रविवार, ६ मे, २०१२

सत्यमेव जयते

व्यावसायिक जगात परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखल्या जाणार्‍या आमीर खान ने अगदी ज्वलंत विषयालाच वाचा फोडणारा कार्यक्रम केलाय. दुरदर्शन ते स्टार उत्सव, स्टार प्रवाह, स्टार प्लस अशा वेगगेगळ्या वाहिण्यावर हा कार्यक्रम चालु आहे. आसपास घडणार्‍या ज्या गोष्टींवर आपण फक्त बोलतोच त्याच गोष्टींची - ज्वलंत प्रश्नांची अगदी मुद्देसुद माहिती देणारा हा कार्यक्रम तुम्हा-आम्हांला नक्कीच विचार करायला लावेल.


येणार्‍या भागांत असे अनेक विषय असतील... आजपासुन रविवारचा ११ ते १२.३० हा वेळ "सत्यमेव जयते" साठी राखीव असेल. या कार्यक्रमाचे भाग सत्यमेव जयते च्या संकेतस्थळावर आपल्या भाषेतही पाहता येतील.

अपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग! अशी एक पोस्ट या आधी लिहिली होती. आज आमीर खानच्या "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात हाच विषय अगदी मुद्देसुद मांडलेला पाहिला. मुलगाच पाहिजे हा हट्ट [नाही - विकृती] किती विकोपाला गेलाय याची ही पावतीच!आपल्याच आसपास घोंगावणार्‍या या वावटळात किती बालिकांचे बळी गेलेत - ३ करोड! कार्यक्रमात दाखवलेले वय ३५ पेक्षा अधिक असणारे पुरुष, लग्नासाठी विकत घेतल्या जाणार्‍या महिला.. सुशिक्षित घरांतील व्यक्ती... पैशासाठी गर्भपात करणारे डॉक्टर्स.. सारं कसं भयानक..!

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

टेक्स्टमी: एसएमएस वरुन मोफत माहिती पाठवा

मोफत एसएमएस पाठवण्यासाठी बरीच संकेतस्थळे आहेत. आज माहिती देतोय ते अलिकडेच सुरु झालेल्या "टेक्स्टमी" या संकेतस्थळाबद्दल. एक-दोन क्लिक करुन तुम्ही एखादा फोटो, व्हिडिओ किंवा दुवा लागलीच एसएमएसवर पाठवु शकता! टेक्स्टमी ही सुविधा ब्राऊजर - फायरफॉक्स / गुगल क्रोम आणि ब्लॉग/ संकेतस्थळावरही कार्यान्वयित करता येते.


आतापर्यंत आपण फेसबुक/ ट्विटर/ लिंक्डईन वगैरेसाठीची शेअर बटन पाहिलीच असतील. त्यातच एक नवीन भर - "टेक्स्टमी" या शेअरींग सुविधेची!

टेक्स्टमी चा वापर माहिती प्रसार - फोटो, दुवे, व्हिडिओ इ. करण्यासाठी अपेक्षित आहे. त्यामुळे एसएमएस बॉक्समध्ये संबंधित पानाचे नाव व दुवा येतो. मात्र ११९ पर्यत अक्षर संख्या असणार्‍या एमएमएस मध्ये आपण आपला स्वतःचाच निरोपही लिहु शकता! अर्थात बहुतांशी आगंतुकांना "मोफत एसएमएस" हीच सुविधा आवडेल!

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

जागतिक पुस्तक दिन - वाचते व्हा!

तुम्ही पुस्तकं वाचता का? जर उत्तर "हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज "जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही!].


२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.

तर थोडक्यात सांगायचं तर या "जागतिक पुस्तक दिनाचं" निम्मित्त साधुन महाजालावर उपलब्ध असणारी काही ई-पुस्तकांचे दुवे खाली देतोय, ज्यावरुन आपणांस हजारो ई-पुस्तकं डाऊनलोड करता येतील. वेळ मिळाला तर नक्की पहा आणि बुकमार्क करुन ठेवा.

गुरुवार, १५ मार्च, २०१२

आळीमिळी -गुपचिळी...

... शिवरायांच स्मारक जमीनीवर उभारण्यास जागा नाही म्हणुन समुद्रात उभाराचे वादे.. १९९५ सालापासुन जनतेला अक्षरशः चुना लावत चाललेलं हे स्मारकाचं राजकारण... हजारो एकरचे ग्रहप्रकल्प करण्यासाठी यांच्याकडे जमीन आहे... नसेल तर बळकवायचीही तयारी... पर्यावरणाच्या गोष्टी फक्त स्मारकासाठीच लागु का?... त्या ग्रह प्रकल्पांसाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकारण्यांची कामगिरी वाखानण्याजोगी.. मग स्मारकासाठीच का आळीमिळी? आयुष्यभर राजांच्या नावाचं राजकारण करणारे नेमके याच बाबतीत गप्प का?शिवरायांचे स्मारक, स्मृती आमच्या हृदयात आहे... उगाच राजकारण करु नका... राजकारणी म्हणुन आपण लायक नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे.. त्याची प्रचितीही आलीच आहे.. मग आता काय 'सर्टीफाय' होण्याची वाट पाहताहात का?


सचिन व त्याच्या कामगिरीची बाराखडीही माहिती नसलेले, उगाचच त्याच्या 'त्या' शतकाची कुचेष्टा करताहेत.. सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या अकलेचे दिवे पाजळताहेत... का.. कशासाठी..? आपल्या आयुष्यात आपण असे किती दिवे लावलेत ज्यासाठी आपण सचिनच्या रेकॉर्डची वाट पहात आहात...?

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

मराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची संग्रहीका

मराठी ब्लॉगर - लेखक आणि वाचक यांच्या माहितीसाठी:
मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers] आहे. मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.

चला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य – अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर!