मी माझाच अपघात पाहिला....!

पेट्रोल भरुन पंपाच्या बाहेर पडत होतो... अगदी १०-२० चे स्पीड.. इंडिकेटर लाऊन... तेवढ्यात..१८-१९ वर्षाचा एक नमुना... [ |- <- असा] जोरात येऊन माझ्या गाडीला ठोकतो... त्याच्या बाइकचे पुढचे चाक - माझ्या बाइकची बौडी यांच्या मध्ये माझा उजवा पाय...! मी गाडी बाजुला लावली... हेल्मेट काढुन खाली पाय ठेवला... तशी सर्रकन.. पायाची कळ चमकुन गेली... आतापर्यंत दाबुन ठेवलेला राग अन् शांतपणे सांगण्याचे मत - तिथेच संपले... खाड-खाड अशा तीन-चार त्याच्या कानाखाली वाजवल्या... तरीही राग शांत होत नव्हता... मात्र लोक म्हणाले - जाऊ दे..! त्याला त्याच्या वडिलांचा नंबर विचारुन फोन लावला.. तर नमुन्याने घरचा नंबर दिला.. आणि बघायला त्याचा भाऊ आला... आणि तोही धाकटा..!! वडील कोठे आहेत तर म्हणे बाहेर गेलेत.... तुझ्याकडे ड्रायव्हींग लायसेन्स आहे..... नाही..... मग तु असा गाडी घेऊन आलाच कसा ... वडिलांनी सांगितले - पेट्रोल भरुन आणायला.. धन्य!!
त्याच्या गाडीकडे पाहिले - पुढचे चाक बर्‍यापैकी वाकलेले..... हॅडलचा सेंट्रल बोल्ट - तुटलेला... एकंदरीत त्याच्या स्पीडची जाणीव करुन देत होते... पेट्रोल पंपावर एन्ट्री करताना एवढा स्पीड...अ‍ॅक्सिडेंडच्या जागेपासुन पेट्रोलची मशिन अगदी पाच - दहा फुटावर.. अर्थात .. त्याने माझ्या बाइकला ठोकले नसते तर त्या मशिनचे नक्कीच उदघाटन झाले असते! कदाचित मोठा बाका प्रसंग उदभवला असता..!


.... पुन्हा गाडीला कीक मारली आणि औफिसला पोहोचलो... संध्याकाळपर्यंत पाय सुजला होता.... एक पेनकिलर खाउन थोडा आराम मिळाला होता... मात्र चालताना पायात चांगलीच कळ मारत होते..!
उद्या विकेन्डला एक्स-रे काढावा म्हणतोय.. फ्रॅक्चरची उगाचच शंका नको...!