतोय - म्हणजे एक आठवडा आहे - बघा सोमवारची सुट्टी मिळतेय का.. एखादी मस्त विकेंड-ट्रीप होवुन जाईल - कसं?

याशिवायही तुमच्या काही [ भन्नाट ] आयड्या असतीलच... जमलं तर शेअर करा.. इतरांनाही फायदाच होईल.

यासंदर्भात वाचावं असं काही:
त्याच्यासाठी: महेंद्र कुलकर्णीं लिखित = "रोमॅंटीक आयडीयाज.."
तिच्यासाठी: कांचन कराई लिकित = "रोमॅंटीक आयडीयाज.. माझ्याही"
व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे: = "मराठी ग्रिटींग"

"व्हॅलेन्टाईन्स डे" साजरा करायचा की नाही - यावर वादा-वादी होतेच - दरवर्षी!! मला वाटतं - प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा अशा सणाची गरज नाही.