शिओमी - एमआय ३ मोबाईल [Xiomi MI3 Mobile]

सगळे स्पेसीफिकेशन्स फ्लिपकार्टवर आहेतच.
१. चायनिस आहे?: कसं करावं? कंपनीचं नाव नाही लिहित - पण जवळ - जवळ सगळ्याच कंपन्यांचे मोबाईल किंवा पार्टस चीनमध्ये बनतात!
२. स्लीम/ फ्लॅट बॉडी: पाच इंची स्क्रीनच्या तुलनेत जरा मोठाच वाटतो, त्यामुळे वरच्या खिशात ठेवला तरी अगदी एमआय चा लोगो बाहेर डोकावेल ;) वजनाने अगदी मोटो-ई पेक्षाही हलका!
३. हार्डवेअरः स्नॅपड्रॅगन ८०१ एसओसी चा भन्नाट प्रोसेसर!
४. बॅटरी: इंटरनेटचा वापर दिवसभर करुनही [ + काही फोन + मेसेजेस इ.]अजुन ७०% बॅटरी शिल्लक आहे.
५. झकास युआयः हा लय भारी! स्क्रॅच रेसिसटंट, फुल्ल एचडी, किटकॅट ४.४.२ + एमआय-युआय! गोरीला टचस्क्रीन भारी! तुम्हीजर [माझ्यासारखे] युआयवाले असाल तर फक्त यासाठीच "लय भारी" म्हणाल.
६. एप्लिकेशन्स: कमीत कमी प्री इंस्टॉल्ड एप्लिकेशन्स = फ्लिपकार्ट, फेसबुक इ. गुगल प्लेवरुन पाहिजे ते इंस्टॉल करा!
७. सेक्युरीटी: महत्त्वाचा भागः कोणते एप काय परमिशन मागते ते तुम्हाला विचारुनच प्रोसेस केले जाते. म्हणजे - फेसबुक इंस्टॉल केले तर ते तुमच्या फोनबुक/ कॉन्टॅक्टबुक ला अ‍ॅक्सेस मागते... नाही देत जा - म्हणा!
८. शिवाय - इन्बिल्ट - स्पॅम कॉल्स - मेसेजेस ब्लॉक सोय आहे. त्यासाठी वेगळे एप नाही लागत. टेलिमार्केटींगवाले बसा बोंबलत आता. शिवाय वायरस स्कॅनही आहे.
९. कॅमेरा: १३ मेपी - झक्कासच! पुन्हा - इनबिल्ट इमेज एडिटींग ... वेगळ्या एपची गरज नाही. शिवाय समोरचा २ मेपी. चा कॅमेरा.
१०. नेटवर्क व इंटरनेट कनेक्टीविटी: मस्त आहे.
११. व्हीडिओ - ऑडिओ - गेमिंगः मी मोबाईलवर तर गेम्स नाही खेळत - म्हणुन अजुन ट्राय नाही केला. आवाज - दणदणीत आणि खणखणीत! युट्युबवरचे एक दोन व्हीडिओ पाहिले - मस्त स्ट्रीमिंग वाटले..
१२. सर्व्हीस सेंटरः आहेत - ही पहा - लिस्टच आहे.!

अजुन काय पाहिजे होतं?:

१. मोबाईल बरोबर फक्त चार्जरच मिळतो. म्हणजे - ते इअरफोन - युएसबी केबल.. वगैरे काही नाही.
२. सिंगल - रेग्युलर - सिम फोन आहे, ड्युअर सिम नव्हे!
३. थोडासा मोठा आहे!
४. चार्जिंगच्या वेळी चार्जर गरम झाला - मोबाईल नव्हे.

...ही प्रतिक्रिया माझे व्यक्तिगत मत आहे ;)