भटकंती: किल्ले नळदुर्ग


सतिशच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने हैदराबादला जाताना हा किल्ला जवळुन पाहण्याचा योग आला... नल-दमयंती या जोडीशी नाते सांगणारा हा किल्ला चांगला १-२ दिवसांचा वेळ काढुन बघण्यासारखा आहे. सोलापूर पासुन अंदाजे ४०-४५ की.मी. अंतरावर अगदी हैदराबाद रस्त्याशी लागुन [जिल्हा - उस्मानाबाद] हा किल्ला आहे.
मुघल साम्राज्याच्या बराच आधी, १४ ते १५ व्या शतकात "येरल" नावाने ओळखला जाणारा हा किल्ला बाहमनी सुलतानच्या मालकिचा असल्याचा उल्लेख सापडतो... त्यानंतर हा किल्ला मुघल आणि ओघाने हैदराबादच्या निजामाकडे गेला....प्रारंभिक इडो-इस्लामिक स्थापत्याशास्त्राचे एक उत्तम उदाहरण असणारा हा किल्ला अनेक बुरुजांनी [माहितीनुसार सुमारे ११४] बनलेला आहे. किल्ल्याच्या आत अनेक इमारती कोसळण्याच्या अवस्थेत उभ्या आहेत... मात्र सध्या तरी किल्ल्याच्या डाग-डुजीचे काम चालु आहे... इब्राहिम आदिलशहा -२ च्या काळात बांधकाम झालेला "पाणी महाल" आणि बोरी नदीवरील धरण हे मात्र पाहिलेच पाहिजे असे!

अधिक फोटो येथे आहेत ..!


...भुंगा!

टिप्पण्या