"जोर का झटका" - तद्दन फालतु!

परवा चुकुनच हा कार्यक्रम पाहिला. एएक्सएन् वरचा वाईप-आउट चांगला वाटला होता. मात्र "जोर का झटका" पाहुन अपेक्षाभंगच झाला.

[छायाचित्र - "जोर का झटका" संकेतस्थळावरुन]


या कार्यक्रमातील सहभागी आहेत - आकाशदीप सहगल, अमित सरीन, आशिमा भल्ला, बख्तियार ईरानी, क्लाउडिया सेस्ला, देबीना बनर्जी, डिम्पी महाजन, गौरव चोपड़ा, ग्रेसियस डीकोस्टा, हनीफ हिलाल, जेनिफर विंजेट, करिश्मा तन्ना, कृष्णा पाटिल, कुशल पंजाबी, मानस कत्याल, मनोज कुमार, मिंक ब्रार, नारायणी शास्त्री, नताशा सूरी, पायल रोहतगी, प्रियदर्शनी सिंह, राजा चौधरी, रोहित वर्मा, सिमरन कौर मुंडी, सोनिका कालीरमन, एनी, विंदु दारा सिंह व वृजेश हिरजी.. हुश्श..!

यातली कीती नावं आणि कोण ओळखीचं वाटतंय त्याचा विचार नका करु.. एक - दोन सोडले तर एकही नाव - चेहरा ओळखीचा वाटत नाही. शाहरुख फक्त कमेंटींग करतानाच दिसतो...

यापेक्षा चांगला कार्यक्रम "पोगो टी.व्ही" वर येतो. "टकेशि'ज कॅसल" नावाचा - त्यात जावेद जाफरीचा आवाज आहे. कॉमेडी म्हणुन तरी "टकेशि'ज कॅसल " या "जोर का झटका" पेक्षा कधीही चांगला आहे. किमान हसु तरी येतं. "जोर का झटका" पाहुन हसावं की रडावं - हेच कळत नाही!!

जाऊ दे... च्यायला - आपला "टकेशि'ज कॅसल" किंवा "सी.आय.डी" कधीही चांगला - हसायला तरी मोकळे..!

ता.क - ही टिपणी म्हणजे शा.खा. [शारुख हो!] च्या असंख्य - अगणित चाहत्यांना वाईट वाटावे किंवा त्यांनी हा कार्यक्रम पाहु नये यासाठी नाही! शा.खा. ला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा!

टिप्पण्या

परवा चुकुनच हा कार्यक्रम पाहिला.परवा चुकुनच हा कार्यक्रम पाहिला.:0

Mi tar chukun suddha nahi pahila :P
नागेश देशपांडे म्हणाले…
प्रसिद्धीसाठी लोकं काहीही करतात याचच उदा. म्हणजे हा शो...
देवदत्त म्हणाले…
'टकेशि'ज कॅसल'
बरोबर.. मला नाव आठवत नव्हते. त्या वाहिन्या जास्त कधी पाहिल्या जात नाही म्हणून असेल बहुधा.
मी तर शाहरुख चा हा कार्यक्रम ५ मिनिटे ही पाहिला नाही.
Priya Kulkarni म्हणाले…
"टकेशि'ज कॅसल" is Good.

dont want to see Sha. Kha.

---Priya