आज "गटारी - अमावास्या" आहे?

अरे हां.... श्री महालक्मी दिनदर्शिकेनुसार आज "गटारी - अमावास्या" आहे.... उद्यापासुन श्रावण महिना सुरु होणार आहे..... ह्या वर्षी मी श्रावण महिना अंडी - मांस - मच्छी न खाता - "पाळायचा" - ठरविला आहे... दुपारीच मस्त बिर्यांणी झोडली आहे..... आज संध्याकांळी .... सासरवाडीहुन चिकन खाण्यास आमंत्रण आहे... मी हा महिना - यावर्षी तरी पाळु शकेन असं मला वाटतयं.... मात्र खात्रीशिर सांगता येत नाही.... बघु..... ;)

टिप्पण्या

Mahendra म्हणाले…
अरे वा.. मजा आहे.. शुभेच्छा..
Deepak म्हणाले…
महेंद्रजी,
आतापर्यत श्रावण पाळण्याचा प्रयत्न मी दरवर्षी केलाय :) ... यावर्षीही सही.. बघुया कीतपत जमतंय ते!
वाटसरु…….. म्हणाले…
सही आहे मी पण दर वर्षी पाळेल असे पहिला आठवडा तरी म्हणतो...पण मग येरे माझ्या मागल्या....च्यायला हा श्रावण कशाला येतो दर वर्षी....
Deepak म्हणाले…
@वाटसरु,
आत्ता कुठं एक-दिड दिवस झालायं आणि मला चिकनची स्वप्नं पडायला लागलीत.. कसा आणि कधी संपणार श्रावण ;) ?
रोहन... म्हणाले…
कोंबडीच्या हातात हात घालुन बोकड लागले नाचु... आता महिनाभर तरी आपण वाचू ... !!!

आत्ताच एका ब्लॉग वर वाचले ... :D
Deepak म्हणाले…
@रोहन,
अरे हां आत्ताच वाचल्या त्या ओळी... !
नशिब.... "कोंबडी पळाली ..." चं श्रावणी विडंबण अजुन तरी वाचण्यात नाही आलं ... :)